' बॉलर्ससाठी कठीण मानल्या जाणाऱ्या टेस्ट क्रिकेटमध्ये या फलंदाजांनी केलाय विक्रम!

बॉलर्ससाठी कठीण मानल्या जाणाऱ्या टेस्ट क्रिकेटमध्ये या फलंदाजांनी केलाय विक्रम!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एखाद्या विषयाचं पूर्ण ज्ञान असणे किंवा एखाद्या खेळाबद्दल सर्व माहीत असणे हे त्या खेळामध्ये असलेल्या आपल्या प्रचंड आवड आणि निष्ठेमुळे होत असतं.

जसं की, भारतात आपण बघतो की, क्रिकेट वर लोकांचं किती प्रेम आहे की, कित्येक लोकांना IPL मधील क्रिकेट मॅच चा सुद्धा स्कोर, पॉईंट्स टेबल या गोष्टी लक्षात राहतात.

क्रिकेट मध्ये कोणतेही बदल न करून ते आपल्या समोर ट्वेंटी ट्वेंटी, वन डे आणि टेस्ट क्रिकेट या तिन्ही प्रकारात लोकांनी क्रिकेट ला पसंती दिली.

क्रिकेट खेळणारे खेळाडू हे बॅट्समन किंवा बॉलर किंवा विकेट कीपर या तीन प्रकारचे असतात. काही वर्ष क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंची ओळख ही त्यांच्या रोल ने होत असते.

जसं की, सचिन तेंडुलकर म्हंटलं की आपल्या समोर त्याची बॅटिंग सर्वात आधी समोर येते. त्याने काही सामन्यात स्पिन बॉलिंग सुद्धा केली होती. पण, त्याचा रोल हा बॅट्समन हाच होता.

त्याचप्रमाणे एम.एस. धोनी म्हंटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी येते ती त्याची चपळाई ने विकेट किपिंग, स्टम्पिंग करण्याची पद्धत.

 

dhoni inmarathi

 

तो हेलिकॉप्टर शॉट साठी सुद्धा तितकाच प्रसिद्ध आहे आणि सर्वात शांत, यशस्वी कर्णधार म्हणून सुद्धा त्याची एक इमेज आपल्या समोर आहे.

या इमेज मुळे बऱ्याच वेळेस खेळाडूंचं इतर योगदान जसं की चांगला फिल्डर, पार्ट टाईम बॉलर असे रोल्स हे झाकोळले जातात.

टेस्ट क्रिकेट हे तिन्ही प्रकारात बॉलर्स साठी सर्वात जास्त कठीण समजलं जातं. कारण, तिथे बॅट्समन हा तितक्या घाईत नसतो आणि म्हणून तो चूक करण्याची शक्यता कमी असते.

त्यामुळे टेस्ट क्रिकेट मध्ये विकेट घेणं हे इतर प्रकारच्या क्रिकेट पेक्षा जास्त अवघड समजलं जातं. काही बॅट्समन असे आहेत ज्यांनी टेस्ट क्रिकेट मध्ये पार्ट टाईम बॉलिंग केली आणि त्यांना विकेट्स सुद्धा मिळाल्या आहेत.

पार्ट टाईम बॉलिंग म्हणजे इतर बॉलर्स ला दिलेली एक विश्रांती म्हणता येईल किंवा प्रतिस्पर्धी बॅट्समन समोर एखाद्या नवीन बॉलर ला बॉलिंग करायचं सांगून त्याला चकित करून त्याची विकेट घेता येणे असं म्हणता येईल.

क्रिकेट च्या चाहत्यांना या सगळ्या ट्रिक्स नक्कीच माहिती असतात.

७ असे फलंदाज आहेत ज्यांनी हा टेस्ट क्रिकेट मध्ये विकेट्स मिळवण्याचा पराक्रम त्यांच्या नावावर नोंदवला आहे :te

 

१. व्ही.व्ही.एस. लक्ष्मण :

 

vvs laxman inmarathi

 

हे नाव घेतलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येते ती ऑस्ट्रेलिया विरुद्ध ची टेस्ट मॅच जिंकून देण्याचा पराक्रम. क्लास फलंदाजी म्हणजे काय हे लक्ष्मण यांच्या फलंदाजीतून नेहमीच दिसायचं.

हे फार कमी लोकांना माहीत असेल की, त्यांनी १३४ टेस्ट मॅच खेळण्याच्या कारकिर्दीत बॉलिंग सुद्धा केली होती आणि त्यांच्या नावावर २ विकेट्स सुद्धा आहेत.

२००२ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध सामन्यात ऍडम संफोर्ड या फलंदाजी ची त्यांनी मोक्याच्या वेळी विकेट घेऊन कर्णधाराने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवला होता.

२००८ मध्ये पाकिस्तान विरुद्ध टेस्ट मॅच खेळतांना त्यांनी आठव्या विकेट साठी झालेली शंभर हून अधिक रन्स ची पार्टनरशीप ब्रेक केली. मोहम्मद समी ची विकेट तेव्हा त्यांनी घेतली होती.

 

२. राहुल द्रविड :

 

rahul dravid Inmarathi

 

आपल्या सर्वांच्या आवडत्या राहुल द्रविड ने क्रिकेट मधल्या सगळ्या क्षेत्रात योगदान दिलं आहे. गरज पडल्यावर विकेट किपर, कॅप्टन आणि बॉलिंग सुद्धा.

ऑफ स्पिन बॉलिंग करत राहुल द्रविड ने टेस्ट मॅच मध्ये एक विकेट सुद्धा मिळवली आहे. ही विकेट होती रिडली जॅकब या वेस्ट इंडिज च्या फलंदाजांची.

२००२ मध्ये झालेली ही तीच टेस्ट मॅच होती ज्या मॅच मध्ये अनिल कुबळे यांना जबड्याला दुखापत झाली होती आणि त्यामुळे इतर खेळाडूंना बॉलिंग संधी देण्यात आली होती.

 

३. सुनील गावस्कर :

 

sunil-gavaskar-inmarathi

 

टेस्ट क्रिकेट मध्ये सर्वात आधी १०००० रन्स करणारे आणि टेस्ट मध्ये ३० शतक झळकवणारे आपले लाडके सनी सर. यांनी सुद्धा टेस्ट आणि वन डे मध्ये बॉलिंग करत क्रिकेट च्या दोन्ही प्रकारात १ विकेट मिळवली आहे.

योगायोग असा आहे की, टेस्ट आणि वन डे या दोन्ही क्रिकेट प्रकारात त्यांनी पाकिस्तान च्या झहीर अब्बास या एकाच खेळाडू ला आऊट केलं होतं.

 

४. अलिस्टर कुक :

 

cook inmarathi

 

इंग्लंडचा ओपनिंग डावखुरा फलंदाज. इंग्लंड कडून टेस्ट मॅच मध्ये १०००० रन्स करणारा हा पहिला फलंदाज होता. पहिल्या आणि शेवटच्या टेस्ट मॅच मध्ये शतक झळकवण्याचा एक विक्रम सुद्धा त्याच्या नावावर आहे.

टेस्ट क्रिकेट मध्ये त्याने एकूण ३ ओव्हर बॉलिंग केली आहे आणि १ विकेट मिळवली आहे. ती विकेट होती भारतीय खेळाडू इशांत शर्मा याची.

 

५. सर डॉन ब्रॅडमन :

 

bradman inmarathi

 

क्रिकेटच्या महान खेळाडूने पूर्ण कारकिर्दीत त्यांचा बॅटिंग ऍव्हरेज कधीच ९९ च्या खाली येऊ दिला नाही.

आपल्या तडाखेबाज फलंदाजी ने ओळखल्या जाणाऱ्या सर डॉन ब्रॅडमन यांनी २ टेस्ट विकेट सुद्धा मिळवल्या होत्या. लेग ब्रेक स्पिन ही त्यांची बॉलिंग ची पद्धत होती.

इव्हन बॅरो या वेस्ट इंडिज चे आणि वॉली हॅमंड इंग्लंड चे या दोन फलंदाजांची विकेट त्यांनी घेतली होती.

 

६. महेला जयवर्धने :

 

jayawardhan inmarathi

 

श्रीलंकेच्या या फलंदाजाने श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघातील ओपनिंग बॅट्समन सदागोपन रमेशची विकेट मिळवली होती.

 

७. मार्क बाउचर :

 

boucher inmarathi

 

दक्षिण आफ्रिकेच्या या विकेट किपर ने १४७ टेस्ट मॅच खेळून फक्त एक ओव्हर बॉलिंग केली आणि त्यातही विकेट मिळवली हे आश्चर्य आहे.

२००५ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना टेस्ट मधल्या एका दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या बॉल वर त्यांनी ब्रावो ची विकेट मिळवली होती.

आपला रोल सांभाळत आपल्या संघासाठी असं योगदान देणारे हे खेळाडू ग्रेटच आहेत.

मिळालेल्या संधीचं सोनं कसं करावं आणि आपण निवडलेल्या खेळात परिपूर्ण कसं असावं ते या खेळाडूंनी आपल्याला दाखवून दिलं आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?