'जेम्स बॉण्डने स्टीव्ह जॉब्सला लिहिलेल्या व्हायरल पत्रामागचं सत्य तुम्ही वाचायलाच हवं!

जेम्स बॉण्डने स्टीव्ह जॉब्सला लिहिलेल्या व्हायरल पत्रामागचं सत्य तुम्ही वाचायलाच हवं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सोशल मीडिया आल्यापासून माहिती सोबतच बऱ्याच नवीन गोष्टी सुद्धा प्रचलित झाल्या आहेत. दोन चर्चेत असलेल्या लोकांमध्ये झालेला एखादा संवाद घेऊन मीम तयार करणे असेल किंवा त्या व्यक्तीने मागे कधी उल्लेख केलेली गोष्ट असेल.

प्रत्येक जण मागे लागलेला असतो की, कसं ही करून तो मुद्दा, ती व्यक्ती चर्चेत असेपर्यंत त्याबद्दल आपलं मत एका विनोद निर्माण करण्याच्या किंवा विडंबन करण्याच्या मार्गाने मांडायचं आणि लोकांकडून व्हर्च्युअल शाबासकी मिळवायची.

कोणतीही बातमी ‘मी पहिल्यांदा कशी देईल?’ ही एक चढाओढ कायम लोकांमध्ये सुरू असलेली आपल्याला दिसते. आपल्या विचारांची देवाण घेवाण घेण्यासाठी सोशल मीडिया चा वापर करावा हे तेव्हा बरेच लोक विसरलेले असतात.

तेव्हा ते फक्त एका न्यूज रिपोर्टर च्या रोल मध्ये गेलेले असतात.

 

social media inmarathi

 

एक अजून घाई लोकांना दिसते ती म्हणजे, एखाद्या सेलेब्रिटी व्यक्तीला हॉस्पिटल मध्ये दाखल केलेलं असल्यास आणि त्या व्यक्तीची प्रकृती अत्यवस्थ असल्यास ती व्यक्ती हयात असतांनाच तिच्या निधनाचे खोटे मेसेज काही लोक तितक्या वेळात तयार करतात आणि सोशल मीडिया वर त्याला पसरवतात.

स्व. कादर खान आणि स्व. सदाशिव अमरापूरकर तसेच निशिकांत कामत यांच्या वेळी असं झालेलं आपण बघितलं आहे.

सत्यता न पडताळता ‘Forwarded as Received’ हे लिहून कित्येक लोक अश्या खोट्या बातम्या सर्रास पसरवत असतात.

काही वृत्तवाहिनीने पसरणाऱ्या बातम्या, विडिओचं सत्य लोकांसमोर आणण्यासाठी ‘व्हायल सच’ सारखे काही विशेष कार्यक्रम तयार केले आहेत.

याच पठडीत बसणारी अजून एक बातमी सध्या वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे. ही बातमी आहे की, नुकतंच निधन झालेल्या शॉन कॉनरी (पडद्यावरील सर्वात लोकप्रिय जेम्स बॉण्ड) यांनी कधी काळी ‘apple’ कंपनीचे जनक स्टीव्ह जॉब्ज यांना ‘कम्प्युटर सेल्समन’ असा उल्लेख करून अपमानित केलं होतं.

एक पत्र सध्या फिरत आहे ज्यात शॉन कॉनरी यांनी स्टीव्ह जॉब्ज यांना उद्देशून असं लिहिलं आहे की,  “You are a Computer salesman, I am fucking James Bond”.

 

sean connery inmarathi

 

शॉन कॉनरी आणि स्टीव्ह जॉब्ज या दोन्ही व्यक्ती यशस्वी आहेत. सेलेब्रिटी आहेत. सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या बद्दल मिळालेल्या कोणत्याही बातमीला सध्या खप आहे हे लक्षात काही लोकांनी स्वतःच हे पत्र तयार केले आहे आणि त्यांना व्हायरल केलं आहे.

आपल्या वेबसाईटवरचा ट्रॅफिक वाढवण्यासाठी केलेली ही एक शक्कल आहे. आपल्याला आठवत असेल तर काही वर्षांपूर्वी आपल्याकडे ‘तहेलका डॉट कॉम’ ही वेबसाईट अश्याच पद्धतीने रातोरात चर्चेत आली होती.

शॉन कॉनरी या जगभरात लोकप्रिय असलेल्या कलाकाराचं ३१ ऑक्टोबर शनिवारी वृद्धापकाळामुळे निधन झालं होतं. ते ९१ वर्षांचे होते. आपल्या कामात त्यांनी कायम नावीन्य टिकवण्याचा प्रयत्न केला.

२००५ मध्ये एक अशी वेळ आली होती जेंव्हा अपेक्षित असे रोल त्यांना मिळत नव्हते. तेव्हा त्यांनी एक ब्रेक घेतला होता आणि एका ठिकाणी ते असं बोलले होते की, “idiots are making films in Hollywood.”

त्यांच्या बद्दल खोटं पत्र तयार करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या याच फटकळ बोलण्याच्या इमेजला डोळ्यासमोर ठेवून हे कारस्थान केल्याचं बोललं जात आहे.

टाईपरायटर वर लिहिलं गेलेलं हे पत्र हे सांगतं की, एकेकाळी स्टीव्ह जॉब्ज यांनी शॉन कॉनरी यांना apple कंपनीचा ब्रँड ambesedor होण्याची विनंती केली होती. ज्याला की शॉन कॉनरी यांनी स्पष्ट विरोध केला होता.

हा विरोध दर्शवण्यासाठी शॉन कॉनरी यांनी स्टीव्ह जॉब्ज यांना उद्देशून एक पत्र लिहिलं होतं असा भास तयार करण्यात आला आहे.

“मी तुम्हाला परत एकदा सांगत आहे. तुम्हाला इंग्रजी समजतं ना? मी माझा आत्मा apple किंवा कोणत्याही कंपनीसाठी कधी विकत नाही. तुमच्या सारखं मला जग बदलण्याची कोणतीही इच्छा नाहीये. मला जे पाहिजे ते तुमच्याकडे नाहीये. तुम्ही फक्त एक कम्प्युटर सेल्समन आहात आणि मी जेम्स बॉण्ड आहे.”

हे खोटं पत्र तयार करणाऱ्या व्यक्तीच्या शब्दात या पत्राचा मायना असा आहे की,

“I will say this one more time. You do understand English, don’t you ? I do not sell my soul for Apple or any other company. I have no interest in ‘changing the world’ as you suggest.

You have nothing that I need or want. You are a computer salesman — I am fucking JAMES BOND.”

 

letter 2 inmarathi

 

जसं एखादा चोर सफाईदार पणे चोरी करतो तशी या फेक व्यक्तीने भाषा वापरली आहे आणि पत्राखाली शॉन केनेरी यांची एक खोटी सही सुद्धा केली आहे.

हे पत्र जसंच सोशल मीडिया वर पसरायला लागलं तसंच फेसबुक ने त्याला ‘fake’ असं घोषित केलं पण तोपर्यंत या फॉरवर्ड आणि share प्रिय लोकांनी त्यांची ‘अति तत्पर’ सेवा देण्यास सुरुवात केली होती.

ट्विटर वर सुद्धा हे पत्र खोटं आहे हे कळून सुद्धा वारंवार रिट्विट होत आहे. CNET या संस्थेने दिलेल्या बातमी नुसार हे पत्र २०११ मध्येच इंटरनेट वर व्हायरल झालं होतं.

वर्षागणिक वाढणाऱ्या इंटरनेट वापरामुळे आणि सध्याच्या वातावरणामुळे या पत्राला सध्या खूप प्रसिद्धी मिळत आहे.

कारण हे पत्र तयार करणाऱ्या व्यक्तीला हे माहीत आहे की, कोणत्याही चर्चेत असलेल्या व्यक्तीबद्दल कित्येक लोक हे गुगल सर्च करत असतात आणि आता हे पत्र खूपदा फॉरवर्ड झाल्याने त्याला अपेक्षित तो प्रतिसाद त्याला मिळणार.

Scoopertino या नावाने ही वेबसाईट चालवली जाते ज्यावर apple कंपनी बद्दलच्या खोट्या बातम्यांची मालिका नेहमी सुरू असते. जर का हे पत्र लक्षपूर्वक वाचलं तर एक गोष्ट लक्षात येईल की, सही करण्याच्या ठिकाणी “007” असं लिहिलं आहे.

शॉन कॉनरी सारखी व्यक्ती स्वतःचा असा उल्लेख पत्रामध्ये करणं हे केवळ अशक्य आहे. शॉन कॉनरी हे स्वतः मागील कित्येक वर्षांपासून स्वतःला “007” या इमेज च्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते.

 

sean connery 2 inmarathi

 

ज्यामध्ये ते काही अंशी यशस्वी झाले होते आणि मधल्या काळात त्यांनी काही इतर महत्वाचे रोल सुद्धा केले होते. या पत्रात उल्लेख केलेल्या तारखे पर्यंत शॉन कॉनरी हे जेम्स बॉण्ड च्या इमेज मधून स्वतः पुरते तरी नक्कीच बाहेर पडले होते.

३१ ऑक्टोबर २०२० रोजी आपल्या राहत्या घरी बहामा इथे शॉन केनेरी यांचं निधन झालं. लॅन फ्लेमिंग यांनी लिहिलेला पहिला जेम्स बॉण्ड शॉन केनेरी यांनी पडद्यावर साकारला होता.

पहिला आणि सर्वोत्तम जेम्स बॉण्ड हे नाव त्यांना नेहमीच रसिकांनी दिलं आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांना एक ऑस्कर पुरस्कार, ३ गोल्डन ग्लोब आणि २ बाफ्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे.

Indiana Jones, Last Crusade आणि The Hunt for Red October हे त्यांचे इतर लोकप्रिय रोल म्हणता येतील.

इंटरनेट चा वापर करताना आपली पण काही तरी जवाबदारी असते. फक्त ‘ह्याने पाठवलं म्हणून मी पुढे पाठवलं’ असं वागणं हे अत्यंत बेजवाबदार पणाचं आहे. अश्या वागण्याला कुठे तरी नक्कीच आळा बसला पाहिजे.

चांगली माहिती ही नक्कीच जास्त लोकांपर्यंत पोहोचावी.

पण अशी चुकीची माहिती पसरवताना स्वतःला त्या व्यक्तीच्या ठिकाणी समजून आपल्या सद्सत विवेकबुद्धी ला पटल्यावर मगच कोणताही मेसेज फॉरवर्ड, शेअर करावा असं या निमित्ताने आपण सगळे ठरवूयात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?