' टॉयलेट मध्ये फोन कशासाठी नेताय, वाचा, या वाईट गोष्टींपासून वेळीच सावध व्हा

टॉयलेट मध्ये फोन कशासाठी नेताय, वाचा, या वाईट गोष्टींपासून वेळीच सावध व्हा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

काही वर्षांपूर्वी जगभरात एक ‘स्मार्टफोन क्रांती’ झाली आणि त्यानंतर मोबाईल, इंटरनेट या गोष्टींचा समावेश हा अत्यावश्यक सेवेत होऊ लागला.

आज आपल्या दिवसाची सुरुवात मोबाईलने होते आणि रात्री झोपायच्या आधी सुद्धा आपण मोबाईल बघितल्या शिवाय झोपत नाही. असं प्रत्येकाचं नसेलही, पण बहुतांश लोक आज याच लाईफस्टाईलच्या आहारी गेले आहेत.

रोज थोड्या थोड्या वेळाने मोबाईल चेक करत राहणं हे काम प्रत्येकाने आपल्या मागे लावून घेतलं आहे. एकही नोटिफिकेशन नाहीये म्हणून नाराज होणं, कोणीच मेसेज करत नाही म्हणून अस्वस्थ होणं हे सगळे या स्मार्टफोनचे ‘साईड इफेकट्स’ म्हणता येतील.

स्मार्टफोन हे आपलं आयुष्य स्मार्ट करण्यासाठी केलेली एक सोय आहे आणि त्याला त्याच दृष्टीने बघितलेलं कधीही चांगलं आहे.

 

mobile addiction inmarathi

 

मोबाईल वापरण्याचा कहर म्हणजे काही लोक आजकाल टॉयलेटमध्ये जातांना सुद्धा लोक मोबाईल सोबत घेऊन जातात. काहींना वाटेल “कामं असतात”, पण इतकं कोणतंच अर्जंट काम नसतं जे की बाथरूम मधील ‘त्या’ दहा ते पंधरा मिनिटांसाठी सुद्धा थांबू शकत नाही.

कोणत्या कामाला किती प्राधान्य द्यायचं हे आपण ठरवत असतो. आपल्या मोबाईलला सगळीकडे सतत सोबत ठेवणं हे कामाचं लक्षण नसून ते तुमच्या anxiety म्हणजेच अस्थिर मनाचं लक्षण असतं.

ज्यांना हे पटतं ते या गोष्टी टाळतात. ज्यांना या गोष्टीचं अजूनही तितकं गांभीर्य वाटत नाही, त्यांच्यासाठी मोबाईल बाथरूम मध्ये सोबत नेण्याचे हे काही वैज्ञानिक दुष्परिणाम सांगत आहोत:

 

१. मूळव्याध होण्याचा धोका:

 

mobile phone in toiler inmarathi

 

डॉक्टर्स असं सांगतात, की जर आपण टॉयलेट सीटवर गरजेपेक्षा जास्त वेळ बसून राहीलो, तर आपल्याला मूळव्याधाचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते.

मोबाईल सोबत असला की वेळ कसा पटपट निघून जातो हे कोणाच्याच लक्षात येत नाही. जागा कुठलीही असो. सवय ही सवय असते. सध्या मोबाईलमध्ये उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचीव्याप्ती इतकी वाढली आहे, की तुम्ही फोन हातात घेतला, नेट सुरू केलं आणि मोजून दहा मिनिटात तो फोन बाजूला ठेवून दिला असं होतच नाही.

हे माहीत असतानाही बाथरूममध्ये मोबाईल घेऊन जाऊन आपलं कोणतंच काम व्यवस्थितपणे पूर्ण होऊ शकत नाही. शिवाय, इतर त्रास मागे लागू शकतात ते वेगळंच.

२. स्क्रीनवरील जंतू:

 

 

सध्या फोनच्या स्क्रीन किती रुंद असतात ते आपल्याला माहीतच आहे. मोबाईल स्क्रीन वर Escherichia coli नावाचा जंतू हा चिकटून बसत असतो.

E. coli या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या जंतूची निर्मिती ज्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड आहे आणि ऑक्सिजन कमी आहे अशा ठिकाणी होत असते. हा तोच बॅक्टेरीया आहे ज्यामुळे आपण ‘फूड पॉयजनींग’ झाल्याचं ऐकत असतो. ते या विषाणूमुळेच होते.

सध्या व्हायरस काय काय करू शकतो आणि किती छोट्या जागेतून एकमेकांना त्याची लागण होऊ शकते हे आपण कोरोनाच्या रूपाने बघतच आहोत.

एका रिसर्चमध्ये हे सांगण्यात आलं आहे, की “बहुतांश मोबाईलची स्क्रीन ही टॉयलेट सीट इतकीच घाण असते.” सलेमिया हा जंतू सुद्धा मोबाईलच्या ऊर्जेवर जिवंत असतो असं सांगितलं जातं.

३. आरोग्यदृष्ट्या हानिकारक : 

 

mobile inmarathi

 

काही टॉयलेट वाचकांच्या मते, वृत्तपत्र किंवा मोबाईल टॉयलेटमध्ये नेल्यावर त्यांना प्रेशर लवकर येतं आणि त्यामुळे ते या सवयीचं समर्थन करतात, पण हजार लोकांच्या सर्वेक्षणात हे समोर आलं आहे की, प्रत्यक्षात या गोष्टींमुळे काहीच फरक पडत नाही.

मोबाईलपेक्षा एक वेळ वृत्तपत्र बरं असं काही डॉक्टर सांगतात, कारण ते रद्दीत टाकून दिलं जातं. मोबाईल बद्दल असं काही होत नाही. ना आपण त्याला रोज स्वच्छ करतो, ना बदलतो. पोट लवकर साफ होण्यासाठी सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यावं असं डॉक्टर सांगतात.

४. सार्वजनिक स्वच्छतागृहांची अशाश्वती :

 

mobile inmarathi1

 

आपल्या घरातील स्वच्छतागृहाच्या स्वच्छ असण्याची ग्वाही आपण देऊ शकतो, पण सार्वजनिक स्वच्छतागृह जसं की ऑफिस, हॉटेल, ट्रेन इथले स्वच्छतागृह आपल्या आधी कोणी, कसं वापरलं आहे हे आपल्याला माहीत नसतं.

सध्या सगळे स्वच्छतेबद्दल सतर्क झाले आहेत हे खरं, पण तिथे मोबाईल खिशातून काढून आपण जंतूंना निमंत्रण देत असतो. अशा ठिकणी चुकून आपला फोन पडला, तर तो खराब किंवा गायब होण्याची भीती असते ती वेगळीच.

काही जाणकार हे सुद्धा सांगतात, की टॉयलेट मधील जंतू हे सहा फुटांपर्यंत प्रवास करू शकतात. आपला टूथब्रश सुद्धा आपण टॉयलेटच्या जवळ ठेवणे योग्य नाही.

डॉक्टरांच्या मते, “जास्त वेळ टॉयलेटमध्ये थांबल्याने सुद्धा तुम्हाला बद्धकोष्ठताचा त्रास होऊ शकतो. जितक्या कमी वेळात शक्य तितक्या कमी वेळात  टॉयलेटच्या बाहेर यावं आणि हा वेळ १५ मिनिटांपेक्षा अधिक असू नये.”

आपल्या मेंदूला आणि मनाला सुद्धा एका ब्रेकची आवश्यकता असते. तो ब्रेक आपणच द्यायला पाहिजे. सध्या दिवसभरात आधीपेक्षा कित्येक पटीने वाढलेला ‘स्क्रीन टाईम’ हा थोडा कमी करण्यासाठी बाथरूम मध्ये फोन सोबत न घेऊन जाणे हेच ‘आरोग्याच्या दृष्टीने योग्य’ असं म्हणता येईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?