'छोट्याशा घरातून सुरु झाली भारतातील सर्वात जुनी आणि मोठी आयुर्वेदिक औषध कंपनी!

छोट्याशा घरातून सुरु झाली भारतातील सर्वात जुनी आणि मोठी आयुर्वेदिक औषध कंपनी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आयुर्वेदिक प्रोडक्ट म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? बाबा रामदेव आणि त्यांची पतंजली, बरोबर ना? अफकोर्स ब्रँड उभा करायला केलेली त्यांनी मेहनत आणि ब्रँडिंग बघता ते साहजिक आहे.

पण, च्यवनप्राश म्हटल्यावर सगळ्यात आधी कोणती कंपनी डोळ्यासमोर येते? डाबर!

तर, आज आपण याच डाबर कंपनी बद्दल बघणार आहोत जी देशातली सगळ्यात जुनी आणि मोठी आयुर्वेदिक प्रोडक्ट आणि औषध बनवणारी कंपनी आहे.

एका इमानदार डॉक्टरांच्या रुग्ण सेवेच्या दृढ इच्छा शक्ती मधून निर्माण झालेली एक छोटी औषध निर्मिती कंपनी एक एक छोटा टप्पा गाठत भारतातली एक मोठी लिडिंग एफएमसीजी कंपनी कशी झाली ही एक प्रेरणादायी कहाणी म्हणून डाबर कडे बघता येईल.

डॉक्टर एस के बर्मन हे कॉलरा आणि मलेरियाच्या आजारावर जालीम उपाय देण्यासाठी प्रसिद्ध असलेले बंगाल मधील डॉक्टर.

 

dabur inmarathi

 

याच औषधांचे लार्ज स्केल मध्ये प्रोडक्शन झालं पाहिजे म्हणून त्यांनी एक छोटा औषध निर्मितीचा कारखाना चालू केला. हीच डाबरची पहिली फॅक्टरी.

डाबर ला डाबर नाव सुद्धा रंजक पद्धतीने मिळाले. बंगाली लोक डॉक्टर बर्मन याना डाक्टर बर्मन म्हणून संबोधित करायचे. तर डाक्टरचे ‘डा’ आणि बर्मन मधील ‘बर’ मिळून निर्माण झालं ‘डाबर’.!

पुढे एस बर्मन यांचा आयुर्वेदात असलेला वारसा त्यांच्या मुलाने पुढे चालवला. आणि त्यांच्या मुलांनीच भारतातील पहिलं आयुर्वेदिक रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटर उभं केलं.

पुढे १९९६ मध्ये डाबर पब्लिक लिमिटेड कंपनी झाली.आणि डाबर ने एवढी मोठी भरारी घेतली की तिच्या यशाची केस स्टडीज आजही मॅनेजमेंट आणि बिझनेस स्टडीज मध्ये अभ्यासले जातात.

लार्ज स्केल मध्ये उत्पादन असलेल्या डाबरचे जवळपास २५० प्रोडक्ट हे जगभर आज वापरले जातात.

हेयर केअर,ओरल केअर, हेल्थ केअर, स्किन केअर, होम केअर आणि फूड प्रॉडक्ट अशा विविध कॅटेगरी मध्ये ते विभागले गेले आहेत.

डाबर चे प्रसिद्ध असे उत्पादन म्हणजे डाबर हजमोला, डाबर आम्ल ऑइल, वाटिका ऑइल, डाबर हनी, डाबर च्यवनप्राश आणि रियल फ्रुट ज्यूस.

लाल तेल हे बेबी केअर प्रोडक्ट, पुदिन हरा हे डायजेस्टिव्ह इलेमेंट आणि हनीटस हे मेडिसिन सेगमेंट आज देखील ग्राहकांमध्ये जबरदस्त लोकप्रिय आहे.

 

dabur products inmarathi

डाबर मुख्यत्वे तीन डिव्हिजन मध्ये ऑपरेट होते : 

१.कस्टमर केअर डिव्हिजन

२.इंटरनॅशनल बिझनेस डिव्हिजन

३.कंज्युमर हेल्थ डिव्हिजन.

मुख्य म्हणजे डाबरचे जगभरात मिळून असे एकूण २० मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत.

स्वातंत्र्य पुर्व काळातली कंपनी असल्या कारणाने त्यातल्या त्यात बंगाल मधली कंपनी असल्या कारणाने डाबर ला स्वातंत्र्य संग्राम नवीन नव्हता.

महात्मा गांधींच्या गावाकडे चला या मंत्राचा डाबर ने पुरेपूर अवलंब केला आणि आज सुद्धा ते दिसून येत.

डाबर देशातल्या तब्बल ४०,००० पेक्षा जास्त गावांमध्ये पोहोचला आहे.आणि ही संख्या वाढवून ६०,००० पर्यंत न्यायचा मानस कंपनीने सांगितलं आहे.

ग्रामीण भागात उपलब्धता जरी जास्त असली तरी डाबरचा सर्वाधिक बिझनेस हा शहरातच होतो. एकूण बिझनेस पैकी डाबरचा ५५% बिझनेस हा शहरातून होतो तर ४५% हा ग्रामीण भागातून होतो.

रेकॉर्ड ब्रेक डिस्ट्रिब्युशन नेटवर्क जरी असले तरी ऑनलाईन बिझनेस मध्ये सुद्धा डाबर मागे नाही. इ कॉमर्स सेगमेंट मध्ये डाबर ने तब्बल १५०% ग्रोथ ही दाखवलेली आहे.

डाबरचे आयुर्वेदिक प्रोडक्ट हे भारतभर तब्बल ६७ लाख आऊटलेट मधून विकले जातात आणि जवळपास १०० देशांमध्ये डाबर चा बिझनेस हा पसरलेला आहे. ज्याच्या मधून डाबर ला २७% रेव्हेन्यू मिळतो.

डाबरचा एकूण टर्न ओव्हर हा तब्बल ८,५०० करोड इतका प्रचंड आहे.

 

dabur company inmarathi

 

पारिवारिक व्यवसायाला एका बेस्ट स्ट्रॅटेजीने चालवून तिला भल्या मोठ्या उद्योगात कसे रूपांतरित करायचे याचे डाबर हे बेस्ट उदाहरण आहे

स्ट्रॅटेजीक निर्णय योग्य वेळेस घेऊन कंपनीचा गाडा कसा हकायचा हे डाबर ने दाखवून दिलेलं आहे.

याच उत्तम उदाहरण म्हणजे बर्मन कुटुंबीयांचं १९९८ मध्ये डाबर चं संचालन प्रोफेशन व्यक्तींकडे हस्तांतरित करणे. त्यामुळे अनेक जॉईंट व्हेंचर आणि पोर्टफोलिओ यामुळे नवं नवीन उत्पादन सतत एकामागोमाग एक येत राहिले.

तरी मार्केट मधल्या शर्यतीत एक नंबर वर कायम एकच जण राहत नाही. डाबर सारख्याच स्ट्रॅटेजीचा अवलंब करत पतंजली मार्केट मध्ये उतरली आणि शर्यतीत सुसाट पळत निघाली.

आज बाजारात १०,५०० करोड इतके प्रचंड बाजारमूल्य हे पतंजलीचे आहे, ८,५०० करोड इतके डाबरचे आणि ७०० करोड हे वैद्यनाथ या कंपनीचे आहे.

सध्या डाबर चे उपाध्यक्ष आहेत अमित बर्मन. केम्ब्रिज मधून मॅनेजमेंट ची डिग्री घेऊन त्यांनी कंपनी जॉईन केली.

 

amit burman inmarathi

 

विशेष म्हणजे अमित बर्मन हे लायसन्स धारक पायलट सुद्धा आहेत.अमित बर्मन यांच्या याच हवेत उंच उडण्याच्या आवडीतून डाबर पुन्हा आकाशाला गवसणी घालायला लागली तर त्यात नवल वाटायला नको.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?