' प्रवासात उलटी-मळमळ होण्याची भीती वाटतीये? हे उपाय देतील त्वरित आराम!

प्रवासात उलटी-मळमळ होण्याची भीती वाटतीये? हे उपाय देतील त्वरित आराम!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

 

“केल्याने देशाटन, पंडित- मैत्री, सभेत संचार, मनुजा अंगी चातुर्य येतसे फार” ही खूप जुनी ओळ प्रचलित आहे, पण देशाटन करायचं ठरवलं तर प्रवास करावा लागतो. प्रवासाचे विविध पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत.‌ बस, रेल्वे, खाजगी गाडी, विमान, जहाज असे अनेक स्वस्त, महाग, खर्चिक पर्याय आपल्याला सापडतात.

काही लोक असे हौशी प्रवासी असतात, की सतत फिरत असतात‌. त्यांचा छंद असतो फिरणं. काही लोक असेही असतात त्यांना प्रवास करायला अतिशय आवडतो पण प्रवासात बस लागणं…गाडी लागणं.. मळमळणं, उलट्या होणं या गोष्टी इतक्या त्रासदायक ठरतात, की त्यांची प्रवास करायची इच्छा मरुनच जाते.

सोबत गोळ्या ठेवा..आलं, मोरावळा ठेवा हे नाना उपाय करुनही गाडी चालू झाली, की मळमळू लागतं आणि घाटातला रस्ता त्रासाला सस्ता वाटू लागतो.

 

motion sickness inmarathi

 

खूपदा आपण ट्रीपला बाहेर पडतो आणि रस्त्यात दिसतील ते पदार्थ खातो. त्यांचा दर्जा आपल्याला माहीत नसतो. कधी बनवले आहेत ते माहित नसतं. ते जास्त मसालेदार असले, तर त्याचा परिणाम नंतर दिसून येतो.

भूक लागली म्हणून खाल्लं जातं, पण त्यामुळे पोटावर ताण येतोच शिवाय मळमळ, उलट्या होणे हा त्रास होतो तो वेगळाच. प्रवास करताना कसंतरी होतं म्हणत, बाहेरचं सृष्टी सौंदर्य न पाहता उलटी होईल या धास्तीने मागे सीटवर मान टाकून बसलेला माणूस किती बिच्चारा वाटतो.

या त्रासावरचे काही साधे सुधे उपाय लक्षात ठेवले, तर हा त्रासदायक प्रवास थोडासा सुसह्य होण्यासाठी मदत होते. काय आहेत ते उपाय?

सर्वात प्रथम प्रवासाला निघताना हलका आहार घ्यावा. तिखट, मसालेदार, जळजळीत पदार्थ खाणं टाळावं. कारण हे अन्न पचायला जड तर असतंच, पण मळमळीला हे पदार्थ आमंत्रण देतात. उलट्यांनी घशाची जळजळ करुन घाटाची वहिवाट बिकट करुन प्रवासाचा फज्जा उडवतात.

जड अन्न पचायला त्रास होतोच, पण पोटात ते टिकतही नाही. म्हणून शक्यतो सरबत सोबत ठेवावे. आलेपाकाची वडी तर आजीबाईचा बटवा सुचवतोच, पण त्याशिवाय काही उपाय आहेत ते पण करावेत.

 

==

हे ही वाचा – कुत्रे तुमच्या गाडीच्या मागे लागतात ते इजा करण्यासाठी नव्हे! मग कशासाठी? वाचा…

==

 

खालील पदार्थ तुम्हाला या त्रासापासून आराम देऊ शकतात: 

१. केळी-

 

banana inmarathi

 

प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणारं केळं हा अतिशय उपयुक्त उपाय आहे. केळ्यांमध्ये असलेल्या पोटॅशियम आणि फायबर्समुळे अतिशय फायदा होतो.

 

२. भात-

rice inmarathi

 

प्रवासाला निघताना तूप भात सोबत घ्यावा. मळमळत आहे असं वाटलं तर भात खाऊन घ्यावा. यामुळे तुमची मळमळ थांबेल. त्रास कमी होण्यास काही प्रमाणात मदत होईल.

 

३. क्रॅकर्स बिस्कीटं-

 

biscuit inmarathi

 

क्रॅकर्स बिस्कीटं अतिशय हलकी असल्यामुळे पचायला सोपी असतात. शिवाय शरीरात ही बिस्किटे थंडावा निर्माण करतात. त्यामुळे मळमळ कमी होते.

४. बर्फाचा तुकडा-

 

ice inmarathi

 

प्रवासात शक्य असल्यास सोबत बर्फाचा तुकडा ठेवावा. पाणी प्यावे. त्यामुळे मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास कमी होतो.

५. आलं-

 

cancer-ginger-inmarathi

 

आल्याचा तुकडा किंवा आलेपाकाची वडी सोबत ठेवावी. आल्यात मळमळ थांबवण्याचा गुण असतोच. एक भांडभर पाण्यात थोडंस आलं ठेचून किंवा किसून मिसळावं आणि ते पाणी प्यावं म्हणजे तात्काळ आराम मिळतो.

याशिवाय आलं किसून त्यात लिंबू पिळावा, थोडीशी साखर घालून किंचीत सैंधव मीठ टाकून गरम करावं. साखर विरघळली, की गॅस बंद करावा. हे चाटण अतिशय चांगला उपाय आहे. यानं अपचन झालं असेल तर ते लगेच कमी होतं. मळमळ थांबते.

==

हे ही वाचा – मुंबई ते कन्याकुमारी प्रवास करत ‘वर्क फ्रॉम होम’ ऐवजी त्यांनी केले ‘वर्क फ्रॉम सायकल’!

==

६. पुदिना-

 

pudina inmarathi

 

पुदिना हा एक अतिशय गुणकारी उपाय आहे. त्याचं तेल मिंट आॅईल म्हणून वापरलं जातं. चहा करताना पुदिना टाकून चहा करावा. हा उपाय मळमळीवर उत्तम इलाज आहे.

 

७. वेलदोडे-

 

ilaychi inmarathi

 

आयुर्वेदात वेलदोडे या पदार्थाला मळमळीसाठी फार गुणकारी औषध मानलं जातं. प्रवासात मळमळू लागल्यावर वेलदोड्याचे दाणे तोंडात ठेवल्यास मळमळीचा त्रास लगेच कमी होतो.

मसाला वेलदोडे म्हणजे काळे वेलदोडे आणि पिवळे वेलदोडे दोन्ही कफ, पित्त आणि वातशामक औषधांनी परिपूर्ण आहेत. प्रवासाला निघताना वेलदोडे सोबत ठेवावे.

 

८. पाणी-

 

water-health-inmarathi05

 

जल ही जीवन है…असं आपल्याला सर्रास सांगितलं जातं. त्यात काही चूक नाही. प्रवासात होणारी मळमळ कमी करण्यासाठी थोडं थोडं पाणी पिणं हे चांगला परिणाम करतं.

जर जास्त प्रमाणात पाणी प्यायलात, तर मात्र बरोबर उलटा परिणाम होतो आणि उलट्या होतात. म्हणून थोडं थोडं पाणी प्या. मळमळ कमी होते.

 

९. संत्र्याचा रस-

 

orange inmarathi

 

शक्य असल्यास प्रवास करताना संत्र्याचा रस सोबत घ्यावा. तो शक्य नसेल तर संत्र्याच्या स्वादाच्या गोळ्या मिळतात, त्या सोबत ठेवा. त्यानेही आराम पडतो.

आता आठवून बघा, बस स्टँडवर खूपदा लिमलेटच्या किंवा संत्र्याच्या स्वादाच्या गोळ्या, वेलदोड्याचा स्वाद असणारी चाॅकलेट्स, केळी विकत येतात ते काही निव्वळ व्यवसाय म्हणून नाही, तर त्यातही आपल्या आरोग्याची काळजी असते.

प्रवास करताना असं हलकं फुलकं खाणं सोबत ठेवावं. टाईमपास म्हणून नाही, तर प्रवासात होणारा त्रास कमी होण्यास मदत होते म्हणून.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

हे ही वाचा – कारने केलेली जगभ्रमंती आणि अनेक भन्नाट व्यक्तींची भेट! वाचा एक अफलातून प्रवास..

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?