' शनिवारची बोधकथा : कितीही वेळा हरलात, तरी ही कथा तुम्हाला उठून लढण्याचं बळ देईल! – InMarathi

शनिवारची बोधकथा : कितीही वेळा हरलात, तरी ही कथा तुम्हाला उठून लढण्याचं बळ देईल!

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

तू बुद्धी दे, तू तेज दे..नवचेतना विश्वास दे….
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे….

संघर्ष….माणसाच्या आयुष्यातली एक अटळ गोष्ट! असं म्हणतात, की टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. अहो एवढंच काय, हिऱ्यालाही मौल्यवान होण्यासाठी झिजावं लागतंच की!

संघर्ष केल्याशिवाय, कष्ट सोसल्याशिवाय मानून कधीच मोठा होत नाही. बहिणाबाईंनी पण म्हणून ठेवलंय… “आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर”.

याच संघर्षाला जिद्दीची, चिकाटीची आणि निरागसतेची जोड मिळाली तर? आजची बोधकथा तुम्हाला एका निरागस संघर्षाचा प्रवास सांगणार आहे.

 

saturday inspirational story

 

तुम्ही शाळेत असताना कधी एखाद्या स्पर्धेत पहिलं येण्यासाठी प्रयत्न केलेत? मनापासून? ही कथा देखील अशाच शाळकरी मुलीची आहे. अल्लड वय, स्वच्छंदी स्वभाव असणाऱ्या आनंदीची ही गोष्ट!

आनंदी… नावाप्रमाणेच सगळ्यांना आनंद देणारी आणि स्वतःही आनंदी आयुष्य जगणारी मुलगी. एकदा शाळेत ती शर्यतीत भाग घ्यायचं ठरवते आणि तेही का, तर जो कोणी शर्यतीत जिंकेल, त्या विद्यार्थ्याला बटरस्कॉच आईस्क्रीम बक्षीस मिळणार असतं.

शाळेच्या फलकावर आनंदी शर्यतीची सूचना वाचते आणि पुढचा मागचा कोणताही विचार न करता, “आपण या स्पर्धेत भाग घ्यायचा आणि जिंकायचं” हे मनाशी पक्क ठरवते.

घरी आल्यावर आईबाबांना सुद्धा ही बातमी सांगते. आईबाबांना तिचं खूप कौतुक वाटतं. तेही तिला प्रोत्साहन देतात. शर्यतीला अजून २ महिने अवकाश असतो. या वेळात आपण खूप प्रॅक्टिस करायची असं ती ठरवते.

 

girl running inmarathi

 

दुसऱ्या दिवसापासून बाबांच्या मागे लागून रोज सकाळी धावण्याची प्रॅक्टिस करते, अगदी मन लावून. दोन महिने असेच निघून जातात. शेवटी स्पर्धेचा दिवस उजाडतो.

आनंदीने या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली आहे हे माहित असल्यामुळे तिच्या आईवडिलांना तिच्या विजयाबाबत खात्रीच असते. “आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला नक्की मिळेल” असा आनंदीचाही विश्वास असतो.

स्पर्धा सुरु होते… आनंदी गेल्या अनेक महिन्यांची प्रॅक्टिस, स्वतःची सगळी मेहनत पणाला लावते. विजय हा तिचाच होणार असतो. शर्यतीच्या अंतिम टप्प्यात पोहोचते… विजयरेषा तिच्या नजरेसमोर असते…

इतक्यात ती अडखळते, पडते आणि मागून येणारा विद्यार्थी विजयी होतो. तिला खूप वाईट वाटतं. तीन महिन्यांची मेहनत वाया गेली असा विचार तिच्या मनात येतो. घरी येते आणि खूप रडते.

——–

या बोधकथाही तुम्हाला आवडतील  –

शनिवारची बोधकथा : ही गोष्ट सांगेल तुम्हाला जगण्याचा मंत्र

शनिवारची बोधकथा : संकटात कोणीतरी सोबत असतं!

———

तेवढ्यात बाबा तिच्यासाठी बटरस्कॉच आईस्क्रीम घेऊन येतात. तिच्या पुढ्यात वाटी ठेवत तिचं अभिनंदन करतात. तिला क्षणभर कळतच नाही… ती म्हणते, “बाबा, मी तर हरलेय ना? मग मला का आईस्क्रीम?”

 

ice cream inmarathi1

 

यावर तिचे बाबा जे उत्तर देतात, ते आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा कानमंत्र होऊ शकतं. ते म्हणतात, “अगं बाळा, पन्नास विद्यार्थ्यांमधून दुसरी आलीयेस, म्हणजे उरलेल्या ४९ विद्यार्थ्यांमधून तर तू पहिलीचं आलीयेस ना? हे बक्षीस तुझ्या प्रयत्नांसाठी आहे.”

मित्रांनो, आपल्या आयुष्यातदेखील असे अनेक प्रसंग येतात, जेव्हा आपण हरण्याने खचून जातो. जिंकणं ही अर्थातच आनंदाची बाब आहे, पण हरणं हे प्रत्येक वेळेसच वाईट नसतं.

हरणं ही एक प्रक्रिया आहे, ती तुम्हाला खूप काही शिकवत असते. जिंकण्याचं वेड हे जरूर असावं, पण हरण्याने खचून न जाता, प्रयत्न करून स्वप्न सत्यात उतरवण्याची हिंमत ठेवली पाहिजे.

गीतेत भगवान म्हणतात त्याप्रमाणे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन| काम करणं, प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे. त्याचं फळ काय मिळेल याचा विचार न करता तुम्ही तुमचे प्रयत्न प्रामाणिकपणे करा, तुमचं भविष्य हे सुंदरच असेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?