' स्वतःच्या आवाजातून ओळख निर्माण करायची असेल तर या टीप्स तुमच्यासाठी! – InMarathi

स्वतःच्या आवाजातून ओळख निर्माण करायची असेल तर या टीप्स तुमच्यासाठी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आवाज – आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वपूर्ण घटक आहे. दोन व्यक्ती कितीही दिसण्यात सारख्या असल्या, तरीही त्यांच्या आवाजात थोडा फार तरी फरक असतोच.

आपल्या नातेवाईक, मित्रांनादेखील आपण त्यांच्या आवाजावरून सुद्धा ओळखत असतो. फोन वर बोलतांना एखाद्या व्यक्तीच्या आवाजातून त्याचा आनंद किंवा दुःख आपल्यापर्यंत लगेच पोहोचत असतं. आवाजात थोडा जरी बदल वाटला, की आपण लगेच प्रश्न विचारतो, “काही प्रॉब्लेम आहे का?”

आपण कुठून बोलत आहोत हे सुद्धा आपल्या आवाजावरून समोरच्या व्यक्तीला कळत असतं. घरून बोलतांना आपल्या आवाजाचा टोन वेगळा असतो आणि ऑफिस मधून बोलताना हा टोन बदललेला असतो. हा बदल कोणी ठरवून करत नाही. तो आपोआप होत असतो.

कोणत्याही कलाकारासाठी त्याचा आवाज हा फार महत्वाचा असतो. अमिताभ बच्चन, ज्यांना त्यांच्या आवाजामुळे लोकांकडून इतकं भरभरून प्रेम मिळालं, त्यांना त्याच जड आवाजामुळे रेडिओने रिजेक्ट केलं होतं.

लता मंगेशकरजी यांचं एक गाणं आहे, “मेरी आवाज ही, मेरी पहचान है” किती खऱ्या आहेत या ओळी. तुम्हालाही जर तुमचा आवाज ही तुमची ओळख व्हावी अशी इच्छा असेल, त्याला एक विशिष्ट स्वरूप द्यायचं असेल, तर तज्ञ मंडळीनी सांगितलेल्या या काही टिप्स वाचा.

१. दीर्घ श्वसन करा:

 

yoga inmarathi

 

आवाज मोकळा आणि स्पष्ट होण्यासाठी दिवसातून काहीवेळ शांत बसून दीर्घ श्वसन करणं अत्यंत आवश्यक आहे. शरीराला होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठयामुळे शरीरात ताकद निर्माण होते.

श्वसनाचा सराव नियमित करत राहिल्यास तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास आणि स्पष्टता येते. 

२. बोलतांना चोरून बोलू नका:

आपण बघतो, की बरेच लोक हे तोंडातल्या तोंडात बोलत असतात. बोलतांना आपल्या दातांचा वेगळा आकार दिसू नये किंवा तत्सम काही न्यूनगंड त्यांच्यामध्ये असतात, ज्यामुळे त्यांचा आवाज स्पष्टपणे समोरच्यापर्यंत पोहोचत नाही.

असा कोणताही विचार मनात येऊ देऊ नका. हे सोपं नसलं तरी प्रयत्न आपण करूच शकतो. लोकांना तुमच्या बोलण्यात रस असतो, तुमच्या दिसण्यात नाही हे लक्षात असू द्या.

३. ताठ बसून बोलण्याचा सराव करा:

 

sitting womn inmarathi

 

तुमच्या हातांना स्ट्रेच करा आणि काही क्षणासाठी तुमच्या हातावर बसायचा प्रयत्न करा. हे वाचायला थोडं विचित्र वाटेल, पण असं केल्याने तुमचा आवाज मोकळा होतो असं काही अभ्यासांतून समोर आलं आहे.

याशिवाय, नेहमी वाचनाचा सर्व करताना नेहमी ताठ आणि मांडी घालून बसा.

४. आवाजात चढ-उतार आणण्याचा सराव करा:

काही वेळेस मोठ्याने ओरडल्यावरसुद्धा आपला आवाज मोकळा होत असतो. त्याचप्रमाणे कधी गाणं लावून त्यासोबत स्वतः गाणं म्हणा, कधी शॉवर घेतांना गाण्याचा सराव करा. तुमची बोलण्याची भीती निघून जाईल.

गाणं गुणगुणत असतांना कधी वरच्या स्वरात जायचा प्रयत्न करा, तर कधी खालचा स्वर लावायचा प्रयत्न करा. वाचनाचा सराव करतानादेखील आवाजाची पट्टी बदलून सराव करा. एकच वाक्य हळू आणि मोठयाने म्हणा.

५. तुमच्या आवाजावर विश्वास ठेवा:

 

amitabh bachchan kbc inmarathi

 

ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. तुम्हालाच तुमचा आवाज आवडत नसेल, तर तो समोरच्या व्यक्तीला कसा आवडेल? स्वतः बद्दल बोलतांना आत्मविश्वासाने बोला. तुमच्या बोलण्यात जितकी स्पष्टता असेल, तितकी समोरची व्यक्ती तुम्हाला लक्ष देऊन ऐकेल.

‘पब्लिक स्पिकिंग’ मध्ये करिअर करण्याचा विचार करणाऱ्या व्यक्तींनी या टिप्स फॉलो करायलाच हव्यात. यासोबतच महत्त्वाच्या शब्दांवर भर देणे, तुमच्या प्रेक्षकांना अनुरूप अशी माहिती तयार करणे, त्यासाठी नियमित वाचन या टिप्स सुद्धा खूप महत्त्वाच्या असतात.

तुमच्या आवाजात एक गती सुद्धा असायला हवी आणि ठराविक वेळेने एक pause म्हणजेच एक ठहेराव सुद्धा असायला हवा. समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारून बोलतं करणे ही सुद्धा कला आपल्या आवाजात आणि सादरीकरणात असायला पाहिजे.

 

raj thackrey inmarathi

 

आवाजात एक उत्साह दिसल्यास समोरची व्यक्ती सुद्धा तुम्हाला त्याच उत्साहात बोलताना दिसेल हे नक्की. तुमच्या बोलण्यात अं आ… येऊ नये याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे.

बोलण्यात आत्मविश्वास नसेल, तर स्वतः आरशासमोर उभं राहून तुम्ही बोलण्याचा सराव करा. उच्चारांमध्ये स्पष्टता येण्यासाठी संस्कृत श्लोक म्हणा. मुळाक्षरे किंवा बाराखडी मोठ्याने म्हणा.

अधूनमधून आपला आवाज रेकॉर्ड करून तो पुन्हा ऐकावा. असं केल्याने काही बदल आपल्याला लक्षात येतील आणि ते सुधारता येतील. 

आवाज ही गोष्ट तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तरीही महत्त्वाची आहे. त्यामुळे वरील टिप्स नक्की फॉलो करा आणि तुमच्याकडेही अशा काही टिप्स असतील तर आम्हाला नक्की कळवा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?