'सततच्या कटकटीमुळे घटस्फोटाचा विचार येतोय? टोकाची भूमिका घेण्याआधी हे वाचा!

सततच्या कटकटीमुळे घटस्फोटाचा विचार येतोय? टोकाची भूमिका घेण्याआधी हे वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘लग्न’ ही एक सर्वात सुंदर गोष्ट आहे. दोन व्यक्ती एकमेकांवर विश्वास ठेवतात आणि आयुष्यभर एकमेकांना साथ देत हा प्रवास सुखकर करतात. दोन व्यक्ती एकत्र आल्या, की सगळीच मतं सारखी असतीलच असं नाही.

पटलेल्या गोष्टींना दाद देणे आणि न पटलेल्या गोष्टींना सोडून, स्वतःमध्ये बदल करणे म्हणजे सुखी संसार करणे असं म्हणता येईल.

लग्न, बायको आणि एकंदरीत विवाह संस्थेवर आपल्याकडे नेहमीच खूप विनोद तयार होत असतात आणि चवीने फॉरवर्ड देखील केले जातात, त्यामध्ये अनेकदा लग्नानंतर आयुष्य किती कटकटीचं होतं, असा एक सुर असतो.

 

couple inmarathi

 

एका हिंदी गाण्याच्या ओळींमध्ये लग्न म्हणजे ‘मोतीचुर का लड्डू’ ही उपमा देण्यात आली आहे. जो जास्त खाल्ला तरी त्रास होतो आणि दिसत असला की खाल्ल्याशिवाय रहावत नाही. अशी आजच्या तरुणांचीही मनस्थिती असते.

लग्न झाल्यानंतर मतभेदांमुळे नवरा-बायकोमध्ये अनेक भांडणं होतात. यावरचा सर्वोत्तम उपाय हा नवरा बायको मधील ‘संवाद’ हाच आहे. संवाद नसेल, तर एकमेकांकडून होणाऱ्या छोट्या चुका सुद्धा फार मोठ्या वाटायला लागतात आणि त्याची परिणती काही काळाने ‘वेगळं’ रहाण्यात किंवा घटस्फोट घेण्यात होत असते.

घटस्फोटाचा विचार तुमच्याही मनात मनात येतोय? हा टोकाचा विचार करण्याआधी नात्याला जरा असा वेळ देऊन बघा : 

१. अनपेक्षित गोष्टी करा:

 

लग्नाच्या ठराविक वर्षानंतर नात्यात “तोच तोचपणा” येणं स्वाभाविक आहे. त्यावेळी अनपेक्षितपणे आपल्या पार्टनर साठी एखादी वस्तू, आवडता पदार्थ किंवा पार्टनरच्या आवडीच्या सिनेमाची तिकिटं असं काही तरी करून या नात्यात आपण गोडवा टिकवू आणि वाढवू शकतो.

२. ‘नातं टिकवणे’ ही दोघांची जवाबदारी असते:

लग्न झाल्यानंतर ते लग्न टिकवणं ही नवरा बायको या दोघांची जबाबदारी असते. फक्त एकाने प्रयत्न करून चालत नाही. ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये दोन्ही खेळाडूंची “पार्टनरशिप” महत्त्वाची असते, त्याप्रमाणे लग्नाचंही आहे.

समोरच्याचं मन समजून घेण्यासाठी त्या व्यक्तीसोबत वेळ घालवणे, आपल्या चुका मेनी करून पुढे जाणे, एकमेकांना सांभाळून घेणे महत्त्वाचे आहे.

 

३. वेळ बदलेल यावर विश्वास ठेवा: 

 

indian couple fight inmarathi

 

आनंद असो किंवा दुःख, परिस्थिति बदलेल यावर विश्वास ठेवा. कधी मतभेद होत असतील, तर थोडा वेळ तसाच जाऊ द्या. ‘कालाय तस्मै नमः’ या ओळीप्रमाणे काही प्रश्नांची उत्तरं ही काळाच्या पोटात दडलेली असतात.

कठीण प्रश्नांना आधी सोडवा. त्यांना लांबणीवर टाकून आपण सर्वात मोठी चूक करत असतो. सध्याची स्थिति कठीण प्रश्नांची आहे हे समजून सगळे कठीण प्रश्न सोडवा आणि पुढे जा.

४. मोकळं जगा आणि जगू द्या:

 

indian couple fight inmarathi

 

लग्न झालं म्हणजे आपण एखाद्या कैदेत नसतो. नजरकैद होऊ नका आणि समोरच्या व्यक्तीला करू नका.

सोशल मीडियामुळे हा मुद्दा सध्या फार महत्वाचा आहे. कारण, आजकाल प्रत्येक व्यक्ती सोशल आहे. तुमचा पार्टनर हा कदाचित तुमच्यापेक्षा अधिक लोकप्रिय असणारा असू शकतो. त्याला जास्त मैत्रिणी किंवा तिला जास्त मित्र असूच शकतात.

काळासोबत चालण्यासाठी प्रत्येकाने काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, चांगल्या सुरू असलेल्या संसारात संशयाची पाल येऊन पुढील वाट बिकट करू शकते.

आपण कधीच कोणत्याही व्यक्तीवर ‘मालकी’ हक्क जाहीर करू शकत नाही. तसा प्रयत्न देखील करू नये.

 

५. माफ करायला शिका :

 

indian couple feature InMarathi

 

“चुका या माणसाकडूनच होत असतात” हे एकदा मान्य केलं, की स्वतःची किंवा पार्टनरची चूक तुम्ही सहज पचवू शकता. जर एखादी व्यक्ति चुकली, तर त्या व्यक्तीला मोकळ्या मनाने माफ करा.

 

६. शारीरिक संबंध :

 

loving-couple InMarathi

 

आजकाल प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या काळजीने ग्रासलेला असतो. कोणाला जॉबचं टेन्शन, तर कोणाला EMI चं. नकळत आपण सगळे इतके तणावग्रस्त झालेलो आहोत, की आपल्याकडे एकमेकांसाठी सुद्धा वेळ नाहीये.

स्वप्नांच्या मागे धावण्यात आपण भविष्य आर्थिक दृष्टीने स्थिर करत आहोत, पण त्यासाठी आपलं वर्तमान आपण बेरंग करत आहोत हे तुमच्या लक्षात येतंय का?

तुमच्या पार्टनरसाठी, तुमच्यासाठी वेळ काढा. तुमच्या पार्टनरच्या काही शारीरिक गरजा असतात, हे समजून घ्या. तुमच्या उत्तम मानसिक स्थितीसाठी शारीरिक गरजा पूर्ण होणं महत्त्वाचं आहे.

७. समुपदेशन:

आपल्या परीने दोघांनीही जर सगळे प्रयत्न केले आणि तरीही वाद होत असतील तर दोघांनी मिळून मॅरेज समुपदेशक (counselor) ला भेटावं. त्यामध्ये कोणताही कमीपणा वाटून घेऊ नये.

त्यांच्यासमोर दोन्ही बाजू मांडल्यास योग्य निर्णय नक्की मिळू शकतो.

‘लग्न टिकवणे’ ही शेवटी त्या दोन व्यक्तींची जबाबदारी असते. शेवटी दोन व्यक्ती एकत्र आल्या की भांडणं ही होणारच, यातून तुम्ही नातं जपण्यासाठी कोणते प्रयत्न करता हे महत्त्वाचं!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?