' नासाच्या 'सोफिया' ने चंद्राबाबत लावला महत्वाचा शोध. तरीही उभा राहिला नवीन प्रश्न!

नासाच्या ‘सोफिया’ ने चंद्राबाबत लावला महत्वाचा शोध. तरीही उभा राहिला नवीन प्रश्न!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मनुष्य हा पृथ्वीवरील सगळ्यात बुद्धिमान प्राणी. पृथ्वीवरच्या सजीवांना जे जमले नाही ती सर्व प्रगतीची शिखरे माणसाने त्याच्या बुद्धिमत्तेच्या सहाय्याने गाठली.

सुरुवातीला आग, चाक, शेती, भाषा यांसारखे अमूलाग्र शोध लावणारा माणूस आज अवकाशात जाऊन पोहोचला.

माणसाची एवढी प्रगतशील वाटचाल बघता भविष्यात तो चंद्रावर, मंगळावर किंवा अन्य कोणत्या ग्रहावर स्वतःची वसाहत उभारेल यात कोणाला शंका असेल?

माणसाने आजवर केलेली प्रगती लक्षात घेता भविष्यात तो नवनवीन आयाम गाठेल यात काहीच वाद नाही. परंतु भले माणसाची वाटचाल इतर सजीवांच्या तुलनेत अधिक प्रगतिशील आहे.

 

man in space inmarathi

 

त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर विज्ञानाचे शस्त्र वापरून नवनवीन शोध लावणारा तो पृथ्वीवरील सगळ्यात बुद्धिमान सजीव ठरला पण त्याच्या स्वतःच्या काही मर्यादा आहे.

या मर्यादा काय तर त्याच्या जगण्यासाठी आवश्यक असलेले घटक. जे घटक आहे तर मानवाचे जीवन आहे. हे घटक कोणते तर ऑक्सिजन आणि पाणी.

माणूस सध्या याच घटकांच्या शोधात आहे पृथ्वीवर नाही तर अवकाशात. कोणत्यातरी दुसर्‍या ग्रहावर!

अशाच घटकाचा शोध चंद्रावर असण्याचा दावा एका अंतराळ संस्थेने केला आहे. ती संस्था कोणती? तिने नेमके काय सांगितले? तिने लावलेला शोध काय? या सर्वाची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

अमेरिकेच्या नासाच्या सोफिया या विभागाने पहिल्यांदा चंद्रावर पाणी असल्याचे घोषित केले. हे पाणी चंद्राच्या सूर्याकडे तोंड असणाऱ्या पृष्ठभागावर आहे. ज्याठिकाणी अंधार आहे आणि थंड वातावरण आहे.

म्हणजेच पाणी चंद्रावरील काही मर्यादित भागात आहे.सोफिया या संस्थेने हे देखील सांगितले की चंद्रावरील क्लेवियेस नावाच्या खड्ड्यात पाण्याचे मोलेक्युल्स म्हणजेच एच टू ओ उपस्थित आहे.

चंद्राला नीट बघितले तर हा क्लेवियेस अगदी पृथ्वीवरून सुद्धा दिसतो. जो चंद्रावरील दक्षिण गोलार्धात आहे.

आजवर केलेल्या चंद्रसंबधित अभ्यासात हे कळले होते की चंद्राच्या पृष्ठभागावर हायड्रोजन चे मोलेक्युल्स आहेत पण हे मोलेक्युल्स पाण्याचे म्हणजेच एचटूओ मोलेक्युल आहे की हायड्रोजनच्या संबंधातील अन्य केमिकल मॉलिक्युल आहेत यातील फरक ओळखता आला नव्हता.

या क्लेवियेसच्या निरीक्षणानंतर तिथे १०० ते ४१२ भाग पर मिलियन पाणी अस्तित्वात आहे असा दावा सोफीया संस्थेने केला. जे १२ आऊंस पाण्याच्या बाटल्या एवढे आहे.

 

water on moon inmarathi

 

हे पाणी चंद्राच्या पृष्ठभागावरील काही क्युबिक मीटर मध्ये अस्तित्वात आहे. सोफियाने केलेला हा अभ्यास नवीन आलेल्या नेचर ॲस्ट्रॉनॉमी मध्ये प्रकाशित केला आहे.

नासाच्या हेडऑफिस मधील सायन्स मिशन डिरेक्टर रेट च्या अस्त्रोफिजिक डिव्हिजन ट्रॅक्टर पाऊल हर्टज म्हणाले आम्हाला असे संकेत मिळाले आहेत आहेत की सूर्याकडे तोंड असणाऱ्या चंद्राच्या पृष्ठभागावर एच टू म्हणजेच पाणी अस्तित्वात असण्याची शक्यता आहे त्यानंतर ते म्हणाले आता आपल्याला माहित आहे तेथे पाणी आहे.

हा शोध आत्तापर्यंत चंद्राच्या पृष्ठभागाविषयी आपल्या असणाऱ्या समजुतीवर सवाल उपस्थित करतो आणि आणि हेही सूचित करतो अजूनही आपल्याला अंतराळातील बऱ्याच संसाधनांचे संशोधन करायचे आहे.

सोफिया या संघटनेच्या संशोधनातून हेही कळले की चंद्रावरील पाण्याच्या शंभर पट पाणी सहारा वाळवंटात आहे.

याचा अर्थ असा होतो की चंद्रावर खूप कमी प्रमाणात पाणी अस्तित्वात आहे परंतु, भले चंद्रावर कमी प्रमाणात पाणी अस्तित्वात असले तरी एक नवीन प्रश्न उभा राहतो की चंद्रावर पाण्याची निर्मिती कशी झाली?

कारण चंद्राच्या पृष्ठभागावरील वातावरण हे हवाविरहित आणि कठोर असल्यामुळे पाण्याच्या निर्मितीसाठी प्रतिकूल आहे.

अंतराळातील पाणी हे बहुमूल्य संसाधन आहे आणि याचा भविष्यात मानवाला भरपूर फायदा होणार आहे. सोफिया या संस्थेला हेही कळले की चंद्रावरील पाणी सहज प्रमाणात उपलब्ध होऊ शकते.

 

sofia inmarathi

 

चंद्रावरील याच गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी नासा तिच्या आरटीमीज प्रोग्राम द्वारे सर्वप्रथम एका महिलेला आणि त्यानंतर एका पुरुषाला चंद्राच्या पृष्ठभागावर २०२४ पर्यंत पाठवणार आहे.

बराच वेळ चंद्रावर मानव उपस्थिती दर्शवणारा हा पहिलाच उपक्रम ठरणार आहे. जी उपस्थिती दशकाच्या अखेरपर्यंत असू शकते.

सोफिया संघटना जे काही निकष ठरवणार आहे त्यासाठी ती याआधी चंद्रावरील पाण्याच्या अस्तित्वासंबंधात जो अभ्यास झाला त्याचाही आढावा घेणार आहे.

जेव्हा अमेरिकेच्या अपोलो मिशन मधील एस्ट्रोनॉट १९६९ रोजी चंद्रावरून पृथ्वीवर परतले तेव्हा चंद्रावर पाणी अस्तित्वातच नाही असा दावा रिसर्चरने केला.

गेल्या वीस वर्षात चंद्रावर बरेच ऑर्बिटल आणि इम्पॅक्ट मिशन चालवले गेले जसेकी नासाचा लूनार क्रेटर ऑब्झर्वेशन अंड सेन्सिंग सॅटलाईट ज्याने याचा शोध लावला की चंद्राच्या कायम अंधार असणाऱ्या (चंद्राच्या दोन्ही ध्रुवां वरील) पृष्ठभागावरील खड्ड्यांमध्ये बर्फ आहे.

या ऐवजी काही अंतराळ उपक्रमांनी जसे की कॅसिनी मिशन, डीपी इम्पॅक्ट कॉमेट मिशन, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन च्या चंद्रयान मिशन तसेच नासाच्या ग्राउंड बेस्ट इन्फ्रारेड टेलीस्कोप फॅसिलिटी यांनी सूर्याकडे तोंड असणाऱ्या चंद्राच्या पृष्ठभागावर ओलावा आहे.

याचे पुरावे मांडले पण, कोणीही ही हे निश्चित करू शकले नाही की हायड्रोजन नक्की कोणत्या रूपात चंद्रावर उपलब्ध आहे. एचसीएल मध्ये की एचटूओ मध्ये.

सोफिया पुढील काळात याचे संशोधन करणार आहे की चंद्रावर पाणी नेमके कसे निर्माण झाले? आणि हे पाणी चंद्र व्यतिरिक्त दुसऱ्या ग्रहावर कसे नेता येईल?

या माहितीचा वापर नासा भविष्यातील चंद्रावर पाठवणाऱ्या उपक्रमांमध्ये करणार आहे जसे की नासाचे वॉलटाईल इन्वेस्टीगेटिंग पोलार एक्स्प्लोरेशन रोवर.

ज्याद्वारे भविष्यात चंद्रावर उपलब्ध असणाऱ्या या संसाधनांचे संशोधन करण्यात येणार आहे.

नेचर ॲस्ट्रॉनॉमी मध्येच शास्त्रज्ञांनी काही सिद्धांत मांडून आणि नासाने पुरवलेल्या लूनार सन्स डाटा चा वापर करून हे सांगितले आहे ये कि की चंद्रावर काही छोट्या-छोट्या अंधारमय भागात जिथे तापमान प्रचंड कमी आहे तेथे पाणी अस्तित्वात आहे.

 

sofia 2 inmarathi

 

हे तापमान चंद्राच्या पृष्ठभागावरील तापमानापेक्षा कमी असू शकते. चंद्रावर लागलेला हा पाण्याचा शोध खरंच भविष्यात मानवी आयुष्यात नवीन क्रांती घडवू शकतो.

पाणी हे बहुमूल्य संसाधन आहे यात दुमत नाही.

नासाच्या ह्युमन एक्स्प्लोरेशन अंड ऑपरेशन मिशन डिरेक्टररेट चे चीफ एक्स्प्लोरेशन सायंटिस्ट जॅकॉब ब्लीच म्हणतात जर, आपण चंद्रावर उपलब्ध असणारे पाण्याचे संसाधन कमी प्रमाणात वापरले तर आपण पाण्याचे वहन कमी आणि नवीन वैज्ञानिक संशोधन करणारे साहित्य अंतराळयानातून अधिक प्रमाणात पाठवू शकतो.

यातून त्यांना हे सुचवायचे आहे की पाण्याचा हव्यास न करता आपण नवीन संशोधनावर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे.

सोफिया ही नासाची आणि जर्मन एरोस्पेस सेंटर ची संयुक्त संस्था आहे. एम्स ही संस्था सोफिया चे अंतराळ उपक्रम चालवते.

जिचे हेडक्वार्टर कोलंबिया मध्ये, मेरी लँड आणि जर्मनीतील स्टुटगार्ट मध्ये जर्मन सोफिया इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी ऑफ स्टुटगार्ट म्हणून कार्यरत आहे.

मानवी इतिहासाला वेगळे वळण देणारे काम ही संस्था करत आहे. पुढील काळात तिच्याकडून राबवले जाणारे उपक्रम मानवी जीवन पालटून टाकणार आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?