' जखमी असूनही या खेळाडूने वेस्ट इंडिजच्या भेदक गोलंदाजीला सामोरे जाऊन घडवला पराक्रम! – InMarathi

जखमी असूनही या खेळाडूने वेस्ट इंडिजच्या भेदक गोलंदाजीला सामोरे जाऊन घडवला पराक्रम!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

क्रिकेट भारतातला सगळ्यात लोकप्रिय खेळ. गेली कित्येक दशके हा खेळ भारतात अगदी आवडीने खेळला जातो. गल्ली बोळ्यापासून ते थेट स्टेडियमपर्यंत!

अगदी भारताच्या उत्तर टोकापासून ते दक्षिण पर्यंत, पूर्वेपासून ते पश्चिमे पर्यंत कुठेही गेले तरी या खेळाची प्रसिद्धी कमी झालेली दिसत नाही.

ज्यांच्याकडून हा खेळ वारसा मिळाला ते ब्रिटिशसुद्धा भारतीय लोकांमध्ये क्रिकेटची ही प्रसिद्धी बघून चाट पडतील. मुळात भारतात क्रिकेट हा खेळ प्रसिद्ध आहे हे असे म्हणण्याऐवजी क्रिकेट ही भारताची आस्था आहे असे म्हणणे योग्य असेल.

ज्या खेळाडूंनी या खेळात शिखरे गाठली भारतीयांनी त्याला डोक्यावर धरले. या क्रिकेटपटूंनी अरबो खरबो कमवले पण त्यांची सगळ्यात मोठी संपत्ती भारतीयांनी त्यांच्यावर केलेला प्रेमाचा वर्षाव आहे.

याबाबतीत ते सुद्धा सहमत असतील. काही खेळाडू तर या मुक्कामापर्यंत पोहोचले की भारतीयांनी त्यांना देवाचा दर्जा दिला.

खेळाडूंना देवाचा दर्जा देणे हे चूक व बरोबर हा नंतरचा मुद्दा पण क्रिकेटमध्ये त्यांनी भारताचे नाव मोठे केले ही कामगिरी विसरता येण्यासारखी नाही.

आज आम्ही अशाच एका खेळाडूची माहिती तुम्हाला सांगणार आहोत त्यांचं नाव आहे मोहिंदर अमरनाथ.

 

mohinder amarnath inmarathi

 

महेंदर अमरनाथ हे १९८३ मध्ये क्रिकेट मध्ये चौथा कमबॅक करत होते. त्यांचा ट्रेनिंग मध्ये प्रवेश व्हायचा आणि पुन्हा त्यांना टीमच्या बाहेर रहावे लागायचे. अशा पद्धतीचं चढ-उतार असणाऱ्या त्यांचं क्रिकेट करिअर होतं.

भारताची टीम वेस्टइंडीजच्या दौऱ्यावर होती. वेस्टइंडीज फास्ट बॉलर तुफान बॉलिंग करत होते. माल्कम मार्शल, मायकल होल्डिंग आणि अँडी रॉबर्ट्स यांनी इंडियन बॅटिंग टीमच्या नाकीनऊ आणले होते.

उंचीचा फायदा वेस्टइंडीज च्या बॉलर्सना होता. ते उंचावरून चेंडू फेकायचे. जे भारतीय बॅट्समनला खेळायला जमत न्हवते.

मोहिंदर अमरनाथ यांनी या मॅचमध्ये वापसी करण्याआधी आपले वडील लाल अमरनाथ यांच्याकडून क्रिकेटची कोचिंग घेतली होती. या कॉचींगचा परिणाम त्यांच्यावर दिसत होता.

या मॅच मध्ये परत आल्यानंतर क्रिजवर उभी राहण्याची त्यांची पद्धत पूर्णपणे बदललेली होती. स्टांस बदलला होता, इंग्रजीत त्याला टू आय स्टांस म्हणतात.

त्यांच्या वडिलांचं म्हणजेच लाला अमरनाथ यांचं असं म्हणणं होतं कि या स्टान्समुळे अमरनाथ यांना शॉर्ट बॉल भिरकवायला सोपे पडतील.

 

lala amarnath inmarathi

 

या दौऱ्यावर येताच दुसऱ्याच मॅचमध्ये मोहिंदर अमरनाथ यांनी मॅन ऑफ द मॅच चे टायटल जिंकले. पहिल्या इनिंगमध्ये ५८ मिळवले तर, दुसऱ्या या इनिंगमध्ये सेंचुरी बनवली.

पहिल्या दोन मॅच मध्ये उत्तम परफॉर्मन्स दिले देणारे मोहिंदर पुढील मॅचमध्ये सुद्धा उत्तम कामगिरी बजावतील अशी फॅन्सना अपेक्षा होती परंतु तिसरी मॅच पावसामुळे ड्रॉ झाली.

यानंतर चौथ्या मॅचमध्ये जे घडले त्यांनी मोहिंदर अमरनाथ क्रिकेटचे कसब तर दिसलेच पण क्रिकेटप्रती असणारी त्यांची जिद्द आणि चिकाटी याचेही दर्शन घडले.

मोहिंदर अमरनाथ यांनी पहिल्याच इनिंग्स मध्ये ९१ रन बनवले. ते भारताचे एकमेव बॅट्समन होते ज्यांनी या मॅचमध्ये ३० रन हून अधिक रन केले.

विरोधी टीमच्या अँडी रॉबर्ट्स यांनी १६ ओव्हरमध्ये चार विकेट घेतले होते तर होल्डिंग ने वेंगसरकर आणि गावस्कर यांसारख्या मातब्बर बॅट्समनना आऊट केले होते.

वेस्टइंडीज ने बॅटिंग करून २७७  रन बनवले होते. हा आकडा पार करणे भारतीय क्रिकेट टीम समोर चॅलेंज होते. वेस्टइंडीज च्या या प्रदर्शनानंतर भारतीय संघाचा जिंकण्याचा सवालच पहिला होत नाही असे तिथे उपस्थित वर्गाला वाटू लागले.

दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना भारताचा ओपनिंग स्टॅन्ड हाफ सेंचुरी होता. गावस्कर १९ रन पटकावून आउट झाले होते. आता गावस्कर आउट झाले तर टीमला सावरणार कोण? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला!

पण, यानंतर अमरनाथ ग्राउंड वर आले. अमरनाथ गायकवाड यांच्या बरोबर पार्टनरशिप मध्ये खेळत होते. अमरनाथांची शॉर्ट पीच बॉल न भिरकावता येण्याची समस्या जगजाहीर होती.

मायकल होल्डिंग्स यांनी अमरनाथ यांच्या याच वीक पॉईंटचा फायदा उठवायचे ठरवले. त्यांनी पहिलाच चेंडू फेकला जो थेट अमरनाथ यांच्या हनुवटीवर येऊन आदळला.

 

mohinder injury

 

आणि अमरनाथ जमिनीवर पडले. अमरनाथ यांना ग्राउंड वरून बाहेर नेण्यात आले. त्यांचे टी-शर्ट रक्ताने माखले होते. त्यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये नेले.

चेंडूचा मारा एवढा जोरदार होता की अमरनाथांच्या हनुवटीवर सहा टाके लावावे लागले. अर्ध्या तासानंतर अमरनाथ पुन्हा ड्रेसिंग रूममध्ये परतले. जिथे पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी रक्ताने माखलेले टी-शर्ट साफ केले.

लेग स्पिनर लक्ष्मण शिवरामकृष्णन हे त्यांच्या जवळ बसले होते. थोड्याच वेळात अँटी रॉबर्ट्स ने बलवीर बलविंदर संधू याला एलबीडब्ल्यू ने स्टेडियमच्या बाहेरचा रस्ता दाखवला.

आता भारताने पाचवी विकेट ही गमावली होता. सततच्या खराब प्रदर्शनामुळे मोहिंदर अमरनाथ यांना टीम बाहेर जावे लागले होते.

यावेळेस उत्तम प्रदर्शन देऊन आपण भारताला जिंकू असे त्यांना वाटले होते पण अचानक झालेल्या इंजुरी ने त्यांच्या या स्वप्नावर पाणी फेरले. ड्रेसिंग रूम मध्ये बसलेल्या अमरनाथ यांना आपल्या मनाशी केलेला निश्चय सारखा आठवत होता.

त्यामुळे ते अस्वस्थ होत होते. याच अस्वस्थतेत उठले आणि पुन्हा ग्राउंड वर आले. त्यांना विचारले गेले की ते खेळण्याच्या अवस्थेत आहे का? तेव्हा त्यांनी फक्त होकारार्थी मान डोलावली.

यानंतर एका मिनिटाचा वेळही गेला नसेल आणि मोहिंदर अमरनाथ पुन्हा पीचवर पोहोचले. तेवढ्यात शिवरामकृष्णन धावत त्यांच्याजवळ आले.

कारण अमरनाथ बॅटिंग करण्यासाठी इतके उत्साहित होते की घाईघाईत गार्ड लावायला विसरले होते. शिवरामकृष्णन यांना ड्रेसिंगरूममध्ये अमरनाथचे गार्ड पडलेले दिसले आणि ते घेऊन ते धावत त्यांच्याजवळ पोहोचले.

पीच वर पोहोचल्यानंतर अमरनाथ यांनी जे केले ते खरच अविस्मरणीय होते. होल्डिंगने त्यांच्या दिशेने पुन्हा शॉर्ट बॉल फेकला परंतु यावेळी अमरनाथ यांनी पूल शॉट मारला आणि सहा रन मिळवले.

 

mohinder 2 inmarathi

 

कदाचित ही गोष्ट निव्वळ अफवासुद्धा असू शकते कारण रेकॉर्डरूममध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये अमरनाथच्या एकही षटकाराचा उल्लेख नाही.

हा पण हे मात्र खरे आहे ती पुन्हा पीचवर बेटिंग करण्यासाठी आलेल्या मोहिंदर अमरनाथांनी समोरून आलेल्या प्रत्येक चेंडूला भिरकावले होते आणि भारतीय संघाला मिळवून दिले होते.

अमरनाथ उत्तम प्रदर्शन करत होते. त्यांनी जवळजवळ ८० रन मिळवले पण तरीसुद्धा फक्त एक रनच्या फरकाने वेस्टइंडीज ही मॅच जिंकली!

या मॅच नंतर अँटिगा मध्ये झालेल्या शेवटच्या टेस्ट मॅच मध्ये अमरनाथ यांनी पुन्हा एकदा उत्तम प्रदर्शन केले. त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये ५४ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये तब्बल ११६ रन बनवले.

टेस्ट मॅच या दौऱ्यात मोहिंदर अमरनाथ यांनी ५९४ रन बनवले आणि या दरम्यान ६६.४४ च्या ऍव्हरेजने दोन सेंचुरी आणि चार हाफ सेंचुरी आपल्या नावावर करून घेतली.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?