' लव्ह जिहाद : पुरोगामी विचारवंतांनी नाकारलेलं भेसूर जागतिक वास्तव – InMarathi

लव्ह जिहाद : पुरोगामी विचारवंतांनी नाकारलेलं भेसूर जागतिक वास्तव

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

आज पुन्हा एक प्रश्न सगळ्यांच्या मनात येतोय तो म्हणजे, खरंच आपल्या देशात मुली सुरक्षित आहेत का? हाथरसच्या घटनेनंतर आणखी एका भयानक घटनेने लोकांच्या मनात भीती निर्माण केली आहे.

२६ ऑक्टोबर सोमवारी हरियाणा येथील बल्लभगढ भागात बीकॉमच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या निकिता तोमार नावाच्या मुलीची दिवसाढवळ्या गोळी घालून हत्या केली गेली.

 

nikita tomar inmarathi

 

निकिताच्या ह्या हत्येनंतर वातावरण प्रचंड गरम झाले असून तिच्या पालकांनी ह्या संदर्भात लवकर आणि कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

ह्या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान निकिताचे २०१८ साली सुद्धा अपहरण झाल्याचे समोर आले आहे, ज्या प्रकरणात तिच्या घरच्यांनी काहीच वक्तव्य केलं नाही. आता पोलिस ह्या सगळ्या प्रकरणाचा छडा लावतीलच!

 

हे ही वाचा –

===

 

तिच्या घरच्यांना या संदर्भात विचारले असता त्यांनी यामागे एकच कारण असल्याचे स्पष्ट केले आहे ते म्हणजे “लव्ह जिहाद”!

ज्या मुलाने तिची हत्या केली तो मुलगा तौसिफ निकिताला ओळखत होता. निकिताने त्याच्या अटी आणि लग्नाचा प्रस्ताव अमान्य केल्यामुळे तसेच मुस्लिम धर्मात परिवर्तन करण्यास नकार दिल्याने तौफिक ने असे केल्याचे लोकांसमोर येत आहे!

विकास दुबे प्रकरणात ज्या गतीने यंत्रणेने काम केले त्याच स्पीड ने आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे असे निकिताचे कुटुंबीय मागणी धरून आहेत!

एकंदरच ह्या सगळ्यामागे असलेले “लव्ह जिहाद” हे प्रकरण काही आपल्याला नवीन नाही.

लव्ह जिहाद ही टर्म पहिले केरळ आणि तामिळनाडू मध्ये वापरली गेली. मुस्लिम समुदायातल्या मुलाकडून इतर समुदयातल्या मुलीशी लग्न करवून तिचे धर्मपरिवर्तन करून तिला इस्लाम मान्य करायला लावणे.

या संकल्पनेअंतर्गत फक्त भारतातच नव्हे तर जगभरात बरेच गुन्हे रेकॉर्ड झाले. कित्येक पीडितांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली, आणि लव्ह जिहाद ही टर्म वाऱ्यासारखी सगळ्या देशभर पसरली.

मोठमोठ्या न्यूज आर्टिकल्स आणि चॅनल्स मधून त्यावर भाष्य होऊ लागलं आणि लव्ह जिहादचं हे भयानक रूप लोकांच्या समोर आलं!

नुकतंच व्हायरल झालेला तनिष्क जाहिरातीचा वाद सुद्धा लव्ह जिहाद वरूनच. हिंदू मुस्लिम या दोन धर्मातल्या लोकांमधला सलोखा दाखवताना नेहमी एकाच धर्माला का टार्गेट केलं जातं, असा सोशल मीडिया वर लोकांचा रोष असल्याने, तनिष्कला ती जाहिरात मागे घ्यावी लागली!

 

love jihaad inmarathi

 

आणि मग हळू हळू जाहिरात क्षेत्रातून तसेच मनोरंजन क्षेत्रातून लोकांच्या मनावर लव्ह जिहाद ह्या संकल्पनेविषयी बऱ्याच गोष्टी अगदी पद्धतशीरपणे कोरल्या जात आहेत.

मग ती रेड लेबलची जाहिरात असो व तनिष्कची. कसे पद्धतशीरपणे एखादी गोष्ट ही लोकं प्रेक्षकांच्या मनावर बिंबवतात याचा अनुभव आपण तनिष्क सारख्या कित्येक जाहिरातीतून घेतला असेल!

 

हे ही वाचा –

===

 

बरं हे काही पहिलं प्रकरण नाही काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश येथील हजरतगंज पोलिस स्टेशन येथे एका पीडित मुलीने स्वतःला जाळून घ्यायचा प्रयत्न केला. कारण काय तर मुस्लिम सासरकडच्या लोकांनी केलेला छळ!

शिवाय काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेश इथल्या महिला कॉन्स्टेबलला कामावरून बडतर्फ करण्यात आले जेंव्हा तिचा एक व्हीडियो व्हायरल झाला, ज्या व्हीडियोमध्ये ती महिला कॉन्स्टेबल एका हिंदू महिलेला मुस्लिम माणसाशी मैत्री केल्या कारणाने मारहाण करत आहे.

 

lady constable inmarathi

मध्य प्रदेश मधल्या कॉँग्रेसचे एक नेता सिकंदर खान ह्यांच्यावर सुद्धा असेच काही भयानक आरोप लागले होते.

कमी वयाच्या मुलीशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करून तिला आपल्या फार्महाऊस वर बोलवून तिच्यावर बलात्कार करून, तिचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करायचे आरोप कॉँग्रेस लीडर वर लागले होते.

अखेर त्या मुलीने यासंदर्भात पोलिसात तक्रार केली आणि त्या लीडरवर कारवाई केली गेली!

१२ सप्टेंबेर रोजी पूजा पटेल ह्या मुलीने आपल्या सासरी स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली. कारण एकच नवऱ्याने इस्लाम धर्म स्वीकारायला केलेली बळजबरी!

 

love jihad 2 inmarathi

 

काही दिवसांपूर्वी मीरठ इथल्या मुस्लिम युवकाने एका दलित तरुणीला पळवले, नंतर तिला सुखरूप वाचवण्यात आले. पण नंतर असे समोर आले की तो तरुण त्या मुलीला हिंदू आहे असे सांगून तिच्याशी लग्न करून तिचे धर्मपरिवर्तन करायच्या तयारीत होता!

ह्या वर नमूद केलेल्या केसेस त्या आहेत ज्यांची तक्रार पोलिसात केली गेली. आजही देशाच्या कित्येक गावात खेड्यात हे प्रकार अगदी राजसरोसपणे होत आहेत.

तिथल्या लोकांना तर ह्या प्रकाराला लव्ह जिहाद असं काही म्हणतात हे देखील माहिती नसेल.

एका जाहिरातीच्या संकल्पनेवरून सोशल मीडियावर प्रत्येकानेच अगदी तावातावाने आपले मत मांडले. काही लोकांनी त्या संकल्पनेवर टीका केली तर काहीनी त्याचे समर्थन केले!

पण जेंव्हा खरंच आपल्या समोर अशा घटना घडतात तेंव्हा किती लोकं त्याविरोधात स्पष्ट आणि उघडपणे बोलतात आणि झालेल्या गोष्टीचा निषेध करायचा प्रयत्न करतात?

 

muslim girl inmarathi

 

अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकी लोकंच याविरुद्ध आवाज उठवतात, आणि बाकीचे फक्त सोशल मीडियापुरती श्रद्धांजली वाहून पुन्हा एका निर्दोष व्यक्तीचा बळी जायची वाट बघतात!

हे चित्र बदलणे अपेक्षित आहे तरच समाजात पसरलेल्या लव्ह जिहाद ह्या संकल्पनेला आळा घालता येईल!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?