' किबोर्डवर शिफ्ट, कंट्रोल, अल्टच्या दोन किज का असतात? बघा तर! – InMarathi

किबोर्डवर शिफ्ट, कंट्रोल, अल्टच्या दोन किज का असतात? बघा तर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोणत्याही मशीनची निर्मिती ही माणसाचं काम सोपं करण्यासाठी होते. आपल्या ऑफिसचं कोणतंही काम हे आज आपण कॉम्प्युटरशिवाय करण्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही.

मायक्रोसॉफ्ट एक्सेलची आपल्याला इतकी सवय झाली आहे, की आता कोणत्याही वस्तूची खरेदी आणि विक्री, किंमत अशी कामं एक्सेलमध्ये करण्याचाच आपला जास्त कल असतो. एक कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप हा कॅल्क्युलेटर, वही, पेन इतक्या सर्वांचं काम करत असतो.

आपलं काम सोपं करणाऱ्या या कॉम्प्युटरच्या प्रत्येक गोष्टी मध्ये माणसाचं प्रत्येक काम कसं कमी वेळात होईल याची काळजी घेतली गेली आहे. कॉम्प्युटरचा किबोर्ड बघितला तरी लक्षात येईल, की लेटर्स, फंक्शन कि, एस्केप, शिफ्ट, डिलीट, बॅकस्पेस, स्क्रोलिंग असे वेगवेगळे पर्याय दिले गेले आहेत, जे आपला वेळ वाया जाऊ नये आणि आपल्याद्वारे तयार होणारा डेटा हा अचूक असावा मदत करतात.

 

keyboard02-marathipizza

 

आपला वेळ वाचला पाहिजे म्हणून अजून एक पर्याय दिला आहे. तो म्हणजे, प्रत्येक किबोर्ड मध्ये उजव्या आणि डाव्या हाताला शिफ्ट की, कंट्रोल की आणि अल्ट की या दोन्ही बाजूला देण्यात आल्या आहेत.

आपण कधी हे लक्ष देऊन बघितलं, तर कळेल की डाव्या हाताकडे असलेली शिफ्ट की आणि डाव्या हाताकडे असलेली शिफ्ट की या एकच काम करतात. आपल्याला जर का कोणाच्याही नावातील फक्त पहिलं लेटर हे कॅपिटल लेटर्स मध्ये लिहायचं असेल, तर आपण शिफ्ट की चा वापर आपण करतो.

किबोर्ड तयार करत असताना इथपर्यंत विचार केला गेला आहे, की जर एखाद्या व्यक्तीला कॅपिटल लेटर A टाईप करायचं असेल तर त्याला टायपिंगच्या पद्धतीनुसार डावी शिफ्ट की वापरणं जास्त सोपं असेल. तेच जर का तुम्हाला कॅपिटल J हे लेटर टाईप करायचं असेल तर तुम्हाला उजवीकडे असलेली शिफ्ट कि वापरणं जास्त सोपं जातं.

हेच कारण किबोर्ड वर २ कंट्रोल किज देण्यामागे आहे. तुम्हाला जेव्हा Ctrl + A हे प्रेस करून लिहिलेलं पूर्ण मॅटर सलेक्ट करायचं असेल, तर आपण डाव्या हाताकडे दिलेली कंट्रोल कि वापरू शकतो. तेच जर का आपल्याला लिहिलेल्या परिच्छेदात जर एखादा शब्द शोधायचा असेल, तर आपण Ctrl+F हे वापरण्यासाठी उजवीकडे दिलेल्या कंट्रोल की चा वापर करू शकतो. पर्याय दोन्ही उपलब्ध करून दिले आहेत.

 

keyboard inmarathi 2

 

आपल्या टायपिंगच्या पद्धतीनुसार आणि आपल्याकडे असलेल्या वेळेच्या उपलब्धतेनुसार आपण या दोन कीज पैकी कोणती की वापरायची हे ठरवू शकतो.

Alt ही की उजवीकडे आणि डावीकडे देण्यामागे तेच कारण आहे. Alt की जास्त करून F1 ते F12 यापैकी कोणत्यातरी फंक्शन कीज सोबत वापरली जाते. यामध्ये सुद्धा आपल्याला पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. उदाहरणार्थ आपल्याला Alt + F4 हा शॉर्टकट वापरून कॉम्प्युटर शटडाऊन करायचा असेल, तर डावीकडे दिलेल्या Alt की चा वापर करायला पाहिजे.

तेच जर आपल्याला F12 सारखी उजव्या हाताकडे दिलेल्या फंक्शन की चा वापर वापर अल्टसोबत करू इच्छिता, तर आपण उजव्या हाताला दिलेली अल्ट की वापरणं आपल्याला नक्कीच सोपं जाऊ शकतं.

शॉर्टकट किज माहिती असणे हे प्रत्येक कॉम्प्युटर शिकणाऱ्या व्यक्तीला आजकाल अनिवार्य आहे. कोणाकडेच अतिरिक्त वेळ नाहीये. प्रत्येकाने आपल्याकडे असलेल्या वेळेचा सदुपयोग करावा आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पद्धती आत्मसात करून घ्याव्यात.

सध्याच्या स्पर्धेच्या युगात शाळा, कॉलेज मध्ये शिकवल्या जाणाऱ्या ज्ञानासोबतच ही स्किल्स आपल्यात असणं अत्यंत आवश्यक आहे. येणारा काळ किती मोठ्या प्रमाणावर डिजिटल असेल याचं ट्रेलर आपल्याला २०२० या वर्षाने दाखवलंच आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?