' ओबामांनी राहुल गांधींवर लिहिलं असं काही, की भाजप समर्थक म्हणताहेत “माफी मांग ओबामा” – InMarathi

ओबामांनी राहुल गांधींवर लिहिलं असं काही, की भाजप समर्थक म्हणताहेत “माफी मांग ओबामा”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

राजकारणी, त्यांनी केलेलं राजकारण, एकमेकांविरुद्ध सोडलेली टीकास्त्र, डावं-उजवं राजकारण, सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर केलेल्या कुरघोड्या हे विषय जनमानसात कायमच चर्चेचे असतात.

गेल्या काही वर्षांमध्ये तर सोशल मीडियामुळे राजकारणावर भाष्य करायला लोकांना एक हक्काचं व्यासपीठ मिळालंय. भारतातच नव्हे, तर जगातही कोणतीही राजकीय घटना घडली, की सोशल मीडियावर लगेचच त्याचे पडसाद उमटतात. मिम्स, ट्विट्स यांना नव्याने उधाण येतं.

अमेरिकेतील निवडणूक, बिहारमधील निवडणुका, अर्णबला झालेली अटक हे सगळे विषय चर्चेत असताना त्यात आता बराक ओबामा आणि राहुल गांधी यांचीदेखील एंट्री झालीये.

ट्विटरवर तुम्ही गेलात, तर तुम्हाला #माफ़ी_माँग_ओबामा हे ट्रेंडिंग दिसेल. का? बघूया

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या आत्मचरित्रात जगभरातील काही राजकारण्यांबद्दल लिहिले आहे. यामध्ये राहुल गांधी, मनमोहन सिंग, सोनिया गांधी यांचा समावेश आहे.

बघूया ते राहुल गांधींविषयी काय म्हणतायत?

 

rahul gandhi obama inmarathi

 

हे ही वाचा

===

 

न्यूयॉर्क टाइम्सने ओबामांच्या “ए प्रॉमिसिड लँड” या पुस्तकाचा आढावा घेतलाय. टाइम्सच्या वृत्तानुसार, यामध्ये ओबामांनी देखील राहुल गांधींविषयी नकारात्मक भाष्य केले आहे. ते म्हणताहेत, “राहुल गांधी एक नर्व्हस (उदास) आणि कमी योग्येतचे नेते आहेत.

अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या आणि शिक्षकांना प्रभावित करू पाहण्याऱ्या एका विद्यार्थ्याप्रमाणे राहुल गांधी आहेत, पण त्यांच्याकडे त्या विषयात प्राविण्य मिळवण्यासाठी लागणारी योग्यता आणि जिद्द नाही.”

ओबामांनी केलेल्या या भाष्यामुळे ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडलाय आणि आश्चर्याची बाब म्हणजे #माफ़ी_माँग_ओबामा हा ट्रेंड भाजप समर्थकांकडूनही चालवण्यात येत आहे.

ओबामांनी राहुल गांधींविषयी असे शब्द वापरलेच कसे? याबद्दल त्यांनी माफी मागावी असे ट्विट्स नेटकऱ्यांनी केले आहेत.

 

===

 

===

 

===

 

 

===

 

 

===

 

 

===

 

बराक ओबामा यांनी लिहिलेलं हे पुस्तक १७ नोव्हेंबर रोजी उपलब्ध होणार आहे. या पुस्तकात त्यांनी सोनिया गांधी तसेच मनमोहन सिंग यांच्याबद्दल कौतुकाचे उद्गार काढले आहेत.

हे ही वाचा

===

 

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?