' बोलायला, संवाद साधायला अडचण वाटतेय? मग या टिप्स कायम लक्षात ठेवा!

बोलायला, संवाद साधायला अडचण वाटतेय? मग या टिप्स कायम लक्षात ठेवा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘संवाद हरवला आहे’ हे वाक्य आपण सध्या बऱ्याच वेळेस ऐकत असतो. एक काळ होता जेव्हा लोक एकमेकांशी तासंतास गप्पा मारायचे. आज मात्र जुने मित्र जरी एकत्र आले तरीही पहिले काही मिनिटं बोलणं होतं.

नंतर तो त्याच्या मोबाईल मध्ये व्यस्त होतो आणि आपण आपल्या मोबाईल मध्ये बघायला लागतो. मित्रांच्या बाबतीत हे होतं, तर अनोळखी लोकांसोबत आपण कधी बोलू शकणार? हा एक प्रश्नच आहे.

तुम्ही एखाद्या बस स्टॉप वरचा सीन डोळ्यासमोर आणा. चार पाच लोक बस ची वाट बघत असतात, ते सगळेच मोबाईल मध्ये बघत असतात.

कधी कधी असंही होतं की बस येते आणि निघूनही जाते, तरीही एक व्यक्ती तिथेच बसलेली असते. कारण, तिने कोणालाच सांगितलेलं नसतं की त्याला कुठे जायचं आहे?

 

bus stop inmarathi

 

आपलं ही एका अर्थाने असंच होत आहे सध्या. मनात काय आहे ते आपण कोणालाच सांगत नाही, त्यासाठी कोणाची मदत मागत नाही आणि नंतर कुठेच पोहोचलो नाही ही खंत आपल्याला लागून राहते.

हे तर झालं त्रयस्थ लोकांचं उदाहरण. संवाद खुंटल्याने कित्येक वैवाहिक दाम्पत्य सुद्धा सध्या त्रासलेले आहेत. कारण, घरी आला तरी तो तिच्या मोबाईल मध्ये आणि ती तिच्या.

सध्या तर कोरोना मुळे तसंही कोणीच प्रत्यक्ष भेटत नाहीये. त्यामुळे एकुणच लोकांमध्ये प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी एक न्यूनगंड तयार होत आहे. कारण एकच, गोष्टी सरावात नसल्या की त्या अवघड वाटायला लागतात.

खरंच इतकं अवघड आहे का संवाद साधणं? या टिप्स वापरल्या तर अजिबात नाही :

१. मनाची तयारी :

एखाद्या रूम मध्ये आपण आहात जिथे की आपल्याला ओळखणारं कोणीच नाहीये आणि तुम्हाला तर तिथेच थोडा वेळ घालवायचा आहे. काय करणार? कोणत्या व्यक्तीशी काय बोलायचं आहे हे आधी मनात ठरवून घ्या.

आपली ट्रेन रुळावरून खाली उतरणार नाही हे मनाशी ठरवा आणि बोलायला सुरुवात करा. चुका होतील, होऊ द्या. दीर्घ श्वास घ्या, रिलॅक्स व्हा आणि मग बोला.

 

people talking inmarathi

 

स्वतःची ओळख आधी करून द्या आणि मग समोरच्या व्यक्तीला त्याच्या बद्दल विचारा. प्रत्यक्ष असो किंवा फोनवर लोकांना डायरेक्ट ‘तुम्ही कोण?’ हा प्रश्न विचारलेला आवडत नसतो. आधी स्वतःबद्दल सांगा.

२. राजकारणावर बोलणं टाळा :

भारतीय सोशल मीडियाचा ‘राजकारण’ हा आवडता विषय आहे. पण, प्रत्यक्ष भेटल्यावर कोणाशीही त्या विषयावरून बोलायला सुरुवात करू नका. तुमचे views मॅच होणार नाहीत आणि संवाद पुढे सरकणारच नाही.

एका अभ्यासामधून असं समोर आलं होतं की, एखाद्या स्पोर्ट्स पासून जेव्हा संवादाची सुरुवात होते तो जास्त पुढे जाऊ शकतो. जेव्हा तुम्ही एखाद्या पार्टी मध्ये असाल तेव्हा एकसारख्या खाण्याच्या पद्धतीने सुद्धा तुमचा संवाद सुरू होऊ शकतो.

३. सकारात्मक विचार मांडा :

आजकाल कोणालाच तक्रारीचा सूर असलेले लोक आवडत नाहीत. तुम्हाला जगण्यासाठी प्रश्न आहेत तेच समोरच्या व्यक्तीला सुद्धा आहेत. तुमचे प्रश्न मोठे करून सांगण्याचा प्रयत्न करू नका.

समोरची व्यक्ती तुमच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात करेल.

एखादा अन्नपदार्थ, हवामान यांची तारीफ करत संवादाला सुरुवात करा. तुमच्यातली सकारात्मकता समोरच्या व्यक्तीला दिसेल आणि त्या व्यक्तीला सुद्धा तुमच्याशी बोलण्याची इच्छा निर्माण होईल.

 

people chatting inmarathi

४. सोपे विषय निवडा :

सुरुवात करतानाच अवजड विषय घेऊन सुरुवात करू नका. कोणालाच फिलॉसॉफीकल टॉपिक्स वर पहिल्याच भेटीत बोलायला आवडत नसतं.

आधी कॉमन विषयांवर बोलावं. क्रिकेट मध्ये जसं सुरुवातीला सिंगल्स, डबल्स रन करत मग सिक्स मारण्याचा विचार करतात. तसंच संवाद साधण्यात सुद्धा एक पद्धत असते.

सध्या आपण ज्या वातावरणात आहोत त्याबद्दलच बोलावं, म्हणजे समोरची व्यक्ती शांत असली तरीही काही तरी तर बोलूच शकेल.

५. मदत मागणे किंवा माहिती विचारणे :

आजकाल प्रत्येकाकडे प्रत्येक विषयाची माहिती असते. संवाद सुरू करायची इच्छा असेल तर तुम्हाला माहीत नसलेल्या एखाद्या विषयावर समोरच्या व्यक्तीला माहिती विचारा.

त्याने त्याच्या छंद, आवड यामध्ये स्वतःबद्दल सांगितलं असेल तर त्यापैकीच एखाद्या गोष्टीवर तुम्ही माहिती किंवा त्याबद्दल तुम्हाला हवी असलेली एखादी मदत मागून तुम्ही संवाद सुरू करू शकता.

तुमचा प्रश्न “कार इन्श्युरन्ससाठी कोणती कंपनी चांगली आहे?” इतका सोपा सुद्धा असू शकतो.

६. ऐकणे :

संवाद हा फक्त शब्दांनीच साधायचा नसतो. तर, तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या विषयात आवड आहे हे लक्ष देऊन ऐकण्याने सुद्धा तुम्ही त्याला सांगत असतात.

एखादा प्रश्न विचारून शांत रहा. लोकांना ऐकणारे लोक फार आवडत असतात. त्या व्यक्तीचं काम, छंद याबद्दल प्रश्न विचारा आणि उत्तराला आश्चर्य किंवा नवीन माहिती मिळाल्याच्या अविर्भावात प्रतिसाद द्या.

 

good listner inmarathi

 

संवाद साधण्यासाठी योग्य व्यक्ती निवडणे हे सुद्धा शिकलं पाहिजे. यशस्वी व्यक्ती सोबत तुमचा संवाद चांगला होऊ शकतो. कारण, त्याच्या मनात कोणतीही कटूता नसते.

तुमच्याशी त्या व्यक्तीने का बोलावं? तुमच्यात काय विशेष आहे? याचं उत्तर स्वतःला द्या म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या संवादातून तो समोरच्या व्यक्तीला दिसेल.

तुमच्या आवडीचा नसलेला किंवा तुम्हाला काहीच माहीत नसलेल्या विषयातून नम्रपणे माघार घेणे हे सुद्धा लोकांना तुमच्यातील प्रामाणिकपणा दाखवत असतो. जसे आहात, तसेच वागा.

तुमच्याशी संवाद साधण्यासाठी लोक सुद्धा तितकेच उत्सुक असतील. लोकांना ओरिजनल लोक लगेच ओळखू येत असतात आणि आवडत देखील असतात.

संवाद साधण्याचे उद्देश वेगवेगळे असू शकतात. वरील टिप्स वापरल्या तर तुम्ही तुमच्या उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरू कराल हे नक्की.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?