' जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या या पदार्थाचं उत्पादन भारतीयांचे ९०० करोड वाचवेल!

जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या या पदार्थाचं उत्पादन भारतीयांचे ९०० करोड वाचवेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘मेक इन इंडिया’ ही एक मोहीम काही वर्षांपूर्वी भारतात सुरू झाली आणि त्याला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.

भारता सारख्या देशात जिथे लघुद्योग इतक्या मोठ्या प्रमाणावर आहेत, तिथे जीवनावश्यक प्रत्येक वस्तू तयार होणं हे तसं पाहिलं तर अशक्य नाहीये.

गरज आहे ती प्रत्येकाने हे समजून घेण्याची की आपला देशाची अर्थव्यवस्था सुद्धा आपल्या घराच्या अर्थव्यवस्थेसारखीच असते.

जसं घरात अनावश्यक वस्तू विकत आणण्याचं आपण टाळायचा प्रयत्न करत असतो; तसंच आपल्या देशाला सुद्धा आपण ज्या वस्तू आपण आपल्या देशात तयार करू शकतो त्या तयार करून आयात भार कमी करण्यास मदत करावी.

 

imports inmarathi

 

ऑरगॅनिक शेती मुळे बरेच लोक सध्या आपल्या घराच्या आवारातच काही खाद्यपदार्थ, फळं, फुलं यांचं उत्पादन घेत आहेत. हा बदल खूप स्वागतार्ह आहे.

‘आत्मनिर्भर’ होण्याचा संकल्प आपण सर्वांनीच केलेला आहे. आपल्या देशातच उत्पादन घेता येईल अश्या अन्नपदार्थांमध्ये आता ‘हिंग’ चा सुद्धा समावेश झाला आहे.

आपल्या स्वयपाकात वापरल्या जाणाऱ्या हिंगामुळेच पदार्थांना एक विशिष्ट चव आणि सुगंध मिळत असतो.

हिंग तयार कुठे होत असेल?

आपण फार क्वचित अश्या वस्तूंच्या छोटया डबी वर त्यांचं उत्पादन केलेला देश याबद्दल वाचत असतो.

सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार भारतात दरवर्षी १२०० टन इतका हिंग इराण, अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तान सारख्या देशातून आयात होत असतो.

या हिंगाची किंमत ही जवळपास ६०० करोड रुपये इतकी आहे. कित्येक वर्षांपासून हे चक्र असंच सुरू आहे. पण, आता आपल्या शास्त्रज्ञांनी चांगल्या प्रतीचं हिंग भारतात तयार करता येईल याचा अभ्यास केला आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायोरिसोर्स (IHBT) या संस्थेने हे ‘मिशन’ हाती घेतलं आहे आणि त्यामध्ये त्यांना यश मिळायला सुद्धा सुरुवात झाली आहे.

 

hing 2 inmarathi

भारतात हिंग कुठे तयार होऊ शकते?

हिमाचल प्रदेश मधील क्वारिंग या गावात हिंगचे रोप लावण्यात आले आहेत. ज्या भागात हा प्रयोग सुरू आहे त्या भागाचं लहौल वैली असं नाव आहे. हिंग हे एक औषधी म्हणून सुद्धा काही युरोपियन देशांमध्ये वापरलं जातं.

हिंग हे Umbelliferon या वनस्पतींच्या प्रजातीत गणलं जातं. विशिष्ट प्रकारचा वास असलेले वनस्पतींचा या प्रजातीत समावेश करण्यात आला आहे.

एकदा हे रोप आल्यावर कित्येक वर्षांसाठी ते चांगलं रहातं हे सुद्धा त्याचं एक वैशिष्ट्य आहे. जाड मुळं आणि त्यात जमा होणारं पाचक तत्व हे हिंग च्या झाडांचं वैशिष्ट्य आहे.

हिंगाची सुरुवात ही इराण आणि अफगाणिस्तान या देशातच सर्वप्रथम झाली. भौगोलिक परिस्थिती जिथे उबदार आहे आणि त्यासोबतच कोरडी आहे अश्या ठिकाणी हिंगाचं उत्पादन चांगल्या प्रकारे घेतलं जाऊ शकतं असं इतक्या वर्षांच्या अभ्यासातून समोर आलं आहे.

१९६३ आणि १९८९ मध्ये सुद्धा भारतात हिंग उत्पादन करण्याचा प्रयत्न झाला होता ही माहिती नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटीक रिसोर्सेस (NBPGR), नवी दिल्ली या संस्थेने दिली आहे. हे दोन्ही प्रयत्न सफल झाले नव्हते.

२०१७ मध्ये IHBT या संस्थेने NBPGR या संस्थेची मदत घेतली आणि भारतात हिंग उत्पादन करता यावं यासाठी एक प्रोजेक्ट हाती घेतला.

या प्रोजेक्ट साठी हिंगाच्या बिया (सिड्स) या इराण मधून आयात करण्यात आल्या. काही दिवसांसाठी त्या बियांवर इतर कोणत्या वायरस चा प्रभाव नसल्याचं तपासून घेण्यात आलं.

या तपासणी नंतर पालमपूर इन्स्टिट्युट मध्ये या बियांवर अभ्यास करण्यात आला आणि बियांना लॅब मध्ये अंकुर फुटेल का?

 

hing seeds inmarathi

 

आपल्या शास्त्रज्ञांसमोर हे आवाहन होतं की हिंग च्या बियांना अंकुर येण्याचं प्रमाण हे फारच कमी म्हणजे १% इतकंच असतं.

हे साध्य करण्यासाठी या बियांवर काही केमिकल्सचा मारा करण्यात आला. २० दिवसानंतर या बियांना लॅब मध्ये अंकुर आले आणि त्यावर घेतलेल्या मेहनतीचं सार्थक झालं होतं.

जून २०२० मध्ये शास्त्रज्ञांमध्ये हा विश्वास निर्माण झाला की, हिंग हे हिमाचल प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थितीत उत्पादित केलं जाऊ शकतं. हिमाचलच्या कृषी मंत्रालयाने संमती दिल्यानंतर पाच वर्षांच्या या प्रोजेक्ट ला सुरुवात करण्यात आली.

हिमाचल प्रदेश च्या कृषी मंत्रालयाने त्या भागातील ७ शेतकऱ्यांना या हिंगाच्या बियांचं वाटप केलं आहे. वैली मधील चार ठिकाणी हे उत्पादन घेतले जाऊ शकते असा विश्वास शेतकरी आणि शास्त्रज्ञांना आहे.

३५ डिग्री ते ४० या दरम्यान तापमान असावं आणि थंडी ही -४ डिग्री च्या खाली असू नये अशी हिंग ची तापमानाची गरज आहे.

हिमाचल प्रदेश नंतर लडाख आणि उत्तराखंड च्या काही भागात हिंग चे उत्पादन होऊ शकते असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. तिथल्या शेतकऱ्यांना ट्रेनिंग देऊन तिथे सुद्धा हिंग चं उत्पादन लवकरच घेतलं जाईल.

 

hing

हिंगाचे फायदे काय आहेत?

पोटाच्या विकारांपासून हिंगामुळे सुटका होऊ शकते. त्यासोबतच अस्थमा असणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा हिंगाचा वापर जेवणात अधिक प्रमाणात करावा असं सांगण्यात येतं.

त्यासोबतच बाळंतीण स्त्रियांनी हिंगाचा वापर केल्यास प्रकृती चांगली राहते असंही डॉक्टर सांगतात.

ऑक्टोबर मध्ये केलेल्या पाहणी नुसार हिंग साठी वातावरण हे योग्य असल्याचं समोर आलं आहे. एक हेक्टर पासून सुरू केलेली ही लागवड ५ वर्षात ३०० हेक्टर इतकी वाढवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.

या प्रयत्नांना यश येवो आणि आपल्या आवडत्या हिंग च्या डबी वर ‘मेड इन इंडिया’ हे लेबल लवकरच पहायला मिळो अशी आशा करूयात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?