' "कॅप्चा" म्हणजे काय? त्याचा उपयोग? प्रत्येकाने सुरक्षिततेसाठी वाचावी अशी माहिती

“कॅप्चा” म्हणजे काय? त्याचा उपयोग? प्रत्येकाने सुरक्षिततेसाठी वाचावी अशी माहिती

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या सहज वापरामुळे बँकिंग, बिल पेमेंट या गोष्टी किती सोप्या झाल्या आहेत हे आपण अनुभवतच आहोत. आज आपल्या सारखे कित्येक लोक आहेत ज्यांना वर्षानुवर्षे कधीच बँकेची पायरी चढावी लागली नाहीये.

आज कोणत्याही व्यक्तीला आपण अगदी कमी वेळात पैसे ट्रान्स्फर करू शकतो. गुगल पे, UPI सारख्या सोयींमुळे ऑनलाईन व्यवहार हे मागच्या काही वर्षात किती तरी पटीने वाढले आहेत.

सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक असलेल्या भारताची अर्थव्यवस्था सुद्धा जर अग्रक्रमावर न्यायची असेल तर डिजिटल पेमेंटचं प्रमाण वाढवणे हा एक उपाय आहे. हे सहज शक्य आहे. गरज आहे ती फक्त सतर्कतेची आणि शिकण्याची आणि प्रत्येकाने एका व्यक्तीला इंटरनेट बँकिंग शिकवण्याची.

इंटरनेट बँकिंगचा वापर करताना प्रत्येक युजरने एक लॉगिन ID आणि पासवर्ड सेट केलेला असतो. आपण तो कोणासोबत सुद्धा शेअर करू नये हे वारंवार बँक आपल्याला सांगत असते. जर अनावधानाने ही माहिती कोणाच्या हातात पडली किंवा तुम्ही वापरत असलेल्या लॅपटॉपवर ती माहिती सेव्ह झाली असल्यास तुमच्या बँक अकाउंट मधील पैश्यांचा गैरवापर होऊ शकतो.

हे होऊ नये म्हणून आपण तर काळजी घेतोच; पण त्यासोबत बँकेच्या वेबसाईट वर लॉगिन करायच्या आधी चार ते पाच लेटर्सचा एक सेट आपल्या समोर येत असतो आणि त्यानंतरच आपण आपल्या अकाउंटच्या माहिती पर्यंत पोहोचू शकत असतो. या अतिरिक्त सुरक्षा पंचाक्षरीला ‘कॅपचा’ (CAPTCHA) असं नाव आहे.

 

 

 

‘कॅप्चा (CAPTCHA)’ चा मुख्य उद्देश हा आपल्या अकाउंटला लॉगिन करणारी व्यक्ती ही आपणच आहोत आणि कोणता रोबोट तर नाहीये ही खात्री करून घेणं असतं. CAPTCHA चा फुल फॉर्म हा Completely Automated Public Turing test to tell Computers and Humans Apart म्हणजेच अशी टेस्ट जी ‘पूर्णपणे ऑटोमॅटिक पब्लिक चेकिंग करण्याची आहे जी रोबोट आणि माणसांना एकमेकांपासून वेगळं करते.’

Alan Turing ह्यांना “मशीन्स या मनुष्या प्रमाणे विचार करू शकतात का ?” हा प्रश्न पडला आणि त्यांनी Turing Test ही तयार केली होती. सुरुवातीला ही टेस्ट मशीनने क्लिअर केली होती. नंतर यात बरेच बदल करण्यात आले.

‘कॅप्चा (CAPTCHA)’ मध्ये लेटर आणि नंबरचं असं काही एकत्रीकरण आहे जे एक रोबो समजू शकणार नाही आणि ते समजायला मानवी मेंदूच लागेल.  १९९७ मध्ये शोध लागलेल्या या तंत्रज्ञानाला नाव २००३ मध्ये लुईस अहन आणि जॉन लँगफोर्ड या जोडीने हे नाव दिलं होतं.

सुरुवातीला या प्रणालीला विरोध झाला होता. प्रामुख्याने त्या लोकांकडून ज्यांना यातील बारीक अक्षरं दिसणं अवघड जायचं. त्यानंतर हा विरोध ‘कॅप्चा’ सोडवण्यात वेळ जातो या कारणामुळे सुद्धा झाला होता, पण नंतर हा विरोध कमी झाला. कारण, एका अभ्यासातून हे समोर आलं, की एक ‘कॅप्चा’ सोडवण्यासाठी फक्त दहा सेंकद लागतात किंवा लागायला हवेत.

 

‘कॅप्चा (CAPTCHA)’ कसा तयार होतो?

captcha inmarathi2

 

‘कॅप्चा’ टेस्ट ही काही लेटर्स आणि स्पष्ट न दिसणाऱ्या नंबर्सचं एकत्र येणं असतं. स्पष्ट नसलेले लेटर हे कोणताही रोबो वाचू शकत नाही, पण आपली वाचायची आणि बघण्याची क्षमता ही रोबोटपेक्षा सुस्पष्ट असते. आपण कोणतेही लेटर किंवा चित्र बघून त्यातून काही अर्थ समजू शकतो हे मानवी मेंदूचं वैशिष्ट्य आहे.

कॉम्प्युटरची भाषा ही फक्त ० आणि 1 मध्ये असते. त्यामुळे स्क्रीनवर आलेल्या अक्षरांवर एखादी रेष असल्यास कॉम्प्युटरला ती वाचता येत नाही., पण आपण त्यामागे दडलेल्या अक्षरांचं व्यवस्थित आकलन करू शकतो.

‘कॅप्चा’मध्ये फक्त आकडे किंवा फक्त अक्षरं असू नयेत, नाही तर रोबोला ते शिकवणं सोपं जाऊ शकतं. ‘कॅप्चा’ मध्ये नावीन्य आणण्यासाठी अल्गोरिदमचा वापर केला जातो. यामुळे अस्पष्ट अक्षरं ही सिस्टीम मधून रँडम पद्धतीने निवडले जातात आणि स्क्रीन वर दाखवले जातात.

‘कॅप्चा’ मध्ये सतत नवीन शब्द येत राहण्यासाठी कित्येक पुस्तकांची डिजिटल आवृत्ती तयार करण्यात येत आहे, त्यामुळे सिस्टीमचा शब्दसाठा वाढतो आणि वेगवेगळे शब्द या अल्गोरिदम पद्धतीने समोर येण्यास उपलब्ध होत राहतात.

काही ‘कॅप्चा’ हे वाचायला सोपे असतात, तर काही फारच क्लिष्ट असतात. आपण बघितलं असेल, की काही वर्षांपासून एक नवीन पद्धत सुरू झाली ज्यामध्ये आपल्याला “I’m not a robot” या बॉक्स वर क्लिक करावं लागतं. 

 

captcha inmarathi

 

उदाहरण सांगायचं तर, “या फोटोतील मांजर असणाऱ्या फोटो वर क्लिक करा” ही सूचना दिली असते आणि नंतर आपल्याला verify वर क्लिक करायला सांगितलं जातं. चित्र नीट दिसत नसेल तर खाली ते बदलण्याची, आवाज येण्याची आणि तक्रार नोंदवण्याची सुद्धा सोय असते.

ज्या व्यक्तींची दृष्टी ही कमजोर असते त्यांच्यासाठी ऑडिओ ‘कॅप्चा’ ची सोय केली जाते. हे व्यक्ती एखादा फॉर्म भरण्यासाठी किंवा बँकेच्या कामासाठी कोणाच्या तरी सहाय्याने फॉर्म भरतांना त्यांची फसगत होऊ नये हा देखील हेतू ऑडिओ ‘कॅप्चा’ मुळे साध्य होत असतो.

‘नो कॅप्चा’ किंवा ‘रि कॅप्चा’:

ज्याप्रकारे डेव्हलपर्स ‘कॅप्चा’ तयार करण्याचे वेगवेगळे प्रकार शिकले, तसंच हॅकर्स, स्पॅमर्स सुद्धा त्यांना सोडवण्याची पद्धती शिकले. गुगलच्या एका अहवालात असं सांगितलं होतं की, “आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या काळात ९९.८% ‘कॅप्चा’ हे रोबो ब्रेक करू शकतात.”

कितीही अवघड ‘कॅप्चा’ तयार केले, तरी हा प्रश्न सुटण्यासारखा नव्हता. माणसाला सोपे जावेत आणि रोबोला कळणार नाहीत असे काही सोपे गणित किंवा एखादं लेटर टाईप करायला लावणे हा गुगल चा या प्रश्नावर तोडगा आहे.

 

 

‘कॅप्चा’ तयार करताना आता गुगल सगळी माहिती जसं, की तुम्ही कुठून लॉगिन केलं आहे?, कोणते शब्द जास्त वेळेस टाईप करता?  याद्वारे ‘कॅप्चा’ तयार होतात जे, की फक्त मनुष्यच सांगू शकतो.

शाळा, कॉलेजचे फॉर्म्स, तिकीट काढायच्या वेबसाईटवर ‘कॅप्चा’चा वापर हा अधिक केला जातो. ज्या ब्लॉग्जवर ट्रोल होणाऱ्या कमेंट येऊ शकतात तिथे सुद्धा आजकाल ‘कॅप्चा’ चा वापर होत आहे. ऑनलाईन मतदान, इमेल ID ठराविक व्यक्तींनाच कळावा यासाठी ‘कॅप्चा’ चा वापर हा योग्य मानला जातो.

गुगलने तयार केलेले ‘कॅप्चा’ सुद्धा २० सेकंदात रोबोने क्रॅक केल्याचा ७०% डेटा समोर आला आहे. हीच पद्धत फेसबुकने वापरली तर ८३% ‘कॅप्चा’ हे हॅकरला ब्रेक करता आले हे समोर आलं. या डेटा नंतर ‘नो कॅप्चा’ आणि ‘रि कॅप्चा’ ही पद्धत जास्त पसंत केली जात आहे ज्यामध्ये हॅकरला यश मिळण्याची टक्केवारी ही कमी होऊन ५०% इतकीच आहे.

सायबर सिक्युरिटी हा सध्या कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे ‘कॅप्चा’चा किती जरी कंटाळा आला किंवा त्रास वाटला, तरीही ती पद्धत आता कायमस्वरूपी असेल असंच तज्ञ सांगतात.

महत्वाचे काम करत असतांना ते पूर्ण लक्ष देऊन करायची आपणच स्वतःला सवय लावूया. सतर्क राहून आपल्या मेहनतीच्या कमाईचं, कामाचं रक्षण करूया. रोग झाल्यावर इलाज करण्यापेक्षा तो होऊ नये हे बघूया.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?