' अपघातातून जन्माला आलेली ही कला आधुनिक शिल्पकरांनासुद्धा प्रेरणा देते! – InMarathi

अपघातातून जन्माला आलेली ही कला आधुनिक शिल्पकरांनासुद्धा प्रेरणा देते!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सुमारे चार किंवा पाच शतकांआधी जपानमध्ये एका विलक्षण पद्धतीचा शोध लागला जिच्या द्वारे तुटलेली काचेची अथवा मातीची भांडी पुन्हा जोडली जायची.

ही पद्धत साधी सोपी वाटत असली तरी खर्चिक होती.

कारण शिल्पकार तुटलेली भांडी जोडताना द्रव स्वरुपातील सोन्याचा वापर करायचे. या पद्धतीला किंसुगी म्हटले जायचे. म्हणजेच सोन्याचे शिवण असा त्याचा मराठीत अर्थ होतो.

संपूर्ण जगभरात किंसुगी बाबतीत लोकांचे आकर्षण वाढत चाललेले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे जगभरात असे बरेच क्ले स्टुडिओज तयार झाले आहे जिथे मातीची पारंपारिक कलाकृतीची शिल्प अथवा भांडी मिळतात.

या स्टुडिओज मधील शिल्पकार अतिशय आकर्षक दिसणारी मातीची भांडी अथवा वस्तू तयार करतात. त्यामुळे अशा वस्तू विकत घेण्यात लोकही उत्सुक असतात.

इतिहासात किंसुगी ही पध्दत तेच शिल्पकार करायचे ज्यांनी वर्षानुवर्षे लाखे पासून भांडी जोडलेली आहेत. परंतु हल्लीच्या काळात आधुनिक शिल्पकारांनी सुद्धा किंगत्सुगी कसब अवगत केलेले आहे.

 

kinsugi inmarathi

 

महत्त्वाचं म्हणजे या आधुनिक शिल्पकारांऐवजी तुमच्या आमच्यासारखी कोणतीही व्यक्ती किंगत्सुगीचे कसब अवगत करू शकते कारण; किंसुगी वरची बरीच पुस्तके आणि त्याची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे.

किंसुगीमुळे भांडी फक्त पुन्हा जोडली जात नाहीत परंतु ती आकर्षक सुद्धा वाटतात. किंसुगी नक्की कुठे उदयाला आली हे निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे.

परंतु सोळाव्या शतकाच्या अंतिम टप्प्यात किंवा सतराव्या शतकाच्या सुरुवातीला ही पद्धत जपानमध्ये रूढ झाली असे वॉशिंग्टनमधील स्मितसोनीयनस फ्री गॅलरी ऑफ आर्ट अंड अर्थुर एम् सकलार गॅलरीच्या अध्यक्षा लुइस कोर्ट म्हणतात.

किंसुगी पद्धतीची सुरुवात नक्की कुठून झाली असावी याचा शोध घेताना इतिहासात एक किस्सा त्या सांगतात.

पंधराव्या शतकात जपानच्या सैन्य प्रशासकाचे चीनमध्ये बनवलेले सेलेडोनचे भांडे तुटते आणि ते पुन्हा पूर्ववत करण्यासाठी तो ते भांडे पुन्हा चीनमधल्या त्या भांडीविक्रेत्याला पाठवतो.

तेव्हा तो विक्रेता म्हणतो की या सारखे दुसरे भांडे मी तुम्हाला देऊ शकत नाही आणि त्या ऐवजी विक्रेता लोखंडाच्या द्रव्यापासून ते भांडे जोडतो. जी पद्धत चीनमध्ये अस्तित्वात होती.

या किस्सावरून लुईस कोर्ट म्हणतात की, पंधराव्या शतकात सोन्याचा अर्क वापरण्याची ची पद्धत चलनात नव्हती हे आपल्या लक्षात येते. जेव्हा चहाची भांडी वापरण्याचे चलन वाढू लागले तेव्हा किंसुगीचे प्रमाण वाढू लागले असे त्या सांगतात.

सोळाव्या शतकात जपान मधील पारंपारिक किँवा धार्मिक अनुष्ठान किंवा सणासुदीच्या कार्यक्रमात या चहाच्या भांड्यांचा वापर केला जायचा.

भले जगभरातील आधुनिक शिल्पकार किंसुगी पद्धतीचा वापर करत असतील तरी इतिहासामध्ये ती फक्त जपानमध्ये प्रचलित होती. जपान मधून बऱ्याच प्रमाणात ही भांडी अन्य देशांमध्ये विकली जायची.

 

japan art inmarathi

 

ज्यामुळे चीन आणि आणि कोरिया सारख्या देशांमध्ये हे किंसुगी केलेले शिल्प अथवा भांडी इतिहासकारांना सापडलेली आहेत.

कोर्ट लुईस यांच्या अनुसार किंसुगीचा पहिला उल्लेख इतिहासामध्ये इसवी सन सतराव्या शतकाचा आहे. सतराव्या शतकामध्ये एका जपानी सैनिकाला चहाची आकर्षक भांडी वापरण्याची आवड होती.

कोर्ट लुईस म्हणतात की तो बाजारातील जुनी आणि साधी भांडी विकत घेत असे, तोडत असे, त्यानंतर किंसुगी पद्धतीचा वापर करून ती भांडी जोडत असे आणि त्यातूनच बरेच पैसे कमवत असे.

यावरून आपल्याला असे कळते सतराव्या शतकाच्या सुरुवातीस किंसुगी पद्धत आणि चहाची भांडी वापरण्याचे चलन अस्तित्वात आले.

जे शिल्पकार तुटलेली भांडी जोडण्याचे काम करायचे ते जपान मधील लाखेचे काम करणारे लोक होते. हे ते लोक होते जे भांड्यांवर लाकडांच्या किंवा अन्य धातूंच्या भांड्यांवर सुशोभनाचे काम करत असत.

किंसुगीऐवजी त्यांच्याकडे अजूनही एक कला अवगत होती ज्याला मकी- बी असे म्हटले जाते. सोन्याच्या वस्तूंवर रंग चढवणे किंवा चांदीची फुले अथवा नक्षी अन्य सौंदर्यपूर्ण वस्तूंवर लावण्याचे काम या कलेमध्ये अंतर्भूत आहे.

 

kinsugi artist inmarathi

 

पारंपारिक रित्या किंसुगी पद्धतीत पुरुशी नावाच्या द्रवाचा वापर केला जायचा. जे द्रव वनस्पती अथवा झाडांपासून मिळवले जायचे.

सुमारे नऊ हजार वर्षांपासून जपान मधील लाखेचे काम करणारे लोक रंग, पुट्टी आणि फेविकॉल बनवण्यासाठी या द्रव्याचा वापर करतात असे जेन सरतानी म्हणतात.

जेन सरतानी हे पुरातन लाखेच्या गोष्टींचे संग्रह करतात. सध्या ते न्युयॉर्क येथे काम करत आहे. लाखेचे काम करण्याची ही कला सरतानी यांनी पंचवीस वर्षंआधी त्यांच्या वडिलांकडून अवगत केली होती.

सरतानी म्हणतात की पारंपारिक किंसुगी पद्धतीत सुरुवातीला तुटलेली भांडी जोडण्यासाठी गम किंवा फेविकॉलसारखे चिकट द्रव्य वापरले जायचे.

लाखेचा उपयोगसुद्धा तुटलेली भांडी जोडण्यासाठी अथवा भांड्यांना पडलेले छिद्र भरुन काढण्यासाठी केला जायचा.

हे काम करणे अत्यंत कठीण होते असे ते म्हणतात कारण एकदा का लाख सुकली की ती पुन्हा काढता येत नसे त्यामुळे तुटलेले तुकडे पहिल्याच प्रयत्नात लावावे लागायचे.

तुटलेली भांडी जोडण्याची ही परंपरागत पद्धत आधुनिक शिल्पकारांना सुद्धा प्रेरणा देणारी आहे. यामध्ये कोरियन शिल्पकार येसूक्युंग तसेच ब्रिटिश शिल्पकार पाऊल स्कॉट यांचा समावेश होतो.

आधुनिक शिल्पकार किंसुगी पद्धतीचा वापर करत असतील तरी या पद्धतीची फिलॉसॉफी सोळाव्या शतकातील वाबी-ए फिलोसोफी वरच आधारित आहे. या फिलॉसॉफी मध्ये अपरिपूर्णतेतील सौंदर्याविषयी सांगितले आहे.

तुटलेली भांडी जोडण्याची ही कला भले वर्षानुवर्षे टिकली असली तरी तिची निर्मिती अपघातातून किंवा एका भांड्याच्या तुटण्यापासून झालेली आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?