'‘पिक्सेल पार्सली’ द्वारे फेसबुकवरची रेसिपी आता प्रत्यक्षात अवतरणार!

‘पिक्सेल पार्सली’ द्वारे फेसबुकवरची रेसिपी आता प्रत्यक्षात अवतरणार!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

माणूस हा एक अद्भूत प्राणी आहे. अन्न ही माणसाची एक मूलभूत गरज. पण त्यातही नाविन्यता, सर्जनशीलता आणि कल्पकता शोधणार नाही तो माणूस कसला. म्हणूनच तर एकेकाळी कंदमुळं खाणाऱ्या माणसाने आज चविष्ट, रुचकर आणि पौष्टिक पदार्थांचे हजारो पर्याय निर्माण केले आहेत.

मुख्यत: व्हेज आणि नॉनव्हेज या दोन प्रकारात आज जगभरात अगणित व्हरायटीज उपलब्ध आहेत.

 

veg vs non veg inmarathi

हल्ली सोशल मिडियाच्या व्हर्च्युअल युगात तर आपल्याला मोबाईलच्या स्क्रीनवर स्वादिष्ट पदार्थ केवळ ‘पाहून’ भूक भागवावी लागते. आपण फेसबुकवर स्क्रोल करतानाही अशाच छान-छान पदार्थांच्या रेसिपीज बघतो. स्क्रोल करून पुढे जात असताना काही क्षण त्या रेसिपीच्या पोस्टवर विसावतो.

ती रेसिपी पाहून आपल्या जिभेला पाणी सुटतं. पुन्हा कधीतरी खाऊ असा विचार करून आपण आपलं स्क्रोलिंग सुरु ठेवतो. फारच असह्य झालं तर घरात स्वत:च ती रेसिपी करायचा प्रयत्नही करतो.

पण प्रत्येकवेळी ते शक्य नसतं. अनकेदा कामाच्या व्यापात नंतर आपण तो पदार्थ खाण्याचं विसरूनही जातो. आणि इच्छा असूनही आपण अशा पदार्थांपासून दुरावतो.

पण खरोखरच फेसबुकवर अशी रेसिपी बघितल्यानंतर काही वेळातच ती रेसिपी तुमच्या समोर हजर झाली तर? होय! आता हे प्रत्यक्षात साकारणार आहे.

ही कविकल्पना नाही; तर आता हे प्रत्यक्षात घडणार आहे. पुण्यातील हौशी आणि उत्साही फूड लव्हर तरुणांनी एकत्र येऊन आपल्या छंदाला अनोख्या व्यवसायाचे स्वरुप देत अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

 

rice-InMarathi

फ्रेंच लोकांच्या मते कुठल्याही निगुतीने किंवा मनापासून बनवलेल्या पदार्थाचा घास घाईघाईने मुखात घालणे चूक आहे.

त्यांचे म्हणणे असते की, आधी तो पदार्थ बघा, डोळ्यांनी निरखून त्याच्या चवीची मनोकामना रंगवा, त्याचा घमघमाट अनुभवा आणि पाचनरस उद्दीपीत झाले की मगच त्या पदार्थाचा एक घास अलगद आपल्या जिभेवर ठेवा!

तरच त्या पदार्थातील खरी रंगत तुम्हाला अनुभवता येईल. नेमका हाच अनुभव देण्यासाठी या ’वेबफुडीज’ ग्रुपने ‘पिक्सेल पार्सली’ नावाचा एक स्टार्टअप सुरु केला आहे.

बाहेरील देशांत विविध पर्यटन स्थळांवर लाईव्ह कुकिंग  ही संकल्पना चांगलीच रुजलेली आहे. मात्र पुण्यात लाईव्ह कुकिंग काँसर्ट्स ही संकल्पना अजूनही रुजते आहे. लाईव्ह कुकिंग मूव्हमेंट मधील एक सलामीचा इव्हेंट म्हणून हा पहिला वाहिला प्रयोग ‘पिक्सेल पार्सली’ घेऊन येत आहे.

 

pixel parsely inmarathi

 

विविध शाकाहारी, मांसाहारी पदार्थांच्या रेसिपीज ‘पिस्केल पार्सली’च्या फेसबुक पेजवर (लिंक : https://facebook.com/PixelParsley/) शेअर केल्या जातील. अपलोड केलेली प्रत्येक रेसिपी थेट प्रत्यक्ष मेसेज अथवा फोन करून ऑर्डर करण्याची सुविधा उपलब्ध असेल.

कोलग्रिल फिश, केळीच्या पानातील पात्रा फिश, बांबू चिकन, मडक्यात बनविलेली कोळंबी बिर्याणी, व्हेज बार्बेक्यू आणि अशाच भरपूर पदार्थांची रेसिपी उपलब्ध असेल.

या पदार्थांच्या रेसिपीसोबतच प्रत्यक्ष पदार्थ फोन करून ऑर्डर करण्याची सुविधा उपलब्ध असेल. ऑर्डर केल्यानंतर अवघ्या दोन तासांत ती रेसिपी तुम्हाला चाखता येऊ शकेल.

आगामी टप्प्यात ‘पिक्सेल पार्सली’द्वारे विविध ठिकाणी लाईव्ह कुकिंग कॉन्सर्टही आयोजित करण्यात येणार आहेत.

एखाद्या निवांत ठिकाणी, आपले कुटुंबिय आणि मित्र परिवारासोबत रंगलेला गप्पांचा फड, समोरच कोळश्याचा बार्बेक्यू, त्याच्या फुफाट्याच्या आणि दवमिश्रित ओलसर हवेच्या संमिश्र गंधाने आपसूक आलेली एक खाद्यधुंदी अशा अनोख्या कॉन्सर्टमधून अनुभवता येणार आहे.

याशिवाय लाईव्ह कुकिंग एक्सकर्शन्स ही संकल्पनाही ‘पिक्सेल पार्सली‘द्वारे प्रत्यक्षात साकारण्यात येणार आहे. 

 

 

कॅम्पिंग अथवा ट्रेकिंगच्या दरम्यान विसावा घेताना चुलीवर शिजलेल्या चविष्ट, रुचकर आणि नाविन्यपूर्ण पदार्थही लाईव्ह कुकिंग एक्सकर्शन्सद्वारे अनुभवता येतील. भटकंती करणारे उत्साही वीर आणि त्यांच्या मित्रमंडळींसाठी ही एक अनोखी पर्वणी ठरणार आहे.

या सर्व इव्हंटसचे अपडेटस, रेसिपी व्हिडिओज आणि सेलफोन ऑर्डर हे सगळं ‘पिक्सेल पार्सली’च्या फेसबुक पेजद्वारे  होणार आहे.

‘पिक्सेल पार्सली’द्वारे पदार्थांमधील अस्सल गुणवत्ता टिकवून वेळेत डिलीव्हरी देता यावी यासाठी पहिल्या टप्प्यात पुणे शहरात ही सुविधा उपलब्ध असणार आहे.

विशेषत: पुणे शहरातील पुण्यातील कोथरुड, कर्वेनगर, डेक्कन, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, बाजीराव रस्ता या पसिसरात प्राधान्याने सुविधा उपलब्ध असेल. अन्य परिसरात आणि अन्य शहरांमध्ये फ्रँचाईझी विस्ताराचे नियोजन करण्यात येणार आहे.

हा अनोखा अनुभव घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या फेसबुक पेजला लाईक करायलाच हवे! ‘पिक्सेल पार्सली’ सोबत काम करायची तुमची इच्छा असेल तर त्यांच्या फेसबुक पेज मेसेंजरमार्फत नक्की संपर्क साधा.

 

outlet inmarathi

 

व्हर्च्युअल जगातील रेसिपी खऱ्याखुऱ्या जगात समोर येऊन उभ्या करणाऱ्या ‘पिक्सेल पार्सली’च्या या अनोख्या उपक्रमाला खवय्यांचा भरपूर उदंड प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.

पारंपरिक व्यवसायापेक्षा आपल्या छंदाला अनोख्या पद्धतीने व्यावसायिक स्वरुप देता येऊ शकतं, हाच प्रेरणा संदेश ‘वेबफुडी’च्या ग्रुपने ‘पिक्सेल पार्सली’च्या माध्यमातून आपल्यासमोर मांडला आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?