'निळू फुले, अमिताभ बच्चन आणि डबिंग... वाचा एक माहितीपूर्ण लेख!

निळू फुले, अमिताभ बच्चन आणि डबिंग… वाचा एक माहितीपूर्ण लेख!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : स्वप्नील राजशेखर 

===

प्रसिद्ध मराठी अभिनेते राजशेखर (जनार्दन भूतकर) यांचे सुपुत्र स्वप्नील राजशेखर यांना आपण ओळखत असालच. स्वप्नील यांनी राजा शिव छत्रपती, जय मल्हार अशा मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा लोकांच्या मनावर उमटवला आहे!

सिनेमा किंवा सिरियल या दोन्हीमध्ये होणारं डबिंग यावर फारसं कुणी बोलत नाही किंवा लिहीत नाही. पण याच खूप महत्वाच्या विषयावर स्वप्नील यांनी खूप उत्तम माहिती दिली असून त्यांनी त्यांचे अनुभव या लेखात शेयर केले आहेत. ते जरूर वाचा!

 

swapnil 2 inmarathi

 

===

निळु फुले काकांसोबत दोन फिल्म्स केल्या मी. त्यांचं एक वैशिष्टय आवर्जुन सांगायचंय, सिनेमाचं डबींग करणं हे एक वेगळं स्किल आहे, आपणच बोललेले संवाद डबींग स्टुडीओमधे पुन्हा बोलायचे.

शुटींगवेळी जोडीला कायीक (शारीरीक) अभिनय असतो, सहकलाकार असतात, सीनचा माहोल असतो, एक सहजउर्जा असते!

पुढे अनेक दिवसानी वेगळ्या वातावरणात स्टुडीओमध्ये ती उर्जा पुन्हा आणायची हे सोपं नव्हे. त्यात कृत्रीमता येण्याची शक्यता असते. लिपसींकच्या प्रेशरमधे मेकॅनीकल होऊ शकतं सगळं.

 

dubbing inmarathi

 

शिवाय अभिनयाच्या भरात छोटे निश्वास, हुंकार, उदगार स्वाभावीक नैसर्गीक येतात. ते डब करणेही कठीण. पण ही एक संधी सुध्दा असते. शुटींगवेळी निसटलेल्या गोष्टी ईथे भरता येतात.

टोनमधे, एक्सप्रेशनमधे हलका बदल करुन वाक्यं प्रभावी, गहिरी किंवा सहज करता येऊ शकतात, व्यक्तीरेखेचा बाज बदलता येतो, सीनचा परिणाम बदलु शकतो!

अमिताभ बच्चन एक मोठा आर्टीस्ट मानला जातो याचं एक कारण त्याचं डबींग स्कीलसुध्दा आहे. तो आपल्या मुळ परफाॅरमन्सच्या जास्तीत जास्त जवळ पोहोचतो डबींगला!

सीन आणखी दमदार करतो, पण त्यानेही आपले बहुतांशी गाजलेले सीन्स डब केलेले नाहीत!

“आज खुश तो बहोत होंगे तुम”, “ईतना मारा ईतना मारा”, “दारु पीने से लीवर खराब”, “मत जाईये मुन्शीजी” असे त्याचे कित्येक सीन्स डबच केलेले नाहीत. मुळ पायलट ट्रॅक सह आहेत!

 

daaru pine inmarathi

 

बरं हे डबींग प्रकरण आता तुलनेने फारच सोपं झालंय, एकेक वाक्य, एकेक शब्द पंच करता येतो! पुर्वी रीळांच्या काळात सीन आख्खा डब करण्याचं प्रेशर असायचं ॲक्टरवर.

तर फुले काकांचं डबींग बघण्याचा मला दोनदा योग आला. डबींग करताना सहसा आर्टीस्ट समोरच्या स्क्रिनवर सीन बघतात, डबींग स्क्रिप्ट पाहुन वाक्य पाठ करतात,  वाटल्यास लिहुन काढतात आणि पुन्हा तो सीन स्क्रिनवर बघत बघत त्याबरहुकुम डबींग करतात!

फुले काकांची शैली पुर्ण वेगळी, ते स्क्रीनकडे एकदाही न बघता सीन फक्त ऐकायचे, डोळे बंद करुन मग स्क्रिप्टवर नोंदी करायचे एकदाच, आणि टेक सुरु! स्क्रिनकडे न बघताच स्क्रिप्ट समोर घेऊन सगळा सीन बोलायचे!

हुबेहुब सगळ्या भावभावना आणि ॲडीशनल ईनपुटसहित अगदी मुळ छापल्यासारखा डबट्रॅकचा आलेख न सीन डन, एकाच टेकमधे!

मला हे फारच अमेझींग वाटलं, मी त्याना विचारलं तर म्हणाले  “दृकअभिनय करुन झालाय की तिथे… ईथे फक्त आवाज वापरायचाय तर साऊंडवर लक्ष द्यायचं..”

 

nilu phule 2 inmarathi

 

हे ट्राय करुन पाहिलं मी.. पण ते त्यानी जितकं सहज सांगितलं तितकं सोपं नक्की नव्हतं! मी माझ्या माझ्या पध्दतीने करतो डबींग.. पण प्रत्येकवेळी फुले काकांची आठवण येते मात्र. यावर सहसा बोललं जात नाही म्हणुन आवर्जुन लिहीलं!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?