' जिम न लावता घरच्या घरी वजन आटोक्यात आणायच्या या पद्धती वापरून बघाच!

जिम न लावता घरच्या घरी वजन आटोक्यात आणायच्या या पद्धती वापरून बघाच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्यापैकी प्रत्येकाची अशी इच्छा असते की आपलं वजन नेहमी आटोक्यात असायला हवं, आपलं फिटनेस चांगल असायला हवं आणि त्यासाठी कमी कष्ट घ्यायला लागले तर अजूनच चांगलं नाही का?

पण मित्रांनो लक्षात ठेवा जर कष्ट घेतले नाही तर वजन देखील कमी होणार नाही अर्थात आजच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकाकडेच मैदानावर ती जाऊन व्यायाम करण्यासाठी भरपूर वेळ आणि जवळपास मैदान असेलच याची शाश्वती नाही.

म्हणूनच आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घरगुती सोप्या पद्धतीने करता येतील असे व्यायाम घेऊन आलेलो आहोत. हे व्यायाम जर तुम्ही नियमितपणे केले तर तुम्हाला वजनाची चिंता करायची आवश्यकता नाही.

मित्रांनो लक्षात घ्या की वजन कमी करण्यासाठी तुम्हाला नियमितपणे किमान एक तास व्यायाम करण्याची आवश्यकता आहे.

 

indian girl workout inmarathi

 

जर तुम्ही त्यापेक्षा कमी वेळ व्यायाम करत असाल तर तुम्हाला याचा तितकासा फायदा होणार नाही.

व्यायाम सोबतच नियमित आहार (बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे), आपल्या व्यायामाचं एक वेळापत्रक तयार करून घ्या आणि त्यानुसार रोज कुठलेही कारण न देता व्यायाम करा, नियमितपणे नाश्ता करा, जेवणामध्ये सकस आहार घ्या ज्यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरीचे प्रमाण वाढणार नाही, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची जेवणाची वेळ पाळा.

या काही गोष्टींची काळजी घेत तुम्ही पुढे दिलेले व्यायाम केले तर तुम्हाला नक्कीच परिणाम जाणवेल.

खाली काही घरगुती व्यायाम दिलेले आहेत हे व्यायाम जर तुम्ही नियमितपणे केले तर तुम्हाला वजन वाढीची चिंता करावी लागणार नाही.

१. पुश-अप :

 

push ups inmarathi

 

पुश अप हा एक चांगला व्यायाम आहे यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराला फायदा होतो विशेष करून तुमच्या छातीला.

तुमचे दोन्ही हात छातीच्या रेषांमध्ये जमिनीवरती ठेवा आणि त्या दोन्ही हातांवरती संपूर्ण शरीराचं वजन येईल अशा पद्धतीने संपूर्ण शरीर समांतरपणे ठेवा आणि मग तुम्ही व्यायामाला सुरुवात करा.

जर तुम्हाला सुरुवातीला त्रास जाणवत असेल तर काही वेळाच्या अंतराने तुम्ही तुमचे गुडघे खाली टेकवु शकता.

 

२. जंप :

 

jumps inmarathi

 

या व्यायाम प्रकारात तुम्हाला अत्यंत शांत पद्धतीने ठराविक वेळेत उड्या मारायच्या आहेत उड्या फार उंच असू नयेत याची काळजी घ्या उदाहरणार्थ एका मिनिटात पंधरा ते वीस उड्या मारायचा प्रयत्न करा यामुळे तुम्हाला निश्चितच परिणाम जाणवेल.

 

३. स्कॉट्स :

 

squats inmarathi

हे ही वाचा – फक्त ५ मिनिटं हा व्यायाम केलात, तर आरोग्याच्या अनेक समस्या एकाच वेळी सुटतील

हा एक अत्यंत उपयुक्त असा व्यायाम प्रकार आहे तुम्ही घरी अत्यंत सहजपणे हा व्यायाम करू शकता हा व्यायाम प्रकार एक प्रकारे उठबश्यांसारखा केला जातो.

यात फरक फक्त एवढाच की तुम्हाला तुमचे हात हे समोरच्या दिशेने समांतर ठेवावे लागतील.

यात शांतपणे खालच्या दिशेने जात परत वर आल्याने आपल्या पायावर योग्य वजन वाढते आणि आपल्याला योग्य परिणाम जाणवतात.

 

४. वॉकिंग लंग्स :

 

walking lunges inmarathi

 

अगदी नावाप्रमाणेच तुम्हाला या व्यायाम प्रकारात थोडं वेगळ्या प्रकारे चालण्याचा अनुभव घ्यायला लागेल.

म्हणजेच तुमचे एक पाऊल पुढच्या दिशेने नेहमीपेक्षा थोडं लांब टाकायचं आणि दुसरा पाय गुडघ्यातून खाली ठेवायचा अशा प्रकारे व्यायाम केल्यामुळे तुमच्यातील लवचिकता वाढते.

 

५. दोरीवरच्या उड्या :

 

skipping inmarathi

 

हा प्रकार आपणा सर्वांना परिचित आहेच अगदी लहानपणापासून आपण हा प्रकार पाहत आलेलो आहोत पण लक्षात घ्या. नियमितपणे हा व्यायाम केल्यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढीस लागते आणि वजन देखील चांगल्या पद्धतीने कमी होते.

 

६. बॅक एक्सटेन्शन :

 

back extension inmarathi

 

बॅक एक्सटेन्शन या व्यायाम प्रकाराला सुपरमॅन असं देखील म्हटलं जातं. कारण यामध्ये तुम्हाला सुपरमॅन सारखं जमिनीवर ते झोपून आपले डोकं आणि शरीर जमिनीपासून काही वेळासाठी थोडं वर उचलायला लागतं या व्यायामामुळे तुमच्या पाठीचे स्नायू मजबूत होतात.

 

७. टचींग टोज :

 

touching toe inmarathi

हे ही वाचा – जिममध्ये व्यायाम करताना लोक ह्या १५ चुका करतात आणि तब्येतीचे नुकसान करून घेतात

दोन्ही पायांमध्ये योग्य अंतर घेऊन तुम्ही उभे रहा आणि त्यानंतर आपल्या दोन्ही तळ हातांनी तळ पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा प्रयत्न करा.

हे एकदम करायचं नाही तर उजव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला ला स्पर्श करायचं आणि डाव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचं हा व्यायाम नियमितपणे केल्यामुळे तुमच्या शरीरातील चरबी नाहीशी होते.

हे आहेत काही घरगुती व्यायाम प्रकार ज्या व्यायामप्रकारामुळे तुमचे वजन वाढणार नाही.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?