' तुमची ट्रिप मस्त व्हावी यासाठी झटणार्‍या या स्टार्टअप ची गोष्ट प्रत्येकाने वाचायला हवी!

तुमची ट्रिप मस्त व्हावी यासाठी झटणार्‍या या स्टार्टअप ची गोष्ट प्रत्येकाने वाचायला हवी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जरा असा विचार करा की तुम्हाला कुठेतरी ४ – ५ दिवस फिरायला जायचंय. तर सगळ्यात आधी तुम्ही काय करता.. संशोधन.. अर्थातच पहिली पायरी.. कुठे जायचे, कधी जायचं, कसे जायचं.. वगैरे वगैरे.. पण मग हे तुम्ही कसं करता.. अर्थातच इंटरनेटवर.

आज इंटरनेट आणि प्रत्येक पर्यटन कंपनीची वेबसाईट यामुळे संशोधन करुन नव्या पर्यटन स्थळाविषयी माहिती घेणं खुप सोपं झालंय.

आता असा विचार करा की साधारण २००० सालापर्यंत सुद्धा म्हणजे त्यापूर्वी लोकं प्रचंड फिरत होतेच, भटकंती तेव्हाही होत होती.

मात्र एक मोठा फरक असा आहे नव्या सहली, पर्यटनस्थळे, तिथे कसे पोहोचायचे, तिथे काय विशेष गोष्टी आहेत, त्याची जुजबी माहिती या सगळ्यासाठी पर्यटकांना कोणावर तरी अवलंबून रहावे लागत होते.

 

travelling inmarathi

 

आज जसे प्रत्येकाच्या हातात गुगल आणि स्मार्ट फोन आहे अशा सोयी नव्हत्या. त्यामुळे स्वतः संशोधन करुन आपले पर्यटन आपणच संपूर्णपणे नियोजित करणे हे शक्य होत नव्हते.

मात्र २०००  सालापासून पुढे जसाजसा इंटरनेटचा वापर वाढत गेला आणि अनेक क्षेत्रात गोष्टी ऑनलाईन होवू लागल्या तसा तसा पर्यटनाच्या बाबतीत बराच बदल होत गेला.

सर्व गोष्टींचं सखोल संशोधन करुन नेट आणि विविध वेबसाईट्स आणि ऑनलाईन पोर्टलचा वापर करुन अगदी सहज आपण १५ ते २० दिवसांची भटकंती करू शकतो ते सुद्धा कोणावरही अवलंबून न राहता! हल्ली तर वयस्कर मंडळी देखील सर्रास इंटनेटचा वापर करतात हे आपण पाहतो.

मात्र हा बदल, ही आजची सहजता, आपल्याला मिळालेला एक कंफर्ट झोन आणि सर्व काही एका क्लिकवर हे वाटतं तितकं खरंच सोपं असेल का हो, तर नक्कीच नाही.. कोणीतरी यासाठी खुपच काबाडकष्ट घेतले असणारच.

१९९९ ते २००५ पर्यंत साधारण इंटरनेट हे लँडलाईन फोनच्या माध्यमातून अतिशय कमी वेगाने चालत असताना या पॉवर चे भविष्य किती उज्ज्वल आहे याचा विचार करुन.

अशाप्रकारे ऑनलाईन पोर्टल किंवा वेबसाईट तयार करुन सर्व सुविधा एका छताखाली कशा देता येतील याचा केवळ विचार नाही तर प्रत्यक्ष कृती करुन ती आंमलात आणणे हेच केवढे धाडस होते.

मात्र असे धाडस ज्यांनी केले आणि अनेक संकटांवर मात करत एक यशस्वी स्टार्टअप उभं केलं जे आजही भारतात नंबर वन ला आहे.. त्यांची रंजक कहाणी आपण समजून घेऊ..

मेक माय ट्रिप या पर्यटन पोर्टलचे निर्माते आणि अध्यक्ष दीप कार्ला यांची ही गोष्ट. हा प्रवास प्रचंड कष्टाचा होता, कठीण होता, संकटांचा होता मात्र अशक्य नव्हता.

 

make my trip inmarathi

 

हरयाणातील गुडगाव येथे मेक माय ट्रिपचे मुख्यालय आहे. दिप हे स्वत: देखील उत्तर भारतातील रहिवासी. १९८७ साली दिल्लीच्या स्टिफन महाविद्यालयातून पदवी पूर्ण केल्यानंतर IIM अहमदाबाद येथून त्यांनी व्यवस्थापन विषयात मास्टर्स पूर्ण केले.

त्यानंतर ए.बी.एन. अँम्रो बँकेत त्यांनी नोकरी सुरू केली. पुढे १९९५ साली ती नोकरी सोडून दिप हे काहीतरी वेगळं, स्वत:चं आणि वैशिष्ट्यपूर्ण असं सुरू करता येईल का याचा विचार करत होते.

त्यातच त्यांनी पुन्हा एकदा ए.एम.एफ. बाऊलिंग या अमेरिकन बेस्ड कंपनीत नव्याने नोकरी सुरू केली.

भारतीय बाजारपेठेत प्रचंड पोटेन्शिअल आहे आणि भारताबाहेरील कंपन्यांसाठी भारतात पाय रोवणे म्हणजे त्यांचे भविष्य उज्ज्वल करणे या विचारधारेतून ही अमेरिकेची कंपनी भारतात आली होती.

यातून दिप यांच्या एक गोष्ट लक्षात आली की भारतीय बाजारपेठेत भविष्यात प्रचंड संधी आहेत. पुढे १९९९ साली त्यांनी ही नोकरी देखील सोडली आणि स्वतःच्या बिजनेस उभारणीसंबंधी विचार सुरू केला.

परंतू स्वत:चा बिजनेस म्हणजे भांडवल हवे ते ही बक्कळ. त्यासाठीच त्यांनी पुन्हा जी.ई. कॅपिटल कंपनीत नोकरी धरली.

यावेळी इंटरनेटची पॉवर भविष्यात किती जबरदस्त असू शकेल याची चुणूक दिप यांना पहायला मिळाल्याने त्यांनी त्याच धरतीवर आपला नवा बिजनेस सुरू करण्याचे ठरवले.

 

deep kalra 2 inmarathi

 

अखेर २००० साली दिप यांनी त्यांच्या नव्या बिजनेसचा श्रीगणेशा केला. २ दशलक्ष अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करुन अन्य ३ जणांच्या पार्टनरशिप च्या सहाय्याने ‘मेक माय ट्रीप’ या ऑनलाईन पोर्टलची स्थापना झाली.

सुरुवातीची ३ वर्षे खुपच खडतर होती. ऑनलाईन बुकिंग हा विषयच सामान्य जनतेसाठी इतका नविन होता की, ज्यांना कधी पाहिले नाही, भेटलो नाही, त्यांच्या ऑफिसविषयी काहीच माहिती नाही अशांना केवळ ऑनलाईन पैसे भरायचे कसे आणि विश्वास ठेवायचा कसा हा खुप मोठा प्रश्न होता.

तसेच बँकादेखील आजच्या इतक्या मोठ्या प्रमाणात सहज, सोप्या पद्धतीने ऑनलाईन व्यवहार करत नव्हत्या. नेट बँकिंगची पद्धतही खुपच नवी होती. जेमतेम देशाच्या १० टक्के लोकांना ती अवगत होती. त्यामुळे सामान्य पर्यटकांचा म्हणावा तसा प्रतिसाद या पोर्टलला मिळत नव्हता.

 

online booking inmarathi

 

एकिकडे बिजनेस नाही मात्र कामावरील नोकरदार मंडळी आणि उच्चपदस्थ अधिकारी आणि डायरेक्टर्स यांचे पगार मात्र वेळेवर द्यावे लागत होते.

पहिल्या २ वर्षांनी तर स्थिती आणखी बिघडली. ना नफा- ना तोटा या पेक्षाही कंपनीची आर्थिक घडी विस्कटली जात होती. पुढे २००५ साली मात्र थोडा फरक पडला.

जोरदार मार्केटिंग करत आणि लोकांशी प्रत्यक्ष भेटून सर्व्हे करत स्वतःच्या पोर्टलमध्ये आवश्यक त्या सुधारणा केल्यानंतर आर्थिक स्थिती हळूहळू पुर्वपदावर येऊ लागली.

त्यातच 2005 साली भारतीय रेल्वेने ऑनलाईन तिकीट बुक करण्याची सुविधा देशभरात सुरू केली आणि अचानक म्हणावे तसे सकारात्मक बदल घडू लागले.

याचाही फायदा दिप यांनी करुन घेतला. त्यांच्याच पोर्टलवरून रेल्वे, विमान आणि हॉटेल निवासाची थेट ऑनलाईन सुविधा चालू केली मग मात्र दिप यांनी मागे वळून पाहिलेच नाही.

पुढच्याच वर्षी २००६ साली मेक माय ट्रिप वरुन संपूर्ण सहलीच्या पॅकेजचे बुकिंग ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले आणि पर्यटकांच्या नियोजनाचा मार्ग आणखी सोपा झाला.

सहल ठिकाण ठरवणे इथपासून ते तेथे कसे पोहोचायचे, कुठे राहायचे, काय पहायचे, स्थानिक भागांमध्ये कसे फिरायचे, तेथील जेवणा-खाण्याच्या विशेष गोष्टी कोणत्या, शॉपिंग काय करायचे हे सर्व पर्यटकांना एकाच पोर्टलवर उपलब्ध होऊ लागल्याने मोठीच सोय झाली.

२००५ – २००६ सालापासून उभारी धरल्यानंतर २००८ पर्यंत बिजनेस खुपच वाढला. २०१० साल संपताना जवळपास २ लाख समाधानी ग्राहकांसह कंपनीने सुमारे ५ दशलक्ष अमेरिकन डॉलर टर्नओव्हर पार केला.

२०१० साली जग विशेष करुन भारत जागतिक मंदीच्या विळख्यात असतानाही या पोर्टलची स्थिती उत्तम होती आणि बिजनेस जोमाने वाढत होता. याचे मुख्य कारण म्हणजे सतत काहीतरी नवे देण्याचा ध्यास आणि चाकोरीबाहेरचा विचार!

 

make my trip inmarathi 2

 

२०१३ सालापर्यंत कंपनीची एकूण संपत्ती ५० दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी प्रचंड झाली. २०१४ साली कंपनीने एक नवा पायंडा पाडला आणि सर्वांसमोर एक आदर्श उभा केला.

तो नवा पायंडा म्हणजे टुरिझम क्षेत्रात नव्याने सुरूवात करणाऱ्यांसाठी भांडवलाच्या उपलब्धतेसह त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यास मेक माय ट्रीपने सुरुवात केली.

आंतरराष्ट्रीय ब्रँड्स आणि कंपन्यांचे मेक माय ट्रिप मध्ये अधिग्रहण आणि विलीनीकरण

 • २०११ साली एमएमटीने सिंगापूरस्थित ट्रॅव्हल कंपनी विकत घेतली.
 • २०११ च्या ऑगस्टमध्ये एमएमटीने ले ट्रॅव्ह्यून्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड विकत घेतले.
 • माय गेस्ट हाऊस (माझे निवास) – दिल्ली येथील बजेट लॉजिंग हॉटेल ऑपरेटर नोव्हेंबर २०११ मध्ये एमएमटीकडून अधिग्रहित केले गेले.
 • २०१२ मध्ये एमएमटीने थायलंड देशातील आयटीसी कंपनी विकत घेतली.
 • नोव्हेंबर २०१२ मध्ये एमएमटीने थायलंड, सिंगापूर आणि मलेशियामधील कार्यरत हॉटेल ट्रॅव्हल ग्रुप (एचटी ग्रुप) विकत घेतला.
 • फेब्रुवारी २०१४ मध्ये एमएमटीने ईटीबी हा आम्सटरडॅम मधील स्थित ऑनलाइन हॉटेल ऑपरेटर ग्रुप विकत घेतला.
 • २०१५ साली एमएमटीने माय-गोला नावाचे एक छोटे स्टार्ट अप विकत घेतले जे मुळचे प्रवासी मार्गदर्शक (गाईड) आहे.

mmt inmarathi

अचिव्हमेंट आणि पारितोषिके

 • एसएसटीचे अध्यक्ष हे नॅसकॉम इंटरनेट वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत
 • नॅसकॉमच्या कार्यकारी समितीचे सदस्य
 • सीआयआय च्या पर्यटन उपसमितीचे सदस्य
 • वर्ल्ड ट्रॅव्हल अवॉर्ड्स – २०१३, २०१४ दोन्ही वर्षी भारतातील बेस्ट ट्रॅव्हल पोर्टल इंडिया म्हणून सन्मानित
 • ईटी रिटेल पुरस्कारांद्वारे २०१३ आणि २०१४ दोन्ही वर्षी ई-टेलर ऑफ द इयर म्हणून सन्मानित
 • वर्ष २०११ – टाइम्स ट्रॅव्हल ऑनर्सद्वारा बेस्ट ऑनलाईन ट्रॅव्हल सर्व्हिस फर्म म्हणून पुरस्कार
 • वर्ष २०१० ते २०१३ – सलग ४ वर्षे ग्रेट प्लेस टू वर्क इन्स्टिट्यूट यांच्याद्वारा भारतात काम करण्यासाठी दहा सर्वोत्कृष्ट कंपन्यांपैकी एक म्हणून सूचीबद्ध

तर असा हा दिप कार्ला यांचा आणि मेक माय ट्रिप या ट्रॅव्हल पोर्टलचा प्रवास. नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आणि सतत नवं काहीतरी उर्जा देणारा ठरेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?