' आरोग्यदायी कडू कारले गोड करुन चविष्ट बनविण्यासाठी या घ्या दहा टीप्स! – InMarathi

आरोग्यदायी कडू कारले गोड करुन चविष्ट बनविण्यासाठी या घ्या दहा टीप्स!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कारलं म्हंटलं की घरातील नाक मुरडणारी मुलं आपल्याला दिसतात. Bitter Gourd म्हणजेच ‘कडू कारलं’ हे नावच इतकं फेमस आहे की त्याची चव बदलू सुद्धा शकते हे आपण जवळपास विसरूनच गेलो आहोत.

‘मोमोरडीसीन’ या केमिकल मुळे कारल्या मध्ये कडवट पणा येत असतो. आपल्या मराठीत तर यावर एक म्हण पण आहे, “कडू कारले, तुपात तळले, साखरेत घोळले तरीही कडू ते कडूच..”

प्रसंगानुरूप काही व्यक्तींसाठी सुद्धा वापरली जाते ज्यांच्या काही सवयी बदलू शकतील यावर लोकांना संभ्रम असतो.

व्यक्तींचं तर माहीत नाही, पण काही प्रक्रिया केल्या तर कारल्याची चव बदलू शकते हे नक्की.

 

bitter groud inmarathi

 

आरोग्यासाठी कारल्याचे असलेले फायदे हे आहेत की, घसा दुखत असेल तर कारल्या चा ज्यूस कमी वेळात पिला पाहिजे. डायबेटिस चा आजार असलेल्या प्रत्येक व्यक्तीने कारल्याचा उपयोग त्यांच्या आहारात करावा असे डॉक्टर सांगतात.

आज आम्ही तुम्हाला दहा टिप्स सांगत आहोत ज्या आपण आमलात आणल्या तर आपण कारल्या वर लागलेलं ‘कडू’ हे लेबल काढून टाकू शकता.

कारल्याच्या भाजीला सुद्धा तुमच्या घरातील मुख्य भाजीमध्ये स्थान देऊन घरातील सर्वांना ती भाजी खाण्यासाठी प्रोत्साहित करू शकता.

 

१. साल आणि जाड भाग काढणे :

इतर भाज्यांचे जसे साल काढले जाते, तसेच कारल्याचे सुद्धा साल काढले पाहिजे आणि थोडा जास्त जाड भाग कट केला पाहिजे. हा कट केलेला भाग तुम्ही पराठ्यामध्ये टाकू शकतात आणि युनिक चव मिळवू शकता.

या पद्धतीने कारल्याचा कडवटपणा नक्की कमी झालेला असेल.

२. बिया काढून टाकणे :

कारल्यावरील रफ भाग काढून टाकल्यानंतर त्याच्या ‘चकत्या’ म्हणजे गोल काप करावेत.

या चक्त्यांमधून बिया काढून टाकाव्यात आणि मगच त्यांना स्वयपाकात वापरावं. या चिरण्याच्या आणि बिया काढण्याच्या पद्धतीने कारलं कमी कडू लागेल.

 

karla 2 inmarathi

३. मीठाच्या पाण्यात धुणे :

कारलं हे मिठाच्या पाण्याने धुऊन घ्यावे आणि त्याला २० ते ३० मिनिटं मिठाच्या पाण्यात ठेवावे. मिठाने कारल्याचा कडवटपणा हा शोषून घेतला जात असतो.

पण, तरीही काही प्रमाणात मीठ हे कारल्यावर सुद्धा जमा झालेले असते. तेव्हा, स्वयपाक करताना कारल्याच्या भाजीत कमीत कमी मीठ टाकावे.

४. दह्यात बुडवणे :

काही वेळासाठी आपण कारलं हे दह्यात भिजवून ठेवू शकतात. त्यामुळे कारलं हे कमी कडू लागेल आणि ते तुम्ही सहज खाऊ शकतात.

 

curd inmarathi

५. चिंचेच्या पाण्यात भिजवणे :

कारलं चिरून झाल्यानंतर ३० मिनिटापर्यंत चिंचेच्या पाण्यात भिजवून ठेवावं. कडू कारल्यातील कडू तत्व कमी होईल.

६. गुळ आणि साखरेचं प्रमाण वाढवणे :

कारल्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी त्याच्या भाजी किंवा ज्युस सारख्या कोणत्याही पदार्थात इतर पदार्थांपेक्षा जास्त गुळ आणि साखर टाकावी.

७. बॅलन्स करणाऱ्या भाजी सोबत शिजवा :

कारल्यात असलेला कडवटपणा कमी करायचा असेल तर त्याला कधीही बटाटा किंवा कांद्यासोबत शिजवा. या तिन्हीपैकी कोणत्याही दोन भाज्या एकत्र आल्या तर तयार होणाऱ्या डिश मध्ये कडवटपणा नक्कीच कमी असेल.

८. मीठाच्या पाण्यात उकळवणे :

कारलं हे मिठाच्या उकळत्या पाण्यात निदान २-३ मिनिटं भिजवलं पाहिजे. असं केल्याने कडवटपणा निघून जाण्यास मदत होते.

मिठाच्या पाण्यानंतर कारलं हे काही मिनिटांसाठी थंड पाण्यात ठेवावे आणि मग स्वयपाकात वापरावे.

९. डीप फ्राय करणे :

 

deep fry inmarathi

 

ज्युस काढल्यानंतर शिल्लक राहिलेल्या कारल्याला थोड्या जास्त वेळासाठी तव्यावर परतून घ्या. हे केल्याने कडवटपणा तर जाईलच त्यासोबतच एक चविष्ट भाजी सुद्धा खायला मिळेल.

१०. साखर आणि व्हिनेगर च्या पाण्यात बुडवणे :

साखर आणि व्हिनेगर हे सारख्या प्रमाणात घ्यावेत आणि त्यांना एकत्र गरम करून एक mixture तयार करून घ्यावे. हे mixture कारल्यावर टाकावे, त्याचा कडवटपणा नक्की कमी होईल.

Bitter Gourd ही पौष्टिक भाजी आहे. वर दिलेल्या टिप्स या बऱ्याच जुन्या आहेत आणि जगभरात त्या वापरल्या जातात.

या टिप्स वापरून आपण कडू कारलं हे इतर भाज्यांप्रमाणे नियमितपणे खाऊ शकतो आणि त्याच्या गुणधर्मांनी शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवू शकतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?