'क्रिकेटपटू नसुनही क्रिकेट विश्वातला सेलिब्रिटी बनलेल्या या अवलियाच्या रंजक गोष्टी!

क्रिकेटपटू नसुनही क्रिकेट विश्वातला सेलिब्रिटी बनलेल्या या अवलियाच्या रंजक गोष्टी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

क्रिकेट हे आपल्या सर्वांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. भारताची क्रिकेट मधील सुधारत गेलेली कामगिरी हे त्याचं कारण असेल.

सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्ही व्ही एस लक्ष्मण, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, एम एस धोनी हे आणि यांच्यासारखे बरेच क्रिकेटर भारतात घडले आणि त्यांनी क्रिकेट कडे बघण्याचा आपल्या सर्वांचा दृष्टिकोन बदलून टाकला.

मधल्या काही वर्षात चुकीच्या कारणांमुळे प्रसिद्धीत आलेलं क्रिकेट हे सध्या मात्र एखाद्या ध्रुव ताऱ्याप्रमाणे आपलं स्थान लोकांच्या मनात टिकवून आहे.

आज कदाचित आधी सारखे सगळे टीव्ही समोर सलग क्रिकेट बघत नसतीलही. पण, क्रिकेट बद्दलच्या घडामोडी सगळे जण फॉलो करत असतात. आज क्रिकेट बघितलं कमी जातं, पण त्याबद्दल ऐकलं आणि वाचलं बरंच जातं.

क्रिकेट सोबतच भारतात समालोचक म्हणजेच कमेन्टेटर सुद्धा खूप लोकप्रिय आहेत. बहुतांश खेळाडू हे निवृत्ती नंतर कॉमेंट्रीकडे वळतात असा कल आहे.

 

gavaskar and ravi shastri inmarathi

 

नवज्योत सिंग सिद्धू, सुनील गावस्कर, विरेंद्र सहेवाग आणि सध्या लोकप्रिय असलेला आकाश चोप्रा या खेळाडूंना प्रामुख्याने लोकांनी क्रिकेट नंतर एक उत्तम समालोचक म्हणून सुद्धा पसंत केलं.

या सर्वांमध्ये ‘हर्षा भोगले’ हे एक नाव असं आहे की ज्यांनी स्वतः क्रिकेट न खेळता फक्त कमेंट्री मध्येच करिअर केलं आणि ते त्यामध्ये प्रचंड यशस्वी सुद्धा झाले.

कमाल आहे ना? कॉमेंट्री बॉक्स मध्ये क्रिकेट मधील दिग्गज खेळाडूंसोबत बसायचं आणि त्यांच्या समोर क्रिकेट बद्दल बोलायचं.

कॉमेंट्री करणे म्हणजे थोडक्यात मैदानावर खेळण्यासारखं आहे. याचं कारण असं की, तुम्हाला प्रत्येक बॉल कडे तितकंच लक्ष देऊन आधी बघावं लागतं, त्या बॉल वर काय घडलं हे समजून घेऊन त्यावर जगभरातील प्रेक्षकांना कळेल अश्या सोप्या इंग्रजीत भाष्य करावं लागतं.

हे सगळं इतकं फास्ट होत असतं की, आपण कधीकधी ते काम आपल्याला सहज आणि सोपं वाटू शकतं. पण, ते काम इतकं सोपं नाहीये. कॉमेंट्री करणाऱ्या व्यक्तीच्या नजरेतून आपण क्रिकेट बघत असतो.

बघणे, समजणे, बोलणे हे सगळं या लोकांना खूप कमी वेळात करावं लागत असतं.

‘हर्षा भोगले’ यांचं यासाठी कौतुक आहे की, प्रत्यक्ष क्रिकेट न खेळता सुद्धा त्यांना क्रिकेट बद्दल बोलताना शब्द शोधावे लागत नाहीत.

 

harsha bhogle inmarathi

 

हर्षा भोगले यांनी आजपर्यंत १०० टेस्ट मॅच आणि ४०० वन डे क्रिकेट मॅच मध्ये समालोचन केले आहे. आपल्या आकलन शक्ती, शब्दकोश आणि विनोदी स्वभावाच्या जोरावर हर्षा भोगले यांचं नाव हे खूप सन्मानाने घेतलं जातं.

आज कित्येक इतर खेळ पत्रकारिता करणारे व्यक्ती क्रिकेट समालोचक आहेत. पण, आपल्याला क्वचितच त्यापैकी एखादं नाव आठवेल. कारण, हर्षा भोगले यांनी कॉमेंट्रीचा वाढवून ठेवलेला स्तर.

१९ जुलै १९६१ रोजी हैद्राबाद च्या एका मराठी कुटुंबात हर्षा भोगले यांचा जन्म झाला. त्यांचे वडील ए.डी.भोगले हे फ्रेंच शिकवणारे प्राध्यापक होते तर आई मानसशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या.

आंध्रप्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट मॅच मध्ये उस्मानिया युनिव्हर्सिटी कडून मुहम्मद अझरुद्दीन सोबत क्रिकेट खेळणं इतकाच त्यांना क्रिकेट खेळण्याचा प्रत्यक्ष अनुभव.

केमिकल इंजिनियर असलेले हर्षा भोगले यांनी पदव्युत्तर शिक्षण हे आय आय एम अहमदाबाद मधून घेतलं होतं.

करिअरची सुरुवात त्यांनी एका जाहिरात कंपनी सोबत केली होती. २ वर्ष त्यांनी त्या जाहिरात एजन्सी सोबत काम केलं आणि त्यानंतर एक स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनी त्यांनी जॉईन केली.

शिक्षण सुरू असतानाच म्हणजे वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी सर्वात पहिल्यांदा ऑल इंडिया रेडिओ साठी क्रिकेट समालोचन केलं होतं. याआधी त्यांना फक्त कॉलेज च्या मॅच मध्ये समालोचन करण्याचा अनुभव होता.

तेवढ्या अनुभवावर ते ऑल इंडिया रेडिओ हैद्राबादच्या कार्यालयाच्या डायरेक्टरला भेटायला आणि नोकरी मागायला गेले होते.

१९८१ मध्ये त्यांना रणजी ट्रॉफीच्या मॅच साठी कॉमेंट्री करण्याची पहिली संधी मिळाली होती. १९८३ मध्ये त्यांनी पहिल्या वन डे साठी समालोचन केलं ते १९८४ मध्ये पहिल्या टेस्ट मॅच साठी.

 

harsha bhogle 2 inmarathi

 

१९९१-१९९२ मध्ये ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन कडून कॉमेंट्री साठी बोलावणं आलेले ते पहिले व्यक्ती होते. ही ती सिरीज होते जी की १९९२ च्या क्रिकेट च्या वर्ल्डकप च्या आधी आयोजीत करण्यात आली होती.

हर्षा भोगले यांच्या सहज बोलण्याच्या शैलीमुळे, सोप्या भाषेमुळे ते या क्षेत्रात फार कमी वेळात लोकप्रिय झाले.

हर्षा भोगले यांनी समालोचना व्यतिरिक्त ‘हर्षा ऑनलाईन’, ‘हर्षा अनप्लग्ड’ आणि स्कुल क्विझ ओलम्पियाड सारखे कार्यक्रम सुद्धा होस्ट केले होते.

डिस्कव्हरी चॅनल वर सुद्धा हर्षा भोगले यांनी ‘ट्रॅव्हल विथ हर्षा भोगले’ हा कार्यक्रम सादर केला होता. समालोचन क्षेत्रातील त्यांचा सर्वोत्तम गौरव म्हणजे “हर्षा की खोज” या नवीन समालोचक स्पर्धेचं हे शीर्षक म्हणता येईल.

या व्यतिरिक्त सुद्धा त्यांना कित्येक पुरस्कार आणि उपाधीने आज पर्यंत सन्मानित करण्यात आलं आहे :

१. आऊटलुक या मॅगझीन कडून त्या आठ लोकांच्या यादीत समावेश ज्यांनी ‘त्यांना मिळालेलं प्रोफेशन बदलून त्यात मोलाची कामगिरी बजावली’.

२. २०१० मध्ये हिंदुस्तान टाइम्स ने हर्षा भोगले यांना “ग्रेटेस्ट आयकॉन ऑफ क्रिकेट कॉमेंट्री” या उपाधीने सन्मानित केले होते.

३. १९९२ आणि १९९९ या दोन वर्षांमध्ये हर्षा भोगले यांना प्रथम क्रमांकाचे समालोचक म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं.

४. ऑस्ट्रेलिया मध्ये २००३ मध्ये झालेल्या एका सर्व्हे मध्ये त्यांना बेस्ट कमेन्टेटर ऑन रेडिओ अँड टेलिव्हिजन या उपाधीने सन्मानित करण्यात आलं होतं.

५. Cricinfo या वेबसाईट च्या ग्लोबल पोल मध्ये सुद्धा हर्षा भोगले हे सर्वात आवडते कमेन्टेटर म्हणून ग्लोबल मतानुसार निवडण्यात आलं होतं.

 

harsha inmarathi

 

कॉमेंट्री सोबतच हर्षा भोगले हे फार उत्तम लेखक आहेत. त्यांनी स्वतः मुहम्मद अझरुद्दीन यांच्या आत्मचरित्राचं शब्दांकन केलं होतं. हर्षा भोगले यांनी त्यांच्या पत्नी अनिता भोगले यांच्या सोबत मिळून ‘द विनिंग वे’ हे बिजनेसचं ज्ञान देणारं पुस्तक सुद्धा लिहिलं होतं.

सध्या हर्षा भोगले हे युट्युब वर ‘आऊट ऑफ द बॉक्स’ हे चॅनल सुद्धा चालवतात. काळाची गरज म्हणून त्यांनी या सोशल प्लॅटफॉर्मचा सुद्धा वापर करण्यास खूप आधीच सुरुवात केली आहे.

टाईम्स ग्रुप च्या ‘क्रिकबझ’ साठी सुद्धा ते लेखक आणि समालोचक म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. हर्षा भोगले हे सध्या आय आय एम उदयपूर चे बोर्ड ऑफ गव्हर्नर म्हणून सुद्धा पद भूषवत आहेत.

कॉमेंट्री करतानाचे सर्वात मोठे २ क्षण विचारल्यावर हर्षा भोगले या क्षणांचा उल्लेख करतात :

१. २०११ मध्ये भारताने जिंकलेल्या वर्ल्ड कपचं पोस्ट मॅच सेशन ला होस्ट करण्याचा मान त्यांना मिळाला होता.

२. सचिन तेंडुलकर च्या निवृत्तीच्या मॅच मध्ये हर्षा भोगले यांना त्याची मुलाखत घेता आली.

सलग ९ आय पी एल मध्ये कॉमेंट्री करणाऱ्या हर्षा भोगलेंना एप्रिल २०१६ मध्ये मात्र भारतीय क्रिकेट बोर्ड ने कोणत्या तरी खेळाडूच्या तक्रारीनुसार आय पी एल चा करार रद्द केला होता.

 

harsha in ipl inmarathi

 

याचं नेमकं कारण मीडिया समोर आलं नाही. २०१९ च्या वर्ल्ड कप मध्ये त्यांना समालोचन करण्याची संधी मिळाली होती.

आपल्या आवडीच्या क्षेत्रात सुरुवातीला करिअरची संधी उपलब्ध न झाल्याने खचून न जाता सतत स्वतःला अपग्रेड करणाऱ्या हर्षा भोगले यांचं करिअर हे खरंच खुप प्रेरणादायी आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?