' या माणसाच्या गच्चीवरच अवतरली आहे चक्क "स्कॉर्पिओ" याच्या क्रिएटिव्हिटीला सलाम!

या माणसाच्या गच्चीवरच अवतरली आहे चक्क “स्कॉर्पिओ” याच्या क्रिएटिव्हिटीला सलाम!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“सस्ती चिझो का शौक हम नही रखते…” हा दुनियादारी मधला डायलॉग कित्येक भारतीयांना लागू पडतो. स्वतःला वेगळ्या पद्धतीने सादर करण्यासाठी काही लोक काहीही करायला तयार असतात.

आपण बघतो की कित्येक लोक कार घेतात आणि आपल्या आवडीचा नंबर मिळवण्यासाठी RTO ला जास्तीचे पैसे भरतात.

कित्येक लोक आपल्या गाडी ला मिळालेल्या ५१५१ अश्या नंबर ला दुरून पाहिल्यावर ‘दादा’ हा शब्द दिसेल या पद्धतीने नंबर प्लेट तयार करून घेतात.

 

number plate inmarathi

 

काही लोक गाडीमध्ये फ्रीज बसवतात तर काही लोक अख्खी गाडी ‘DC’ सारख्या कार डिझायनर कडून वेगळ्या पद्धतीने तयार करून घेतात.

शहरालगत झालेल्या औद्योगिक प्रगतीमुळे तिथल्या कित्येक लोकांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात अतिरिक्त मासिक उत्पन्न मधल्या काळात मिळालं आणि तिथून स्वतःला वरचढ दाखवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली.

किमान अपेक्षांचे परिमाण लोकांनी ठरवले. जसं की, गाडी म्हणजे ‘स्कॉर्पिओ’. रंग पांढरा. भलेही गाडीत बसणारे दोनच लोक असतील. पण, गाडी छोटी असणं म्हणजे कमीपणा असं काही लोक मानायला लागले.

आपली गाडी, महागडा मोबाईल या गोष्टींना लोक इतकं महत्व देऊ लागले की, त्यांना स्वतःच्या प्रत्येक महाग वस्तू बद्दल एक विशेष ‘क्रेझ’ त्यांना वाटायला लागली.

हे फक्त महाराष्ट्रातील ‘गुंठा मंत्री’ लोकांपर्यंत मर्यादित नाहीये. हे पूर्ण भारतभर आहे. काही उदाहरणातून जाणून घेऊयात.

बिहार मधील भागलपूर जिल्ह्यातील एका व्यक्तीने त्याची पहिली गाडी ‘महिंद्रा स्कॉर्पिओ’ बद्दलचं प्रेम व्यक्त करण्यासाठी एक नवीनच शक्कल लढवली आहे.

त्याने त्याची गाडी चक्क गच्चीवर नेऊन ठेवली आहे जेणेकरून ती रस्त्यावरून प्रत्येकाला दिसेल. आम्ही रुफ टॉप पार्किंग बद्दल नाही सांगत आहोत. ती आता सहज शक्य गोष्ट झाली आहे.

इंतसार आलम या व्यक्तीने त्याच्या पहिल्या स्कॉर्पिओ गाडीसारखीच पाण्याची टाकी बनवून घेतली.

 

scorpio 2 inmaarathi

 

त्याने केलेल्या या नाविन्यपूर्ण गोष्टीमुळे तो इतका लोकप्रिय झाला की त्याच्या घराचे फोटो इंटरनेट वर व्हायरल झाले आणि चक्क महिंद्रा ग्रुप चे चेअरमन श्री. आनंद महिंद्रा यांनी त्याच्या या कृतीचं कौतुक केलं आहे.

त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडल वरून ही बातमी आणि फोटो बघून अशी एक प्रतिक्रिया दिली आहे,

“स्कॉर्पिओ राईज कर के छत पर पहुंच गई. इसे ही हम राईज स्टोरी कहते है. घर के मालिक को मेरा सलाम. पहिली गाडी के प्रति उनके प्यार को हम सॅल्युट करते है.”

चार मजले घर असलेल्या इंतसार आलम ने स्कॉर्पिओ सारखी हुबेहूब दिसणारी टाकी तयार करून घेतांना नंबर प्लेट च्या ठिकाणी नंबर प्लेट, टायर्स हे सगळे डिझाईन अगदी खऱ्या गाडी सारखे दिसतील अशी काळजी घेतली आहे.

ही टाकी तयार करून घेण्यासाठी अडीच लाख रुपये खर्च इंतसार आलम ने केला आहे.

कशी सुचली कल्पना?

इंतसार आलम हे एकदा आपल्या कुटुंबासोबत आग्र्याला गेले होते. तिथे त्यांनी अशी नाविन्यपूर्ण टाकी बघितली होती. ते बघून त्याला ही कल्पना सुचली. ही टाकी तयार करून घेण्यासाठी त्यांनी खास पंजाब वरून कारागीर बोलावले होते.

हा रस्ता क्रॉस करतांना कोणी तरी या घराचा फोटो क्लिक केला आणि अश्या प्रकारे तो इंटरनेट वर सध्या व्हायरल झाला आहे.

 

car scorpio inmarathi

 

उत्तर भारतात हे वेगळ्या पद्धतीने टाकी तयार करण्याचं प्रमाण खूप जास्त आहे.

पंजाब मध्ये काही घरांवर असलेल्या टाकीला विमानाचं, काहींना प्रेशर कुकर, दारूची बाटली, बैलगाडी असे कित्येक नवीन डिझाईन बघायला मिळतात जे की वेळोवेळी इंटरनेट वर चर्चेत असतात.

कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे एका फोटोग्राफर ने त्याच्या घरावरील टाकी ला कॅमेरा च्या आकारात बनवून घेतलं आहे. त्यामुळे त्याला त्याचं प्रोफेशन सांगायला आणि लोकांना त्याचं घर शोधायला सोपं जात असावं.

जर ही बातमी मार्केटिंग आणि जाहिरात गुरूंनी बघितिली तर ही येणाऱ्या काळात अश्या प्रकारे आपल्या वस्तूंची मार्केटिंग करण्याची एक युक्ती ठरू शकते.

तसंही होर्डिंग उभे करण्यासाठी कित्येक लोकांना बऱ्याच कंपन्या पैसे देत असतात. या केस मध्ये, होर्डिंग सपोर्ट ची सुद्धा गरज पडत नाही. सिमेंट ने तयार होणाऱ्या टाकी वर कालांतराने दुसरे नाव सुद्धा लिहिले जाऊ शकते.

नव्या ट्रेंडची ही नांदी असू शकते. सध्या तरी या क्रिएटिव्ह लोकांचे आभार मानावेत आणि इथून पुढे गाडीतून फिरतांना सिग्नलवर थांबल्यावर अधूनमधून रस्त्यालगतच्या इमारतींच्या छतावर सुद्धा एक नजर टाकावी.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?