'सतत गरगरल्यासारखं होतंय? हे उपाय केलेत तर या समस्येची तीव्रता कमी होऊ शकते

सतत गरगरल्यासारखं होतंय? हे उपाय केलेत तर या समस्येची तीव्रता कमी होऊ शकते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मानवी शरीराशी अनेक प्रकारचे आजार आणि व्याधी जोडल्या गेल्या आहेत. अनेक आजारांचे सहजपणे निदान करता येते परंतु असेही अनेक आजार आहेत ज्यांचे पटकन निदान होत नाही.

गरगरणे किंवा चक्कर येणे हा देखील त्यापैकीच एक प्रकार, जर कोणाला चक्कर येत असेल तर त्यामागे अनेक कारणं असू शकतात. निदान करण्यासाठी चक्कर येणे हे एक सर्वात कठीण लक्षण आहे.

अनेक व्यक्तींना त्यांना चक्कर येत आहे म्हणजे नेमके काय जाणवत आहे हेच व्यक्त करता येत नाही. अगदी एकाच व्यक्तीला अनेक प्रकारे चक्कर आल्यासारखं जाणवू शकत किंवा अनेक व्यक्तींसाठी गरगरणे हे वेगळं असू शकतं.

गरगरणे हे लक्षण सर्व प्रकारच्या आजारांच असू शकतं म्हणजे अगदी साधा आजार असो किंवा प्रचंड जीवघेणा आजार असो.

 

vertigo inmarathi

 

याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, आज आम्ही ह्या लेखाच्या माध्यमातून या लक्षणाची काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती घेऊन आलो आहोत.

चक्कर येण्यासंदर्भात अनेक उपचार उपलब्ध आहेत पण त्यातील योग्य उपचाराची आपल्या आजारानुसार निवड करणे हे देखील तेवढेच गरजेचे आहे आणि म्हणूनच योग्य उपचारासाठी वेळेवर निदान होणे अत्यंत आवश्यक आहे.

त्याआधी आपण चक्कर येण्याच्या प्रकरण विषयी माहिती जाणून घेऊयात.

या लक्षणांना चार गटांमध्ये विभागले जाते.

व्हर्टिगो (स्थिर असतानाही हल्ल्या सारखे वाटणे किंवा चक्कर आल्यासारखे वाटणे)

डिसइक्विलिब्रियम (तोल जाणे)

प्रिसिंकोप (डोळ्यांसमोर अंधारी येणे शुद्ध हरपणे)

लाईट हेडेडनेस (यात भोवतालाशी तुटल्याची धुसर भावना जाणवत राहते)

या सर्व प्रकारच्या चक्कर येण्यामागे अनेक प्रकारची कारणे असू शकतात. परंतु एकदा निदान झाल्यावर हा त्रास कमी व्हावा म्हणून आपण काही उपाय मात्र नक्की करू शकतो.

 

१. पाण्याचे सेवन करत राहणे :

 

water-health-inmarathi05

 

कधीकधी शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी झाल्यास आपल्याला चक्कर आल्यासारखं वाटू शकतो. या गोष्टीसाठी अनेक उपाय उपलब्ध आहेत परंतु सर्वात चांगला उपाय म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी न होऊ देणे.

नेहमी पाणी पीत रहा मुबलक प्रमाणात पाणी पिल्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचा त्रास होणार नाही. उन्हाळ्यात हे प्रमाण अजून थोडे जास्त वाढवा.

 

२. योग्य प्रमाणात झोप घेणे :

 

sleeping Dreams InMarathi Feature

 

या स्पर्धेच्या युगात आपल्याला योग्य प्रमाणात झोप घेणे देखील अवघड आहे अनेक व्यक्तींना टेन्शन आणि तणावामुळे झोप लागत नाही आणि पुरेशी झोप न घेतल्यामुळे अशा प्रकारचे आजार उद्भवतात.

त्यामुळे आपल्या शरीराचा समतोल राखण्यासाठी योग्य प्रमाणात झोप घेणे हे आवश्यक आहे.

 

३. टेन्शन न घेणे :

 

tensed man inmarathi

 

आपल्या सर्वांच्या आयुष्यात अनेक प्रकारचे टेन्शन आहेत. अतिप्रमाणात टेन्शन घेतल्यामुळे आपल्या शरीरातील समतोल ढासळण्याची शक्यता जास्त असते.

त्यामुळे टेन्शन न घेता निरोगी आयुष्य व्यतीत करणं आवश्यक आहे जर तुम्हाला अशा प्रकारची लक्षणे असतील तर तुम्ही टेन्शन घेणे बंद करणं आवश्यक आहे.

 

४. विटामिन डी :

 

vitamin d inmarathi

 

आपल्या शरीरात विटामिन डी ची कमतरता जाणवल्यावर देखील आपल्याला गरगरल्यासारखं वाटू शकतं यावर उपाय म्हणून तुम्ही विटामिन डी घ्यायला सुरुवात करायला हवी.

अगदी बाजारात उपलब्ध असलेलं विटामिन घ्यायला हवं याची काही आवश्यकता नाही ऑरेंज ज्यूस, दूध, अंडी, मासे या पदार्थांचे सेवन केल्यामुळे देखील तुमच्या शरीरातील विटामिन डी चे प्रमाण योग्य प्रकारे राखले जाईल.

याशिवाय तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन आवश्यकतेनुसार सप्लीमेंट आणि इतर औषध घेऊ शकता.

 

५. दारूचे सेवन टाळा :

 

stressful guy drinking inmarathi

 

नेहमीच दारुचे सेवन केल्यामुळे देखील तुम्हाला हा आजार होऊ शकतो. दारुचे आपल्या शरीरावर हानीकारक परिणाम होतात हे तर तुम्ही जाणताच परंतु दारुमुळे तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण देखील झपाट्याने कमी होते.

काही काळाने जेव्हा तुम्ही दारू सेवन केलेली नसेल तेव्हा देखील तुम्हाला याचा त्रास जाणू शकतो.

ज्या व्यक्ती दारू सोडायचा प्रयत्न करतात त्यांना सुरुवातीला हा त्रास नक्कीच जाणवतो त्यामुळे जर तुम्ही या व्यसनापासून दूर राहिलात तर तुम्हाला कसलाही आजार होणार नाही.

या उपायाने सोबतच तुम्ही आहारामध्ये आलं घातलेला चहा, बदाम, तेल (योग्य प्रमाणात), मध या गोष्टींचा नियमित समावेश करायला हवा. या गोष्टी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती तयार करायला मदत करतात.

वरील उपायांचा योग्य पद्धतीने व नेहमी वापर केल्यामुळे तुम्हाला चक्कर येण्याचे प्रमाण नक्कीच कमी होईल.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?