'हा विमानप्रवास होतो चक्क ९० सेकंदात, वाचा सर्वात छोट्या हवाई मार्गाबद्दल!

हा विमानप्रवास होतो चक्क ९० सेकंदात, वाचा सर्वात छोट्या हवाई मार्गाबद्दल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“वेळ, पैसे आणि सर्विस यापैकी सर्वात महत्वाचं काय?” असा प्रश्न काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया वर फिरत होता. या तीन मध्ये तुलना करायची तर खरं तर वेळ हा सर्वात महत्वाचा आहे.

गमावलेले पैसे परत कमावता येतात, सर्विस मध्ये काही चुक झालेली असल्यास ती सुधारता येते. पण गेलेला वेळ हा काही केल्या परत आणता येत नाही.

आपण उपभोग घेत असलेल्या विविध सर्विसेस पैकी विमान सेवा ही अशी सेवा म्हणता येईल जिथे आपल्या वेळ, पैसे आणि सर्विस या तिन्ही गोष्टी बहुतांश वेळी मनासारख्या मिळतात आणि आपले पैसे आणि वेळ सार्थकी लागतात.

एअरपोर्ट वर चेक-इन पासून आपल्या इप्सित ठिकाणा पर्यंत पोहोचणे हा एक सुखद अनुभव असतो. काहींना विमान प्रवासाबद्दल मनात एक भीती, तिटकारा किंवा कंटाळा असतो तर काहींना विमान प्रवासाबद्दल प्रचंड आकर्षण असतं.

 

air travel inmarathi

 

आकर्षण असलेल्या लोकांना लांबचे प्रवास सुद्धा आवडत असतात. कनेक्टिंग फ्लाईट, जेट लॅग या गोष्टी त्यांना खूप थ्रिलिंग वाटत असतात.

सगळ्याच फ्लाईट्स इतक्या जास्त वेळेच्या असतात असं नाही. काही फ्लाईट्सचा प्रवासाचा स्पीड इतका जास्त असतो किंवा दोन ठिकाणातील अंतर इतकं कमी असतं की तुम्हाला विमान प्रवासाचा आनंद सुद्धा घेता येत नाही.

तुम्हाला हे कळल्यावर आश्चर्य वाटेल की १० मिनिटात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणाऱ्या सुद्धा फ्लाईट्स असतात. त्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला चेक-इन करून विमानात येऊन बसायला आणि उतरल्यावर बॅग घेऊन बाहेर पडायला लागतो.

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगातील दोन ठिकाणं अशी आहेत जिथे फ्लाईट हे प्रवाशांना ९० सेकंदात पोहोचवते. होय, तुम्ही योग्य वाचलंत, ९० सेकंद.

या आणि अश्या सर्वात कमी वेळेत पोहोचवणाऱ्या फ्लाईट्स बद्दल थोडक्यात जाणून घेऊया :

१. डिसेंबर २०२० मध्ये ब्रिटिश एअरवेज ही कंपनी सौदी अरेबिया या देशातील दमम आणि बहरिन देश या दोन ठिकाणांमध्ये फ्लाईट सुरू करत आहे. हे अंतर ब्रिटिश एअरवेजची फ्लाईट १५ मिनिटांत पूर्ण करेल असं त्यांनी सांगितलं आहे.

२. लॉगन एअर या कंपनी वेस्ट्राय स्कॉटिश आईसलॅण्ड (लोकसंख्या: ६४०) आणि पापा वेस्ट्राय (लोकसंख्या: ७२) Orkneys नावाने ओळखल्या जाणाऱ्या या भागात जी फ्लाईट सुरू होणार आहे त्याला हे अंतर कापण्यासाठी केवळ ९० सेकंद लागणार आहे असं कंपनी ने जाहीर केलं आहे.

 

shortest route inmarathi

 

हेच विमान जर का मरीनलँड च्या पूर्वेकडून नेल्यास तुम्ही ४७ सेकंदात सुद्धा पोहोचू शकतात असं लॉगन एअर या कंपनीने संगीतलं आहे.

हवामान जर का ढगाळ असेल तर हे विमान उशिरात उशिरा म्हणजे अडीच मिनिटात पापा वेस्ट्राय ला तुम्हाला पोहोचवते. इतक्या वेळात तर आपल्याकडे असलेल्या फ्लाईट्स ला रन वे टेक ऑफ किंवा लँडिंगचं सिग्नल मिळण्यासाठी जात असतो.

एका वेळी आठ प्रवाशांची क्षमता असलेल्या या विमानाच्या कॉकपिट मध्ये फक्त पायलट एकटाच बसलेला असतो. दुसरी जागा असते. पण, ती जागा रिकामी असते. ही फ्लाईट म्हणजे एक हौसेसाठी केलेली सोय वाटू शकते.

पण, या फ्लाईट्स चा उद्देश हा तिथे राहणाऱ्या लोकांना जगाच्या संपर्कात ठेवणे हा आहे. ही फ्लाईट म्हणजे Ornkey च्या आईसलँड (बेट) मरीनलँड ला त्या भागातील इतर सहा आईसलँड सोबत जोडणं हा आहे.

या आईसलँड च्या ठिकाणी सुद्धा शिक्षक, पोलीस, व्यापारी असे कित्येक लोक राहतात आणि नियमित या सेवेचा फायदा ते घेत असतात. ६ आईसलँड मधील केवळ २ आईसलँड मध्ये पोहोचण्यासाठी सर्वात अधिक म्हणजे १० मिनिटं लागतात.

 

shortest flight inmarathi

 

कमी अंतर असलेल्या या मार्गावर इतर कोणतेही प्रवासाचे मार्ग किचकट वाटत असतात, म्हणून सामान्य नागरिक विमानाचा पर्याय निवडत असतो.

अलास्का’स मिल्क ही एक कंपनी आहे गल्फ मध्ये काम करते. त्यांनी भौगोलिक परिस्थिती आणि रोड वरून बहरिन ते दमम हे अंतर हे नेहमीच ४० मिनिटात पार केलं आहे.

त्यांनी या नवीन शॉर्ट टाईम फ्लाईटचं स्वागत केलं आहे.

ग्राहेम माबेन हे ७० वर्षीय Ornakey मध्ये राहणारे गृहस्थ आहेत. ते स्वतः टुरिस्ट बिजनेस करतात. त्यांनी मागील १५ वर्षांत कमीत कमी ४० वेळेस या अतिजलद विमान सेवेचा फायदा घेतला आहे.

या विमानात असणारे ३ पायलट्स सुद्धा आता त्यांच्या ओळखीचे झाले आहेत.

कमी वेळेच्या या फ्लाईट्स मधून एक फायदा आहे की त्यांच्या वेळ आणि आकारामुळे त्या कमीत कमी प्रदूषण करतात.

 

shortest commercial flights inmarathi

 

एअरबस ३५० हे नवीन विमान इतर विमानापेक्षा ३०% कमी कार्बन डाय ऑक्साईड हवेत सोडते ही पर्यावरणासाठी चांगली गोष्ट आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर आपणही या कमी वेळेत नवीन ठिकाणी पोहोचवणाऱ्या फ्लाईट्सची सैर करूयात आणि जग किती सुंदर आहे हे परत एकदा प्रत्यक्ष डोळ्याने बघूया.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?