' "असले" सीन दाखवणाऱ्या नेटफ्लिक्सला केवळ बॉयकॉट करून भागणार नाही, वाचा!

“असले” सीन दाखवणाऱ्या नेटफ्लिक्सला केवळ बॉयकॉट करून भागणार नाही, वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मनोरंजन क्षेत्र हे समाजाला आरसा दाखवतं असं मानलं जातं. जे समाजात घडतं तेच या माध्यमातून लोकांसमोर वेगळ्या पद्धतीने मांडायचा यातून प्रयत्न केला जातो.

पण गेल्या काही वर्षांपासून अगदी पद्धतशीरपणे या माध्यमातून एका विशिष्ट समुदायाची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचे प्रयत्न होताना आपल्याला दिसत आहे. आणि जेंव्हापासून भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मचा शिरकाव झाला आहे तेंव्हापासून हा प्रकार आणखीनच वाढला आहे.

याचं अगदी ताजं उदाहरण द्यायचं झालं तर गेले २ दिवसापासून ट्विटर वर एक ट्रेंड फार बघायला मिळतोय ते म्हणजे #boycottnetflixindia. हा ट्रेंड का सुरू झाला तर मीरा नायर हिच्या “अ सुटेबल बॉय” या नेटफ्लिक्स वर रिलीज झालेल्या सिरिजमधल्या एका सीनमुळे. 

ही वेबसिरीज पहिले HBO one वर रिलीज केली गेली मग गेल्याच महिन्यात नेटफ्लिक्सने ही सिरिज आपल्या प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करायला सुरुवात केली आहे!

या सीन मध्ये एक हिंदू मुलगी एका मुस्लिम मुलाला मंदिराच्या आवारात कीस करते. या एका सीनमुळे सध्या सगळेच बायकॉट नेटफ्लिक्सची मागणी करताना दिसत आहेत.

 

netflix boycott inmarathi

 

पण केवळ या सिरिज मधला एकमेव सीन आक्षेपहार्य नसून ही सिरिजच या विकृत मानसिकतेतून बनवली गेली आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे.

 या लेखातून या सिरिजविषयी आणि डिजिटल माध्यमांवर रिलीज होणाऱ्या अशा बऱ्याच कंटेंट विषयी जाणून घेऊया.

तूर्तास या सुटेबल बॉय विषयी. या सिरिज मधल्या मेहरा परिवारातल्या लता साठी तिची आई एक सुटेबल बॉयच्या शोधात असते. पण या सिरिज मध्ये लताच इतकी गोंधळलेली दाखवली आहे की तीला स्वतःसाठी काय चांगलं काय वाईट हे सुद्धा समजत नाहीये!

प्रथम ती एका मुस्लिम मुलाच्या प्रेमात पडते. तो मुस्लिम मुलगा साहजिकच खूप लिबरल दाखवला आहे, त्याचे विचार खूप ऊंची आहेत, खूप शिकलेला आहे वगैरे वगैरे. पण जेंव्हा लताच्या आईला ही गोष्ट कळते तेंव्हा ती लताला घेऊन आपल्या भावाकडे जाते!

तिथे सुद्धा ती एका हिंदू मुलाच्या पुन्हा प्रेमात पडते, आणि एकंदरच ही भरकटलेली कथा हळू हळू धार्मिक आणि जातीय रंग घेऊ लागते!

या सिरिज मध्ये केलेलं भारताचं चित्रण पाहून आपल्याला हसायला येतं. हिंदू मुस्लिम समुदायातल्या लोकांना स्टीरियोटाइप करणं. हिंदू लोकांना सतत मुस्लिमांचा द्वेष करताना दाखवणं, मुस्लिम मशिदीसमोर जाणून बुजून एका हिंदू मंदिराचं बांधकाम होताना दाखवणं, वगैरे वगैरे!

या बरोबरच दोन्ही समुदायातल्या लोकांचे विचार खूप विभिन्न दाखवणं, मोहरम जुलूस आणि शोभा यात्रा या दोन्हीच्या वेळेस दाखवलं गेलेलं चित्रण कलुषित प्रवृत्तीचं दर्शन घडवतं!

 

a suitable boy inmarathi

 

या अशा कित्येक सीन्स समोर तो मंदिरात दाखवलेला सीन हा क्षुल्लकच म्हणावा लागेल.

पण तरीही या इंडस्ट्री मधली लोकं हे असले propaganda घेऊन अशा कलाकृती आपल्यासमोर मांडतायत तरी कसे? यांना कुणीच विरोध का करत नाही? आत्ताच्या एका सीन वरूनच लोकांना नेटफ्लिक्स बॉयकॉट करायची उपरती का झाली?

अशा कित्येक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपल्याला थोडं मागे जायला लागेल. नेटफ्लिक्सने जेंव्हा त्यांची पहिली इंडियन सिरिज काढली जीच नाव होतं सेक्रेड गेम्स. या सिरिज मध्ये तर हिंदू संस्कृति आणि भारतीय समाज यांचं फार चुकीचं चित्रण झालं होतं!

त्या सिरिज मधल्या कित्येक सीन्स मधून हिंदू मुस्लिम द्वेष उघडपणे पसरवला जात होता. ती सुद्धा सिरिज अशाच एका लेखकाच्या नोव्हेलवर आधारित होती!

या कलाकारांना अशाच लेखकांची पुस्तकं का मिळतात ज्यांची विचारधारा यांच्या विचारधारेशी जुळते? देशात बाकी कुणीच पुस्तकं लिहीत नाही का? त्यांना पुरस्कार मिळत नाहीत का?

 

sacred games inmarathi

 

एकंदरच या एंटरटेनमेंट इंडस्ट्री मध्ये या तथाकथित लिबरल, डाव्या विचारसरणीच्या लोकांचं वर्चस्व आहे.

त्यामुळे ही लोकं सतत त्यांच्या सिनेमातून, कलाकृतीतून, लिखाणातून भारतीय संस्कृतिचे धिंडवडे काढत असतात. भारतीय समाज अजूनही कीती रूढीवादी आहे, कट्टर आहे असा narrative ही लोकं त्यांच्या कलाकृतीतून मांडायचा प्रयत्न करत असतात!

दहशतवादाला जस्टीफाय करणं, नक्षली लोकांना क्रांतिकारी दाखवणं, सामाजिक घृणा, हिंदू फोबिक इमेज लोकांसमोर मांडणं अशा कित्येक गोष्टी ही लोकं त्यांच्या कलाकृतींच्या माध्यमातून पद्धतशीरपणे मांडत आले आहेत!

ही गोष्ट फक्त डिजिटल माध्यमातच होत आहे असं नाही. सिनेइंडस्ट्री मध्ये सुद्धा हा selective agenda तुम्हाला बऱ्याचदा बघायला मिळतो. उरी किंवा परमाणू सारख्या सिनेमांना हे लोकं jingoism सारखी लेबलं लावतात, तर न्यूटन किंवा हैदर सारख्या फिल्म्सना ही लोकं पुरस्कृत करतात!

प्रश्न हा फक्त पुरस्कारांचा नाहीये. समोरच्या व्यक्तीच्या विचारधारेला समजून न घेता विरोधाला विरोध करणाऱ्या विकृत मानसिकतेचा आहे.

 

uri parmanu inmarathi

 

बरं यावर बायकॉट हा एकच पर्याय आहे का? तर नाही. सध्या डिजिटल माध्यमांवर सरकारची नजर आहे. ही डिजिटल माध्यमं बायकॉट करून काहीच साध्य होणार नाहीये!

कारण या विचारधारेशी जोडलेली माणसं प्रत्येक क्षेत्रात आहेत. डिजिटल असेल, फिल्म्स असेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल, प्रिंट किंवा इलेक्ट्रोनिक मीडिया असेल. सगळीकडेच ही लोकं अगदी पद्धतशीरपणे ही विचारधारा प्रमोट करत आहेत!

तुम्ही नेमकं काय काय बॅन आणि बायकॉट करणार? उलट बायकॉट हा शब्द वापरुन आपणच यांच्या विचारधारेला खतपाणी घालत आहोत. त्यांचे विचार अगदी बरोबर आहेत हेच आपण यातून सिद्ध करत आहोत!

या सगळ्या प्रकाराच्या विरोधात सांविधानिक भाषेत आपला विरोध नोंदवणे हे एमकेव कर्तव्य आपले आहे आणि ते आपण केलंच पाहिजे. नुसतं #boycott चा ट्रेंड चालवून गोष्टी बदलणार नाहीत. 

 

boycott inmarathi

 

या विषयी प्रत्येकाने जसं होईल तसं भाष्य केलं पाहिजे, विरोध दर्शवला पाहिजे. नाहीतर हे असे ट्रेंड काय दर दिवसाला बदलत असतात पण खरोखरच हे चित्र बदलायचं असेल तर प्रत्येकाने यावर भाष्य केलंच पाहिजे!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?