' कोविड नंतर बिझनेस सुरू करण्यासाठी हे ९ पर्याय आहेत खुले!

कोविड नंतर बिझनेस सुरू करण्यासाठी हे ९ पर्याय आहेत खुले!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

कोविडमुळे जगात एक वेगळेच संकट आलेलं आहे. काही काही ठिकाणी सहा सहा महिने लॉकडाऊन लावावा लागला. यामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे ठप्प झाले. याशिवाय अनेक वेगवेगळ्या समस्याही निर्माण झाल्या.

त्यामध्ये आरोग्याच्या तक्रारी वाढल्या, शाळा बंद असल्यामुळे शिक्षण बंद पडले. लोकांच्या मानसिक तणावात भर पडली, मानसिक समस्या उद्भवल्या.

जगभरात लाखो लोकांनी कोविड मुळे स्वतःचा प्राण गमावला आहे. परंतु जितक्या लोकांनी प्राण गमावला आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त लोकांना कोविडमुळे उद्भवलेल्या वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला आहे.

 

lockdown inmarathi

 

जे अनेक नवीन स्टार्टअप चालू झाले होते त्यांच्या आर्थिक नुकसानीत भर पडली. कित्येक लोकांनी आपले स्टार्टअप बंद केले. काळ कठीण आहे खरा पण या काळात जे तग धरतील तेच वाचतील हे ही खरं आहे.

म्हणूनच असेही काही लोक आहेत की, ज्यांनी या आपत्तीत देखील बिझनेस साठी नवीन मार्ग मिळवला. या जागतिक महामारीने दिलेलं हे न्यू नॉर्मल आहे. असेच बिझनेसचे नवीन मार्ग बघूयात.

हे ही वाचा –

===

 

१. ऑनलाईन शिक्षण :

 

online education inmarathi

 

सध्याच्या काळाची गरज म्हणजे ऑनलाईन शिक्षण. जितका लोकसंपर्क कमी तितका धोका कमी, म्हणून शाळा बंद आहेत. पालकही मुलांना शाळेत पाठवायला तयार नाहीत.

महाराष्ट्रात आपण पाहिलंच आहे की, शाळा सुरू झाल्या तरी मुलांची उपस्थिती नगण्य आहे. म्हणूनच मग ऑनलाईन शिक्षक होणे सध्या एक व्यवसाय म्हणून पाहिला जातोय.

मुले घरीच आहेत, पण त्यांचा अभ्यास देखील होणे जरुरीचे आहे. आजकालचे जागरूक पालक मग अशा ऑनलाईन शिकवणाऱ्या शिक्षकांच्या शोधात आहेत.

त्यामुळे ज्यांना शिकवण्याची आवड आहे त्यांनी याकडे व्यवसाय म्हणून पाहायला हरकत नाही.

 

२. आरोग्य :

 

medical sector inmarathi

 

ह्या कोविडचं जगभर थैमान सुरू झालं आणि स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लोकांचे प्रयत्न सुरू झाले. ह्या काळात सगळ्यात जास्त कोणतं क्षेत्र जोरात चाललं असेल तर ते आरोग्य आणि आरोग्यपूर्ण सुविधा मिळवण्यासाठी धडपड.

हेल्दी आणि फीट राहण्यासाठी लोकांची धडपड सुरू झाली. त्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट करून घेणे, मेडिकल उपकरणे वापरून स्वतःची तपासणी करून घेतली जात आहे.

आणि पुढेही याबाबत जागरूकता निर्माण झाल्यामुळे या क्षेत्रात करिअर करण्यासाठी वाव आहे. ऑनलाईन फिटनेस कन्सल्टन्सी करता येईल. ऑनलाईन आहारतज्ज्ञ बनून सल्ला देता येईल.

 

३. आर्थिक क्षेत्र :

 

finance sector inmarathi

 

जगभरात जरी अर्थव्यवस्थेत मंदी आलेली असली तरी, त्याच क्षेत्रात रोजगाराच्या संधी देखील उत्पन्न होत आहेत. बेरोजगारी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यामुळे वित्तीय संस्थांकडे निधीची मागणी वाढली आहे.

लोकांना कर्ज काढायचे आहे. पुढील भविष्यासाठी नवीन व्यवसाय चालू करायचा आहे. त्याचवेळेस बँकिंग प्रणाली कॉम्प्युटराइज्ड असणे गरजेचे आहे.

ज्यांना कॉम्प्युटर आणि आर्थिक क्षेत्रातील ज्ञान आहे त्यांना इथे रोजगाराच्या संधी उत्पन्न होतील.

 

४. रिमोट वर्किंग टूल्स :

 

web development inmarathi

 

आजकाल रिमोट वर्किंग टूल्स वापरून काम करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. या एप्लिकेशन्सनी अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली आहे. यामुळे अधिक चांगले उत्पादनावर भर देण्यात येतो.

त्यामुळे विविध ब्रँड्स जगभर सहज उपलब्ध होतील. यामध्ये वेब डिझाइन, फ्री लान्सिंग लेखन करता येईल. त्याचबरोबर एखाद्या गोष्टीची ऑनलाईन विक्री देखील करता येईल.

हे ही वाचा –

===

५. इ कॉमर्स आणि घरपोच सेवा :

 

e commerce inmarathi

 

जसजसा कोविडचा प्रादुर्भाव वाढला तसा लोकांनी अंतर पाळणे, काळजी घेणे यावर भर दिला. म्हणूनच दुकानांमधून, मॉल मधून सामान आणण्याचे लोकांनी टाळले.

याच्या उलट लोकांचा ऑनलाईन खरेदीकडे कल वाढला. बाकीचे व्यवसाय ठप्प झाले तरी या व्यवसायाची या काळात चलती आहे.

सामान घेण्यापासून लोकांपर्यत पोहचवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी माणसांची गरज लागतेय, त्यामुळे या क्षेत्रातही रोजगार आणि बिझनेसच्या संधी उपलब्ध आहेत.

यामध्ये महिलांना देखील काम करता येईल. एखादा छोटासा गृहउद्योग करून त्याची माहिती ऑनलाईन देऊन तो लोकांपर्यंत पोहोचवता येईल.

 

६. ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन गेमिंग :

 

ott platform inmarathi

 

सध्याच्या काळात एन्टरटेन्मेटची सगळी साधन बंद आहेत. सिनेमा हॉल, नाट्यगृह बंद आहेत. त्यामुळे आता ओटीटी प्लॅटफॉर्म वर सिनेमे रिलीज केले जात आहेत.

म्हणजे अमेझॉन प्राईम, netflix, hotstar, इत्यादी. तसेच खेळण्याची ठिकाणे देखील बंद असल्यामुळे ऑनलाईन गेमिंगला डिमांड आहे. त्यामुळे या क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी इथे नक्कीच वाव आहे.

 

७. फार्मा, pathology/लॅब्स :

 

pharma lab inmarathi

 

सध्या फार्मा, लॅब्स या क्षेत्रातही मागणी वाढली आहे. कारण कोविड मुळे प्रत्येकजण आपल्या तब्येतीबाबत जागरूक झाला आहे. आता लहानथोर सगळ्यांनाच चांगल्या औषधोपचाराची गरज आहे.

अगदी यावरील लस आल्यावर देखील, ती लस प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचे आव्हान असणार आहे. त्यामुळे इथे करिअर करता येण्यासारखे आहे.

सध्या लोकांना घरपोच सेवा मिळत असेल तर त्याचाही फायदा घ्यायचा आहे. रक्त तपासणी घरी येऊन केली जात आहे. औषधं लोक घरी मागवत आहेत.

याबाबत जागरूकता वाढली आहे. त्यामुळे या क्षेत्रात सेवा देण्यात लोकांची आवश्यकता भासणार आहे.

 

८. ऑफिसच्या कामासाठी जागा देणे :

 

workplace inmarathi

 

सध्या मोठमोठ्या ऑफिसात लोकांना कामासाठी बोलावणे धोकादायक आहे. त्यामुळे कॉर्पोरेट कंपन्यांतील लोक, स्टार्टअप मध्ये काम करणारे, रिअल इस्टेट मध्ये काम करणारे या सगळ्यांच्याच घरी ऑफिस कामासाठी पोषक वातावरण नसते.

तसेच छोट्या कंपन्यांना जागा घेऊन भाडे भरणे शक्य नाही. लोकांना थोड्यावेळासाठी देखील ऑफिसचे फिलिंग देणारी जागा हवी असते.

जिथून कॉल अटेंड करता येईल, छोटीशी मीटिंग अरेंज करता येईल.

त्यामुळे अशी जागा ज्यांच्याकडे आहे त्यांनी थोड्याशा ऑफीस साठी लागणाऱ्या बेसिक गोष्टी देऊन ती जागा लोकांना उपलब्ध करून दिल्यास ते देखील एक पैसे कमावण्याचे साधन बनत आहे.

 

९. ऑनलाईन करता येणारे इतर व्यवसाय :

 

online music inmarathi

 

वेगवेगळे ऑनलाईन कोर्सेस चालू करता येईल, ज्यात ऑनलाईन संगीत, नृत्य शिकवता येईल. ऑनलाईन फिटनेस क्लासेस चालू करता येतील, यात ऑनलाईन योगा क्लासेस घेता येतील.

ऑनलाईन फोटोग्राफीचा क्लास देखील सुरू करता येईल. ऑनलाईन कुकींग क्लासेस देखील घेता येतील. ही माहिती तुम्ही तुमच्या सोशल मीडिया अकाउंट वरून लोकांपर्यत पोहचवू शकता. त्यामुळे या व्यवसायांची वृध्दी होऊ शकते.

एखादा छोटा लघुउद्योग चालू करता येईल. प्रॉडक्ट तयार करणे त्यांची ऑनलाईन विक्री करणे किंवा ई कॉमर्स कंपन्यांना आपला माल विकणे इत्यादि.

आजवर माणसावर अनेक संकटं आलेली आहेत. परंतु त्यातूनही माणसाने मार्ग शोधला आहे. कोविड चे हे संकट ही माणूस परतवून लावेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?