' ऐनवेळी टायर पंक्चर झाल्यामुळे होणारा मनस्ताप टाळायचा आहे का? मग हे वाचाच! – InMarathi

ऐनवेळी टायर पंक्चर झाल्यामुळे होणारा मनस्ताप टाळायचा आहे का? मग हे वाचाच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

नोकरी मिळाली की, प्रत्येक माणसाचे पहिले स्वप्न असते की घराबाहेर एक रुबाबदार गाडी असावी. मग खूप महिन्यांची बचत केल्यानंतर या गाडीचे स्वप्न पूर्ण होते. बऱ्याचदा गाडी घेतल्यानंतर, त्यासाठीचे कर्ज कितीतरी वर्ष फेडत रहावे लागते.

 

old car sale inmarathi

 

भले गाडीचे कर्ज फेडण्याचा ताण असला, तरी अंगणात उभ्या असलेल्या गाडीमुळे रुबाब अधिकच वाढतो हे मात्र खरे!

या गाडीसाठी एवढे पैसे खर्च केलेले असतात, की गाडी म्हणजे प्रत्येक मालकाचा जीव की प्राण असते. अशा या महागड्या गाडीला चुकूनही काही झाले तर जीव खालीवर होतो.

पण टवाळ लोकांना कोण समजावणार? एखाद्याच्या अंगणात सुंदर गाडी दिसली की तिचे सौंदर्य निहाळण्याऐवजी तिला विद्रूप कसे करता येईल, घाईघाईत कामावर निघालेल्या मालकाची फजिती कशी करता येईल? हेच प्रयत्न या टवाळ लोकांचे असतात.

कधीतरी मालक नसताना गाडीच्या काचांवर काहीतरी लिहून ठेवणे, गाडीच्या सायलेन्सरमध्ये दगड किंवा कागदाचा बोळा अडकवून ठेवणे, असे संताप आणणारे “पराक्रम” अशी मंडळी करतात. 

पण डोक्याला वैताग आणणाऱ्या या मंडळींचा सगळ्यात आवडता प्लॅन म्हणजे गाडीचे टायर पंक्चर करणे. त्यांच्या ह्या प्लॅनमुळे मालकाच्या अगदी नाकी नऊ येतात.

 

silencer-stone-inmarathi

 

ऐन वेळेला घाईगडबडीत असताना असा प्रकार कळला, की तळपायाची आग मस्तकात जाते. पण, काही केल्या ही मंडळी सुधरणार नाहीत याची जाणीव तुम्हालाही असते. म्हणूनच आपण आधीच सावधगिरी बाळगलेली कधीही चांगली.

गाड्यांमध्ये ट्यूब टायर आणि ट्यूबलेस टायर अशा दोन पद्धतीचे टायर्स असतात. ट्यूब टायरचे पंक्चर काढणे अधिक मेहनती काम आहे. परंतु ट्यूबलेस टायरचे पंक्चर काढणे खूप सोपे आहे.

ट्युबलेस टायरचा आणखी एक फायदा असा, की या टायरमध्ये पंक्चर झाले तरीही हवा जायला काही दिवस लागतात (हो दिवस).

ट्यूबलेस टायरचे वैशिष्ट्य म्हणजे टायरमध्ये ट्यूब बाहेर काढण्याची गरज नसते. तरी पंक्चर काढणारे मेकॅनिक अधिक नफा कमवण्यासाठी याचे पैसे अधिक घेतात.

जे पंक्चर काढायला ५-२५ रुपये सुद्धा खर्च येत नाही त्याचे हे लोक १००-१०० रुपये घेतात. आपण त्यांचे निरीक्षण करत नसल्यास ते टायरमध्ये एका पंक्चर ऐवजी आपल्याला दोन किंवा तीन पंक्चर दाखवतात. आपल्याकडून जास्त पैसे उकरतात.

मुळातच, जर तुमच्या गाडीला ट्यूबलेस टायर असेल तर पंक्चरवाल्याकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः सुद्धा गाडीचे पंक्चर काढू शकता.

वर म्हटल्याप्रमाणे ट्यूबलेस टायरचे पंक्चर काढणे खूप सोपे असते. दुकानवाले १ पंक्चर काढायचे १०० रुपये घेतात आणि आपले लक्ष नसताना अजून ३-४ पंक्चर करतात तेही अगदी सराईतपणे.

 

punctured-tyre-inmarathi

 

त्यामुळे तुम्ही स्वतः पंक्चर काढणे हे सोपेच नव्हे तर फायद्याचे सुद्धा आहे. ट्यूबलेस टायरचे पंक्चर रिपेयर किट १५० रुपयाच्या दरात बाजारात मिळते.

एकदा हे किट विकत घेतल्यानंतर किमान १० पंक्चर काढेपर्यंत यात तुम्हाला कोणतीही नवीन सामग्री घ्यावी लागणार नाही. भले तुमच्या किट मधील १० स्ट्रिप्स संपल्या तरी त्या ५ रुपयाला १ प्रमाणे मिळतात. ज्या अगदीच स्वस्त आहेत.

ट्युबलेस पंक्चर कसे काढावे याचे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत. पण तुम्हाला याची माहिती मिळावी यासाठी आम्ही ही या बाबतीत सविस्तर सांगणार आहोत.

सर्वप्रथम तर तुम्ही ट्यूबलेस टायर पंक्चर किट खरेदी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तुम्ही गाडीत पोर्टेबल एयर पंप सुद्धा ठेवा. ज्याची किंमत फक्त ३०० ते ४०० रुपये आहे.

हा एअर पंप जवळ बाळगणे खूप उपयोगी ठरू शकते. तुमची गाडी मोठ्या प्रवासादरम्यान पंक्चर झाली तर हायवेवरील पंक्चर वाल्याकडे जाणे, खिशाला कात्री लावण्यासारखे ठरेल.

पंक्चर कीट वापरण्याचा उपाय अगदीच “बजेट फ्रेंडली” आहे.

 

puncture-repair-kit-inmarathi

 

या पंक्चर रिपेरिंग किटमध्ये खाली दिलेल्या गोष्टी असतात:

१) स्पायरल प्रोब (याचा वापर पंक्चर झालेली जागा स्वच्छ करण्यासाठी होतो)

२) स्प्लिट आय इन्सर्टटेशन टूल (याचा वापर टायरमध्ये स्ट्रीप भरण्यासाठी केला जातो)

३ ) रबर सिमेंटची लहान ट्यूब

४) रिपेयर स्ट्रिप्स

तुमच्या पंक्चर रिपेअरिंग किटमध्ये वर दिलेल्या गोष्टी असणे आवश्यक आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही हँडपंपचा समावेश सुद्धा तुमच्या पंक्चर रिपेरिंग किटमध्ये करा. जेणेकरून तुम्हाला टायरमध्ये हवा सुद्धा भरता येईल.

पंक्चर काढण्यासाठी काय करावे?

सगळ्यात आधी तुमच्या गाडीचा टायर ज्या गोष्टीमुळे पंक्चर झाला आहे ती सर्वप्रथम काढून घेणे गरजेचे आहे. उदा. गाडीत घुसलेला लाकडाचा तुकडा किंवा काच इत्यादी.

त्यानंतर तुमच्या पंक्चर रिपेअरिंग किटमधून स्पायरल प्रोब हे डिवाइस घ्या. हे डिवाइस पंक्चर झालेल्या छिद्रात घुसवा. छिद्र वाढवण्यासाठी आणि स्वच्छ करण्यासाठी पंक्चर प्रोब सर्व दिशेने फिरवा.

यानंतर रिपेअर किट मधून रिपेअर स्ट्रिप्स घ्या. स्पिल्ट आय इन्सर्टेशन टूल पंक्‍चर झालेल्या छिद्रात घाला. सुईमध्ये धागा जाण्यासाठी ज्याप्रमाणे छिद्र असते तसेच छिद्र स्ट्रीप आय इन्सर्टटेशन टूल वर असते.

या छिद्रांमध्ये रिपेअर स्ट्रीप अडकवा. यानंतर पुन्हा प्रोब पंक्चर टूल घ्या. या प्रोब पंक्चर टूलवर थोड्या प्रमाणात रबर सिमेंटचे सोल्युशन लावा आणि प्रोब टूल पंक्चर झालेल्या छिद्रात टाका. हे झाल्यानंतर प्रोब पंक्चर टूल काढून घ्या.

एकदा तुम्ही प्रोब पंक्चर टूल काढून घेतले की, रिपेअर स्ट्रिप्स छिद्रावाटे टायरच्या आत घुसवा. ट्यूब आत घुसवताना आय इन्सर्टेशन टूलचा वापर केला पाहिजे.

 

tubeless-tyre-puncture-inmarathi

 

त्यानंतर इन्सर्टेशन टूल ३६० अंशात फिरवा आणि काढून घ्या. रिपेअर स्ट्रीपमुळे पंक्चर झालेले छिद्र भरून निघेल. त्यानंतर सहज इन्सर्टेशन टूल काढून घ्या. यानंतर, बाहेर आलेली अतिरिक्त रिपेअर स्ट्रीप चाकू किंवा ब्लेडच्या सहाय्याने कापून घ्या.

तुमच्याकडे  जर हॅन्ड पंप असेल तर टायरमध्ये पुन्हा हवा भरून घ्या. पंक्चर काढण्यासाठी कोणत्याही मेकॅनिकची गरज भासणार नाही. यासाठी फक्त पंधरा मिनिटे जातील आणि तुमचे मेकॅनिककडे वाया जाणारे अतिरिक्त पैसे सुद्धा वाचतील.

काय मग मंडळी, पंक्चर काढण्याचा हा पर्याय तुम्ही सुद्धा वापराल ना?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?