'शनिवारची बोधकथा : जोखडात अडकलेल्या हत्तीची गोष्ट!

शनिवारची बोधकथा : जोखडात अडकलेल्या हत्तीची गोष्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आटपाट नगर होतं. तिथल्या राजाला काही हत्ती खरेदी करायचे होते. राजाने मंत्र्यांना आज्ञा दिली. स्वतःच बाजारात जाण्याचा निर्णय घेताला. सर्व तयारी पूर्ण झाली. सैनिकांसह राजा त्याच्या काही मंत्र्यांसोबत शेजारच्या राज्यात हत्ती खरेदी करण्यासाठी निघाला.

सगळा लवाजमा बाजारात पोहचला. तेथे अनेक विक्रेते लहान-मोठे हत्ती विकत होते. हत्तींचा बाजार भरला होता. बाजारात गजबजाट होता. हत्तींसोबच उंट, घोडेही विक्रीसाठी उपलब्ध होते. खरेदीसाठी झुंबड उडाली होती. राजाला सगळीकडे प्रचंड सन्मानाने हत्तींची माहिती देण्यात येत होती.

राजा आणि मंत्री संपूर्ण बाजारात खूप वेळ फिरले. पण राजाला हवा तसा हत्ती मिळत नव्हता. बराच वेळ फिराल्यानंतर अखेर मोठे हत्ती विकणाऱ्या एका विक्रेत्याजवळ राजा आणि त्याचा लवाजमा थांबला. त्या विक्रेत्याकडील काही हत्ती राजाला आवडले. त्याप्रमाणे राजाने खरेदी करण्याची तयारी दर्शविली. हत्तींचे वैशिष्ट्ये, दर वगैरे सगळं ठरलं. ठरल्याप्रमाणे व्यवहार पूर्ण होऊ लागला. मंत्र्यांनी विक्रेत्याला ठरलेली रक्कम अदा केली.

आता प्रत्यक्ष हत्ती ताब्यात घेण्याची वेळ आली. प्रत्येक हत्तीच्या उजव्या पायाला लहानसे अगदी साधी दोरी बांधाली होती. हत्ती ताब्यात देताना विक्रेता प्रत्येक हत्तीच्या पायाला बांधलेली दोरी राजाच्या सैनिकांकडे देऊ लागला.

हे पाहून राजा म्हणाला, “अरे, ही दोरी एवढी साधी आहे की आम्ही दूरचा प्रवास करताना हा हत्ती कधीही ती तोडून आमच्यावर हल्ला करू शकतो.” विक्रेता शांतपणे म्हणाला, “तसं होणार नाही!’ राजाला आश्‍चर्य वाटले, “अरे पण तसे होणार नाही याची खात्री काय?” त्यावर विक्रेत्याने नम्रपणे उत्तर दिले, “महाराज, हे हत्ती छोटे असल्यापासून माझ्याकडे आहेत. सुरूवातीला त्यांच्या चारही पायांना खूप जाड लोखंडी साखळी बांधत होतो. तेव्हा ते साखळीचे बंधन तोडण्याचा खूप प्रयत्न करत होते. कितीतरी दिवस ते दोरी तोडून पळण्याचा प्रयत्न करत होते. एकदा तर एक हत्ती तर पळूनही गेला होता. त्याला मी जाऊन पुन्हा घेऊन आलो. तरीही तो आणि इतर हत्ती नंतर पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या पायातून रक्त निघायचे. त्यांना त्रास व्हायचा. त्यावेळी ते काही खातही नव्हते. त्यामुळे अशक्तपणा यायचा. शेवटी एकेदिवशी त्यांनी परिस्थितीसमोर शरणागती पत्करली आणि धडपडण्याचा प्रयत्न सोडून दिला. प्रचंड क्षमता असूनही येथून पळून जाणे हे आपल्या क्षमतेबाहेरचे आहे, असा त्यांचा समज झाला.

आज त्यांच्या पायात दोरीसारखे काहीही बंधन नाही. मात्र तरीही ते पळून जाण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. पळून जाणे अगदी सहज शक्‍य असतानाही आणि त्यांच्याकडे तेवढे सामर्थ्य असतानाही त्यांना असेच वाटते की प्रयत्न करून काहीही उपयोग होणार नाही. प्रयत्न निरर्थक जातील. त्यामुळे त्यांनी प्रयत्नच सोडून दिले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या पायातील ही दोरी जरी मी बाजूला काढून ठेवली तरी देखील ते पळून जाऊ शकणार नाहीत.’ विक्रेत्याने दीर्घ खुलासा केला.

राजासह मंत्री आणि अन्य सर्वांना विक्रेत्याचे म्हणणे पटले. राजा सर्वांना उद्देशून म्हणाला, “मंडळी, आयुष्यात अखेरच्या श्वासापर्यंत आपण प्रयत्न करणे थांबवू नये, बरं!”

मंडळी माणूस म्हणून जगतानाही आपण सतत प्रयत्नशील असायाला हवं. परिस्थिती सतत बदलत जात असते. त्यामुळे परिस्थितीसमोर कधीही शरण जाऊ नये.

प्रयत्न करणारे कृतीशील व्यक्ती सतत धडपड करत असतात. त्यामुळेच अशा व्यक्तींना एकदिवस अनुकूल परिस्थिती निर्माण होते आणि अल्पावधीतच ते यशाचे मार्गाने पुढे जातात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?