' माझे फोटो शेअर करू नका, झायरा असं का म्हणतेय, वाचा!  

माझे फोटो शेअर करू नका, झायरा असं का म्हणतेय, वाचा!  

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

चित्रपट सृष्टी आणि मनोरंजन विश्वातील मंडळी भारतात फार लवकर प्रसिद्धी मिळवतात. एकदा या क्षेत्रात प्रसिद्धी मिळाली, की त्यांचं आयुष्य वैयक्तिक राहत नाही. सगळं काही सार्वजनिक होऊन जातं. त्यांची चाहते मंडळी असोत, किंवा प्रसारमाध्यमं, सगळेच हात धुवून त्यांच्या मागे लागतात.

त्यांच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा खूप चर्चा होते. आज तर सोशल मीडियावर अनेक पर्याय उपब्ध असल्यामुळे, सेलिब्रिटी मंडळींच्या बातम्या वाऱ्याप्रमाणे पसरायला वेळ लागत नाही. अर्थात, चाहत्यांचं प्रेम सुद्धा या सोशल मीडियावर व्यक्त होतंच असतं.

इंस्टाग्रामसारख्या सोशल साईट्सवर ‘फॅन पेज’ या संकल्पनेने सुद्धा यामुळेच आकार घेतला आहे. आपल्या लाडक्या सेलिब्रिटीचं ‘फॅन पेज’ तयार करून, त्यावर भरपूर फॉलोअर्स मिळवण्याचा प्रयत्न ही चाहते मंडळी हमखास करत असतात.

मात्र, अशाच एका बॉलीवूड सेलिब्रिटीने चाहत्यांना एक निराळंच आवाहन केलं आहे. तिने तिची ‘फॅन पेजेस’ बंद करून त्यावर उपलब्ध असलेले तिचे सगळे फोटो काढून टाकण्याची विनंती तिच्या चाहत्यांना केली आहे.

 

zaira-wasim-inmarathi

 

बॉलीवूडमधील ही अभिनेत्री आहे झायरा वसिम! ‘दंगल’, ‘सिक्रेट सुपरस्टार’ अशा चित्रपटांमधून आपल्या उत्तम अभिनयाची दाखल तिने घ्यायला लावली. या ब्लॉकबस्टर चित्रपटांमधून सुप्रसिद्ध झालेली ही अभिनेत्री यापुढे मात्र चित्रपटांमध्ये दिसणार नाही. तिने मनोरंजन विश्वातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ती यापुढे धर्माचं काम करणार असल्याचं तिने म्हटलं आहे. त्यामुळेच तिने ही निवृत्ती स्वीकारली आहे. इस्लाम धर्माची कट्टरता यातून निश्चितपणे अधोरेखित होते. धर्माचे काम करत असताना, तिला आधी मिळालेलं ग्लॅमर, तिची प्रसिद्धी याचा मागमूस उरू नये यासाठी ती प्रयत्न करत आहे.

मुळात ‘दंगल’ या सिनेमासाठी तिने तिचे केस कापण्याचा घेतलेला निर्णय, हाच मोठ्या चर्चेचा विषय ठरला होता. तिने इस्लाम धर्मविरोधी काम केलं असल्याचं बोललं गेलं. यावरून ती बराच काळ चर्चेत राहिली.

 

zaira-wasim-dangal-inmarathi

 

अभिनयाची गरज म्हणून तिने काय करावं याची मुभा सुद्धा तिला इस्लाम धर्मात मिळाली नाही. तिने केस बारीक करण्याचा घेतलेला निर्णय हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे. धर्माने हस्तक्षेप करून एका स्त्रीच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काहीच कारण नाही.

 

zaira-mufti-inmarathi

 

काश्मीरमधील राजकीय नेत्या आणि तत्कालीन मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी झायराचा उल्लेख ‘काश्मीरची रोल मॉडेल’ असा केला. यामुळे तर अनेकांचा बराच थयथयाट झालेला पाहायला मिळाला. तिला जीवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. याबद्दल तिने सोशल मीडियावर माफीनामा सुद्धा जाहीर केला होता. ही पोस्ट तिने नंतर डिलीट केली, मात्र तोवर ती सगळ्यांपर्यंत पोचली सुद्धा होती.

हा झाला यातील एक भाग… भाजपचे नेते विजय गोयल यांच्या एका ट्विटवर तिने व्यक्त केलेलं मत, स्त्री-स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर अधिक भाष्य करणारं आहे. ‘भारतीय स्त्रिया बंधनं झुगारून देत प्रगती करत आहेत’ असं मत मांडणारं ट्विट गोयल यांनी केलं होतं. यात उदाहरणादाखल हिजाबधारी महिलेचा फोटो त्यांनी वापरला होता.

 

vijay-goel-tweet-inmarathi

 

या ट्विटवर झायराने दिलेली प्रतिक्रिया मात्र धक्कादायक ठरली. “हिजाबमधील स्त्रिया सुद्धा ‘सुंदर आणि स्वतंत्र’ असतात.” असं मत व्यक्त करून तिने नव्या वादाला तोंड फोडलं.

स्वकर्तृत्वावर यश मिळवून दाखवणाऱ्या झायराने हे असं मत मांडावं, यातच इस्लाम धर्मातील महिलांना मिळणाऱ्या स्वातंत्र्याची सत्यता दिसून येते.

तिने तिचे सगळे फोटोज ‘फॅन पेज’वरून काढून टाकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. खरं तर मागच्या वर्षीच तिने तिची सगळी ‘फॅन पेजेस’ बंद करण्याची विनंती तिच्या चाहत्यांना केली होती. मात्र, आजही तिची ‘फॅन पेजेस’ सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.

म्हणूनच, तिने पुन्हा एकदा चाहत्यांना आवाहन करण्याचं ठरवलं. ‘कृपया चाहत्यांनी हा मेसेज पुन्हा वाचा’ असं म्हणत तिने तिचा हा मेसेज सगळ्यांसमोर मांडला आहे.

यात ती म्हणते की,

“माझ्यावर आजही प्रेम करणाऱ्या माझ्या चाहत्यांचे मी आभार मानते. तुम्ही सातत्याने दाखवलेला पाठिंबा, तुमचं प्रेम यामुळेच मला अधिकाधिक उत्तम काम करण्याचं प्रोत्साहन मिळत होतं. तुम्ही तुमचं माझ्यावरील प्रेम आणि विश्वास आजही कायम आहे, आणि म्हणूनच, या प्रेमाखातर मी एक विनंती तुमच्याकडे करत आहे.

 

zaira-wasim-insta-inmarathi

 

कृपया माझे फोटो तुमच्या अकाउंटवरून काढून टाका. इंटरनेटवरून हे फोटोज पूर्णपणे काढून टाकणं अशक्य असलं, तरीही चाहत्यांनी ते शेअर करणं थांबवावं, ही विनंती करणं मला शक्य आहे. आजवर तुम्ही मला माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये समर्थन दिलंत, तसंच यावेळी सुद्धा कराल अशी मी अपेक्षा करते.

यापुढील आयुष्यात नव्या वाटेवर चालण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे, मी ही विनंती करत आहे. यापुढे मी धर्माचे काम करणार आहे.

माझ्या प्रवासात तुमचे प्रेम आणि सहकार्य महत्वाचे होते. अल्ला तुमचे कल्याण करो.”

यापुढे धर्मासाठी काम करायचं असल्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं झायराने यात म्हटलं आहे. या नव्या प्रवासाला सुरुवात करत असताना, तिला या जुन्या गोष्टींचं ओझं मनावर नकोय असं ती तिच्या चाहत्यांना सांगतेय.

हे प्रेम आणि शुभेच्छा यांचा वर्षाव ही माझ्या पुढील वाटचालीतील मोठी कसोटी असल्याचं सुद्धा झायराने म्हटलं आहे.

तिच्या उत्तम अभिनयाच्या जोरावर अनेकांच्या गळ्यातील याची झालेली झायरा यापुढे चित्रपटांमध्ये दिसणार नाही. याशिवाय तिने फोटो शेअर न करण्याची विंनती सुद्धा केलेली आहे. ही तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच एक दुःखदायक बातमी ठरली आहे.

अर्थात, यातून समोर आलेले इस्लामच्या कट्टरता वादाचे आणि महिला स्वातंत्र्याचे विषय आणि त्यावरील प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिले आहेत…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?