' …म्हणून न्यूटनलाही त्यावेळी करावं लागलं होतं ‘वर्क फ्रॉम होम’! – InMarathi

…म्हणून न्यूटनलाही त्यावेळी करावं लागलं होतं ‘वर्क फ्रॉम होम’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोव्हिड १९ महामारी आली आणि जगाचं रंगरूपच बदललं. स्वच्छता बाळगणे, सुरक्षित अंतर राखणे, क्वारंटाईन, आयसोलेशन काय काय घडलं. कधीही न थांबणारं जग वर्षभरासाठी पूर्णपणे ठप्प झालं. या कोरोनानी आपल्या जगण्याची पद्धतच बदलून टाकली. जगण्याची, शिक्षणाची आणि इतकंच काय कामाची पद्धत, त्याचं स्वरूप सुद्धा बदललं.

सकाळी ६.५५ ची लोकल पकडून ऑफिसला जाणारी मंडळी आता घरून काम करतायत. ऑफिस मध्ये हजेरी लावण्याचं आपलं वर्क कल्चर बदलून आता रिमोट वर्किंग किंवा वर्क फ्रॉम होमची पद्धत आपण अनुभवतो आहोत.

 

online learning inmarathi2

 

पण तुम्हाला काय वाटतं ही अशी महामारी आत्ताच आलीये? या आधी कधीही लोकांनी घरुन कामं केली नाहीत किंवा ते क्वारंटाईन झाले नाहीत का? तर असं नाहीये. जगात महामारी पसरण्याच्या बऱ्याच नोंदी आहेत. १९२० ते अगदी १६६५ मध्येही अशा महामारींची नोंद करून ठेवण्यात आलीये.

प्रत्येक गोष्टीत काहीतरी वाईटच दडलेलं असतं असं नाही. या महामारीच्या काळात काय सकारात्मक असू शकतं? आपण घरी आहोत, आपल्याकडे भरपूर वेळ आहे, आवश्यक असलेल्या सगळ्या सुखसुविधा आहेत, फक्त तो वेळ सत्कारणी लावायचाय जसा न्यूटनने लावला.

बरोबर वाचलंत! न्यूटन जेव्हा केम्ब्रिज युनिव्हर्सिटी येथून शिक्षण संपदन कारीत होता त्यावेळी सुद्धा असंच लॉकडाउन करण्यात आलं होतं. 

वर्ष होतं १६६५ . न्यूटन त्याच्या विशीत होता आणि त्याने नुकताच केम्ब्रिज युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळवला होता, पण अचानक प्लेगने संपूर्ण युरोप मध्ये थैमान घालणं सुरु केलं. लोकं अक्षरशः किटकांसारखी मृत्युमुखी पडत होती.

त्याकाळी अर्थात, बॅक्टरीया, विषाणू, जंतूंची चाचणी करण्याची कोणतीही मशीन उपलब्ध नव्हती, आपलं विज्ञान इतकं प्रगत नव्हतं. त्यामुळे काय करावं कोणाला कळेनासं झालं होतं.

 

plague in england inmarathi

 

अशातच काही डॉक्टर्सच्या निरीक्षणावरून असा निष्कर्ष काढण्यात आला की “माणसांना एकमेकांपासून दूर ठेवलं, तर हा प्लेग पसरण्यापासून थांबवता येऊ शकतो.” आणि म्हणून इंग्लंड प्रशासनाने संपूर्ण इंग्लंडमध्ये लॉकडाउन जाहीर केलं.

शाळा, कॉलेज, सरकारी कचेऱ्या, चर्च, बाजारपेठा सगळं सगळं बंद करण्यात आलं आणि लोकांना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी घरीच थांबण्याची ताकीद देण्यात आली. त्याही वेळी वारंवार हात धुण्याला प्राधान्य दिलं गेलं. परिसराची स्वच्छता पाळणं, आजारी व्यक्तीला तातडीने घरातील इतर मंडळींपासून वेगळं करणं हे सगळं सगळं सुरु झालं.

या प्लेगचे कारण माहित नसल्याने आणि त्या काळी अंधश्रद्धा जास्त प्रमाणात असल्याने लोकं या प्लेगला “ब्लॅक डेथ” असं संबोधू लागली.

ब्लॅक डेथने सगळी कडे हाहाकार माजवला होता, त्यामुळे नाईलाजाने का होईना न्यूटनला आपल्या घरी, अर्थात “वुलस्थ्रोप मॅनर” येथे परतावं लागलं आणि न्यूटनचा सामान्य विद्यार्थ्यापासून जग प्रसिद्ध गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ बनण्याचा प्रवास सुरु झाला.

 

sir issac newton

 

कोणाला ठाऊक होतं हे क्वारंटाईन जगाला गुरुत्वाकर्षणशक्तीचा शोध देईल? पण झालं तसंच. वेळ आणि आयुष्य फार अनिश्चित असतं, कशातून कशाचा उलगडा होईल हे सांगता येणं कठीणच.

सुरुवातीला न्यूटनने कॉलेज मध्ये तो काम करत असलेल्या गणितांवर आपलं लक्ष केंद्रित केलं आणि पाहता पाहता आपल्याला त्याची प्रसिद्ध “कॅलक्यूलस थेअरी” मिळाली.

त्यानंतर एकदा असंच प्रिझमचा अभ्यास करता करता, न्यूटनने त्यातुन उजेड कशा प्रकारे बाहेर पडतो ह्याचं निरीक्षण करणं सुरू केलं. ज्यामुळे त्याची दुसरी महत्त्वाची थेअरी, “थेअरी ऑफ ऑप्टिकस” आपल्या समोर आली.

त्यानंतर काही दिवसांनी घराच्या मागच्या अंगणात फिरता फिरता न्यूटन सहज म्हणून एका झाडाखाली बसला. होय, बरोबर ओळखलंत, हे तेच जगप्रसिद्ध सफारचंदाचं झाड होतं. तिथे बसलेला असतानाच त्याच्या डोक्यावर सफरचंद पडलं आणि न्यूटनच्या तीक्ष्ण डोक्यात वेगवेगळ्या प्रश्नांचे तरंग उठू लागले.

 

newton inmarathi

 

याच चिकित्सक आणि जिज्ञासू वृत्तीमुळे जगाला काही वर्षांनी “गुरुत्वाकर्षण शक्तीचा” शोध कळला. १६६५ हे न्यूटनच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचं वर्ष म्हणजेच ठरलं.

आता अभ्यास करण्याव्यतिरिक्त न्यूटनची दिनचर्या काय होती हे कोणी नोंदवून ठेवलेलं नाही, पण तो आपला वेळ अजिबात वाया घालवत नसे हे निश्चित. न्यूटन १.५ वर्ष घरीच होता. त्या महामारीला पूर्णपणे संपुष्टात यायला २ वर्षे लागली.

१६६७ साली न्यूटन जेव्हा आपल्या केलेल्या संशोधनांसोबत कॉलेजला परतला, पुढे न्यूटन केम्ब्रिजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करू लागला.

आज ३५५ वर्षांनंतर जग पुन्हा त्याच महामारी आणि वर्क फ्रॉम होमच्या उंबऱ्यावर आहे, पण न्यूटनने वेळ जसा सत्कारणी लावला त्या तुलनेत आपण  १% तरी सत्कारणी लावतोय का? का नुसता वायाच घालावतोय हा प्रश्न स्वतःच स्वतःला विचारून आत्मचिंतन करण्याची वेळ आज आलीये.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?