' कोणीही शिंकल्यावर “गॉड ब्लेस यू” म्हणण्यामागे आहेत अनेकविध कारणं, वाचाच – InMarathi

कोणीही शिंकल्यावर “गॉड ब्लेस यू” म्हणण्यामागे आहेत अनेकविध कारणं, वाचाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

युरोपियन संस्कृतीने आपल्याला बऱ्याच सवयी लावल्या आहेत असं म्हणता येईल. आपली मुलं शिकत असणाऱ्या इंग्रजी शाळांमध्ये सुद्धा त्यांना लहानपणीच खूप सवयी शिकवल्या जातात.

प्रत्येक व्यक्तीचं स्वागत हे “गुड मॉर्निंग” आणि स्माईल ने करावं ही अशीच एक सवय आहे. कोणत्याही दोन व्यक्ती बोलत असतांना आपल्याला काही सुचल्यास लगेच बोलणं सुरू करू नये. आधी “Excuse me” म्हणावं आणि मग बोलावं.

त्याचप्रमाणे, आपण एखाद्या दरवाज्यातून आत जात आहोत आणि मागे एखादी व्यक्ती आहे हे दिसल्यावर त्या व्यक्तीसाठी आपण उघडलेलं दार काही क्षणासाठी उघडं ठेवावं. या सवयी जितक्या लवकर आत्मसात होतील, तितकं तुमच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत असतो.

कोणीही शिंकल्यावर “गॉड ब्लेस यु” म्हणण्याची एक अशीच सवय आहे. तुम्ही शिंकत असतांना काही सेकंदासाठी तुमचा श्वास हा रोखलेला असतो. तो परत सुरळीत केल्याबद्दल देवाचे आभार मानणे अशी गोष्ट तुम्ही ऐकली असेल, पण कोणीही शिंकल्यावर “गॉड ब्लेस यु” म्हणायची ही पद्धत एका वेगळ्याच कारणामुळे आचरणात आली आहे.

 

sneeze inmarathi

 

इतिहासाचे प्राध्यापक सांगतात, की “युरोपियन ख्रिश्चन लोकांनी ही पद्धत ज्यावेळी सुरू केली, तेव्हा जगात प्लेगचा खूप प्रादुर्भाव होता. इसवी सन ५९० चा तो काळ होता. त्यावेळी शिंक म्हणजे प्लेगचं पहिलं लक्षण मानलं जायचं. ख्रिश्चन रोमन एम्पायरचे त्यावेळच्या पोप ग्रेगरी यांनी सर्व अनुयायांना कोणीही शिंकल्यास गॉड ब्लेस यु असं म्हणावं हे शिकवलं होतं.

हा या पद्धतीचा खरा उगम म्हणता येईल. जगभरातील विविध डॉक्टर, मानसोपचार तज्ञांनी या पद्धतीबद्दल आपली मतं नोंदवली आहेत.

हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या तज्ञांच्या मते, “एक दोन वेळेस शिंकणं ही नॉर्मल गोष्ट आहे. त्यापेक्षा जर का सतत शिंका येत असतील आणि त्याचं काही निदान होत नसेल, तर आपल्या समाधानासाठी देवाची आठवण काढून आपलं लक्ष दुसरीकडे नेण्याची ही एक पद्धत असू शकते. लोकांच्या धार्मिक स्वभावामुळे आणि देव आहे, तिथे स्वच्छता असावी त्या भावनेतून सुद्धा ही पद्धत लोकांनी लगेच मान्य केली असावी. ”

टेंपल युनिव्हर्सिटीचे मानसोपचार शिक्षक सांगतात, की “ज्या व्यक्ती देवाला मानत नसतील त्या एथिस्ट लोकांनी कोणी शिंकल्यावर फक्त ‘ब्लेस यु’ म्हटलं तरी चालू शकतं. यामुळे देवाचा उल्लेख टाळला जाईल आणि कोणत्याही सामान्य ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये धर्म किंवा देव हा विचार डोक्यात येणार नाही. कारण याबाबतीत प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात.”

 

sneeze-inmarathi

 

ग्रीक लोकांच्या मान्यतेनुसार, कोणी शिंकल्यावर “गॉड ब्लेस यु” म्हणण्याची पद्धत ही हजारो वर्षांपूर्वीची आहे. रोमन लोक हे “ज्युपिटर प्रिजर्व यु” असं म्हणायचे. “Salve” म्हणजेच “गुड हेल्थ टू यु” किंवा “लॉंग लाईफ” हे वाक्य सुद्धा काही लोक वापरायचे.

एका अति प्राचीन अंधश्रद्धेनुसार, खूप वर्षांपूर्वी शिंक आली, की नाकाद्वारे आत्मा निघून जाईल अशी वावडी काही लोकांनी उठवली होती. आपण जर का त्याच वेळी “ब्लेस यु” म्हणालो तर डेव्हील म्हणजेच यमराजाला देव तो आत्मा घेऊन जाण्यापासून वाचवतील.

काही लोक याचा उलट विपर्यास सुद्धा करतात, की दुष्ट विषाणू हे शिंक आली की शरीरात जाण्याचा प्रयत्न करत असतात. यापैकी कोणत्याही मताला विज्ञानात अजिबात थारा नाहीये किंवा या गोष्टी खऱ्या आहेत असा आमचा दावा नाही.

 

 

स्पॅनिश लोक हे शिंक येणं म्हणजे एक दैवी लाभ मानतात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या वाक्याप्रमाणे “गॉड ब्लेस यु” च्या वेगवेगळ्या मान्यता आहेत.

आपल्या असं म्हणण्याने जर शिंकणाऱ्या व्यक्तीला बरं वाटत असेल आणि त्याच्या आभाराने एक सकारात्मक, कृतज्ञ भाव जर का आपण वातावरणात पसरवत असू तर ही सवय अंगिकारण्यास काय हरकत आहे. नाही का?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?