'नेहमी येणाऱ्या रागाचं रूपांतर विधायक कामात करून यश कसं मिळवायचं ते शिका

नेहमी येणाऱ्या रागाचं रूपांतर विधायक कामात करून यश कसं मिळवायचं ते शिका

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“नाकावरच्या रागाला औषध काय?” असं ‘कळत नकळत’ या मराठी चित्रपटात गाणं आहे. सिनेमाची कथा देखील माणसांकडून घडलेल्या चुका आणि त्यामुळे एकमेकांनी एकमेकांवर धरलेला राग यावरतीच आधारित आहे.

माणसाला वेगवेगळ्या भावना आहेत. माणूस हसतो, रडतो, चिडतो, गोंधळतो तसाच तो रागाला ही येतो. या सगळ्या गोष्टींवर आपला जर संयम असेल, तर आपलं आयुष्य सुखी आणि आरोग्यपूर्ण होतं, पण बऱ्याच जणांना येणारा राग हा आवरता येत नाही. अशा माणसांच्या नाकावरच राग राहतो. अगदीच क्षुल्लक क्षुल्लक गोष्टींनीही या माणसांना राग येतो.

 

angry kareenainmarathi

 

रागीट व्यक्तींच्या जीवनातील प्रत्येक जण त्यांच्या रागाला घाबरतो. अशा व्यक्तीची दहशत त्यांच्या आसपासच्या लोकांवर असते. यामुळे त्या माणसाच्या कुटुंबातील व्यक्ती, मित्रपरिवार सगळेच दुरावतात. या लोकांना आपल्याला येणाऱ्या रागाची कल्पनाही असते आणि म्हणूनच त्यांच्याही मनात स्वतःच्या रागाबद्दल भीती असते.

हा राग माणसाला का येत असेल? याच्यावर संशोधनही झालं आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मते राग येण्याचे तीन घटक आहेत.

१. शारीरिक प्रतिक्रिया: एखाद्या गोष्टीमुळे राग आल्यास माणसाच्या शरीरातील अड्रेनील वाढते. त्याचा परिणाम म्हणून हृदयाचे ठोके वाढतात, स्नायू कडक होतात, रक्तदाब वाढतो, मग तो माणूस हातघाईवर येतो.

२. संज्ञानात्मक पैलू: कधीतरी आपल्या बाबतीत असे काही घडते, की ती गोष्ट आपल्यावर अन्यायकारक आहे, चुकीची आहे याची पुरेपूर खात्री असते. सतत तोच तोच विचार केल्यामुळे देखील राग येऊ शकतो.

३. राग व्यक्त करणे: राग आल्यावर तो व्यक्त करण्याच्या देखील विविध पद्धती आहेत. व्यक्तीचा चेहरा लाल होतो, तो जोरजोराने ओरडत असतो, शिव्याशाप देत असतो.

एखाद्या गोष्टीवरून जर काही बिनसले, तर अगदी मीटिंग मधून व्यक्ती उठून चालू लागते, जोरात दार आपटून बंद करते, वस्तू फेकून मारते. म्हणजे केवळ व्यक्तीच्या हावभावावरून लक्षात येते, की त्या व्यक्तीला राग आलेला आहे.

 

alia bhatt angry inmarathi

 

म्हणजेच राग हा भावनांशी निगडीत आहे. जेव्हा तुम्ही सुखी, समाधानी, आरोग्यपूर्ण जीवन जगत असता, तेव्हा जर वेगवेगळ्या कारणाने राग वाढत असेल तर तो आपल्यासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. नकारात्मकता वाढेल आणि कोणालाही नकारात्मक जगणं नकोसंच वाटेल.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, राग कुणाला दुखावत नाही पण राग हिंसकपणे व्यक्त केल्याने, आतल्या आत तो वाढवल्याने स्वतःचा आणि दुसऱ्यांचा नाश करू शकतो. त्यामुळे दुःख निर्माण होते.

तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेऊ शकत असाल तर तुमच्या आयुष्यात सकारात्मकता प्रवेश करेल. जर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त राग येत असेल तर पुढील गोष्टी करता येतील:

रागाला कामाची प्रेरणा बनवा

जर खूप राग येत असेल, तर त्याला सकारात्मकतेची जोड द्या. उदाहरणार्थ, जर कोणी तुमच्या क्षमतेवर शंका घेत असेल आणि अद्वातद्वा बोलत असेल तर त्या वेळेस राग येणे साहजिक आहे, पण हीच वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या कामातून त्या व्यक्तीला स्वतःची क्षमता दाखवून द्या.

यशासाठी रागाचा वापर करा

 

sushma-swaraj_Angry Inmarathi

 

 

जर कोणाचा बदला घ्यायचाच असेल, तर तो आपल्या रागाचा घ्या. त्यामुळे रागामध्ये तुमच्या आवडीच्या गोष्टी करा, नवीन काहीतरी निर्माण करा, नवीन बिजनेस काढा किंवा जे तुम्हाला मनापासून जे करायचं आहे ते करा. आपला राग दुसऱ्यांवरती काढू नका. ऑफिसमधल्या ताण-तणावाचा राग घरातल्या व्यक्तींवर काढू नका.

रागाचा वापर आशावादी होण्यासाठी करा

आनंदी लोक फार आशावादी असतात. कारण ते रोजचं आयुष्य कुठल्याही भीतीचा सामना न करता जगतात. आयुष्यात प्रॉब्लेम येणारच, पण त्याचा फारसा बाऊ न करता ते त्याला सामोरे जातात.

क्रोधाचे कलेत रुपांतर करा

मुळातच कुठल्याही कलेला ऊर्जेची आवश्यकता असते. जर ऊर्जेला योग्य वाट मिळाली नाही, तर ती गुन्हेगारीकडे वळू शकते. म्हणूनच राग येऊन येणारी ऊर्जा ड्रॉईंग, पेंटिंग, संगीत, कविता करणे, लेखन, मूर्ती बनवणे, सुतारकाम इत्यादी विविध कामात वापरली जाऊ शकते.

नात्यात मोकळेपणा येण्यासाठी राग येणे चांगले

 

 

कोणाला असं वाटू शकेल, की राग येण्यामुळेच नाती तुटतात, परंतु तसं नाहीये. जोपर्यंत रागामुळे शारीरिक हिंसा होत नाही, तोपर्यंत एखाद्या नात्यात राग येणे हे नैसर्गिक असू शकते. परंतु वेळीच केलेल्या संवादाने देखील हा राग निवळू शकतो.

एखादी गोष्ट झाल्यानंतर जर राग आला तर समोरच्या व्यक्तीला “हे वागणं आवडलं नाही” असं स्पष्ट सांगा. पुढच्या वेळी असं काही वागण्याआधी समोरची व्यक्ती विचार करेल, पण उलट जर तो राग मनात धरून बसलात तर समोरच्या व्यक्तीला तुम्हाला काय म्हणायचं आहे किंवा काय झालं आहे हे कळणारही नाही.

राग मनात धरून ठेवल्याने आपल्यालाच त्रास होऊ शकतो, परत कधीतरी भांडण झाल्यावर जुन्या गोष्टी उगाळून काहीही फायदा नसतो. कारण वेळ गेलेली असते. यामुळे फक्त भांडणं वाढतात. पण वेळीच बोलल्यास त्यावर तोडगा काढता येऊ शकतो.

राग आल्यास इतर व्यक्तींना आणि स्वतःला माफ करायला शिका

 

happy girl inmarathi

 

राग येणे ही माणसाची नैसर्गिक भावना आहे. आपल्याला जसा राग येतो, तसाच इतरांनाही येऊ शकतो, हे जर लक्षात ठेवलं तर जास्त त्रास होणार नाही. कधीकधी आपल्या हातूनही चुका होतात, त्यावेळेस आपलाच आपल्याला राग येतो. त्यावेळेस स्वतःला माफ करायला शिका.

इतर व्यक्तींना राग नाही आला, तर त्या व्यक्तीचा द्वेष न करता त्यालाही भावभावना आहेत म्हणूनच राग आला हे समजून त्या व्यक्तीलाही माफ करा. हे कदाचित अवघड जाईल, पण ही गोष्ट करणे केव्हाही चांगले.

एकमेकांवर राग धरल्याने केवळ ताण तणाव निर्माण होतात आणि नकारात्मकता येत जाते. मग प्रत्येक गोष्ट नकोशी वाटायला लागते, पण जर एकमेकांना माफ केलं तर सकारात्मकता येईल आणि आयुष्य सुकर बनेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?