'मानवी स्पर्श झाला तर पाने मिटवून घेणारी ही वनस्पती आहे अनेक आजारांवर उपयुक्त!

मानवी स्पर्श झाला तर पाने मिटवून घेणारी ही वनस्पती आहे अनेक आजारांवर उपयुक्त!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पूर्वी घराच्या भोवताली अनेक औषधी वनस्पती असायच्या, परंतु आता या सिमेंटच्या जंगलाच्या युगात आपण निसर्गापासून बरेच अंतर ठेवतोय. आपल्याला अनेक दुर्मिळ वनस्पतीची नावं देखील माहिती नाहीत.

पूर्वी अनेक सहजपणे उपलब्ध होणाऱ्या वनस्पती देखील आता दुर्मिळ वाटू लागल्या आहेत. या औषधी वनस्पतीच्या वापराने अनेक लहान मोठे आजार सहजपणे बरे होत असत.

परंतु आता अगदी लहान मोठ्या आजारासाठी देखील आपल्याला डॉक्टरांकडे जावे लागते. आज या लेखात तुम्हाला अशाच एका दुर्मिळ वनस्पतीबाद्द्ल आणि त्या वनस्पतीच्या औषधी उपयोगांबाद्द्ल माहिती मिळणार आहे.

 

lajalu inmarathi

 

मंडळी लाजाळू या वनस्पतीबद्द्ल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. लाजाळू हि वनस्पती खूपच प्रसिद्ध आहे मात्र खूप कमी लोकांना हे माहिती असेल कि या वनस्पतीत औषधी गुणधर्म देखील आहेत.

या वनस्पती बद्दल जेवढं आकर्षण आहे तेवढेच याचे औषधी गुणधर्म मानवाचे आयुष्य सुकर करतात. अतिशय नाजूक असणाऱ्या लाजाळूच्या पानाला तुम्ही हात लावलात कि ती वनस्पती आपली पाने आपोआपच मिटवून घेते.

त्याच्या याच वैशिष्ट्यामुळेच त्याला लाजाळू हे नाव पडल आहे. मात्र गेल्या काही वर्षात प्रदुषणामुळे आणि मानवी हस्तक्षेपामुळे हि वनस्पती दुर्मिळ होत चालली आहे.

या वनस्पती सोबतच संढेवाल, खान्दुचाक्का, अक्कल काढा, मंजिष्ठ, अडुळसा इत्यादी वनस्पती देखील आढळत आणि लोक त्या वनस्पतींचा देखील भरपूर वापर करत.

या औषधी वनस्पतींचा वापर लहान मोठ्या आजारांसाठी आणि व्याधींसाठी केला जायचा. या फायद्यांमुळे नागरिकही या वनस्पतींचे संवर्धन करत असत.

परंतू आजकाल वृक्षांच्या संवार्धांसाठी जागाच उपलब्ध होत नाही तर त्याचे संवर्धन तरी कसे करणार असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

 

tree excrete InMarathi

 

अनेक औषध कंपन्यानी देखील आता या वनस्पतीचं संवर्धन करायला सुरुवात केली आहे.

या कंपन्या दुर्मिळ होत चालेल्या लाजाळू सारख्या वनस्पतींच मोठ्या प्रमाणत रोपण करणार आहेत. त्यांच्या औषधांची देखील निर्मितीसाठी या वास्पतींचा वापर मोठ्या प्रमाणावर करणार असल्याचं कळत.

परंतु एवढ्या जीवनावश्यक असलेल्या ह्या वनस्पती गेल्या काही वर्षांपासून अगदी दुर्लभ झालेल्या आहेत. औषधी वनस्पतींचे गुण लक्षात आल्यानंतर देखील नागरिक त्याची काळजी घेताना दिसत नाहीत.

ग्रामीण भागात शेत असलेल्या जागेवर आता प्लॉट पडले त्यामुळे शेतीच्या जागी गगनचुंबी इमारती उभ्या राहू लागल्या त्याचाच परिणाम म्हणून वारेमाप वृक्षतोड आणि पर्यावरणाची हानी होत आहे.

गरजेमुळे उद्योग वाढले उद्योगामुळे प्रदूषण वाढले. आली या सर्व घटकांमुळे लाजाळू व अन्य औषधी वनस्पती दुर्मिळ होत चाललेल्या आहेत.

रक्तस्त्राव थांबविणे खोकला पित्त मुळव्याध या साठी लाजाळूचा औषधी उपयोग मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.

 

acidity inmarathi

 

जखम भरण्यासाठी, वाणी दोष दूर करण्यासाठी, रक्तदोष दूर करण्यासाठी देखील लाजाळू या वनस्पतीचा उपयोग केला जाऊ शकतो यासोबतच दमा श्वास कफ अशा आजारांसाठी देखील तुम्ही लाजाळू या वनस्पतीचा उपयोग करू शकतात असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे.

आयुर्वेदात नव्हे तर अगदी विकिपीडियावर जरी तुम्ही या वनस्पतीचे औषधी गुणधर्म बघितले तर लक्षात येईल की ही वनस्पती किती महत्वाची आहे. इंग्रजीमध्ये या वनस्पतीला मिमोसा प्लांट असे म्हणतात.

त्याच्या वैशिष्ट्यामुळे ही वनस्पती टच मी नॉट किंवा शेम प्लांट म्हणून देखील ओळखली जाते. ही वनस्पती मुख्यतः आफ्रिका खंडात मोठ्या प्रमाणात आढळते.

आणि कसल्याही प्रकारच्या मातीत ही वनस्पती वाढू शकते. इतर वनस्पती प्रमाणे फक्त चांगल्या वातावरणातच वाढू शकते अशी मर्यादा या वनस्पतीची नाही तर अगदी प्रतिकूल वातावरणात देखील धरून राहणं हे चे वनस्पतीचे वैशिष्ट्य आहे.

 

lajalu featured inmarathi

 

या वनस्पतीमुळे असाध्य रोग तर बरे होतातच त्यासोबतच या वनस्पतीचा नियमित सेवन केल्यामुळे मानसिक स्थिती देखील सुधारू शकते असे सांगण्यात येते. या वनस्पती आपण जपल्या पाहिजेत आणि वाढवल्या देखील पाहिजेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “मानवी स्पर्श झाला तर पाने मिटवून घेणारी ही वनस्पती आहे अनेक आजारांवर उपयुक्त!

  • November 18, 2020 at 8:03 am
    Permalink

    तुमच्या या ऍप मुळे मूळव्याधी संदर्भात माहिती मिळाली आणि मी ती रोज घेत आहे.मला आता80%आराम आहे. इन मराठी मी तुमचा खरंच आभारी आहे.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?