' एटीएम मशीन टेक्निकली कसं काम करतं? – InMarathi

एटीएम मशीन टेक्निकली कसं काम करतं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एटीएम मशीन म्हणजे आपल्या सर्वांच्याच जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे.

बँकेत जाऊन पैसे काढायचे कष्ट या एटीएम मशीनमुळे बऱ्यापैकी कमी झाल्याने तंत्रज्ञानाचे पुन्हा एकदा आभार मानायलाचं हवेत.

एटीएम मशीन समोर उभे राहून पैसे बाहेर येण्याची वाट बघत असताना तुमच्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी हा प्रश्न नक्कीच आला असेल कि हे एटीएम मशीन नेमक काम करतं तरी कसं? चला तर मग आज या अति महत्त्वाच्या प्रश्नाविषयी अगदी इत्यंभूत माहिती जाणून घेऊया!

 

atm-works-marathipizza01
glocalkhabar.com

 

एटीएम मशीन हे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एक डेटा टर्मिनल आहे ज्यामध्ये दोन इनपुट आणि चार आउटपुट डिव्हाईसचा समावेश असतो.

इतर कोणत्याही डेटा टर्मिनल प्रमाणे एटीएम मशीन कनेक्ट करण्यासाठी आणि त्याच्याशी कम्युनिकेशन करण्यासाठी होस्ट प्रोसेसरचा आधार घ्यावा लागतो.

होस्ट प्रोसेसर हे एखाद्या इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर सारखे असते. हा एक प्रकारचा गेटवे आहे ज्या माध्यमातून सर्व प्रकारचे विविध एटीएम नेटवर्क जो पैसे काढतो त्यासाठी अर्थात कार्डहोल्डरसाठी उपलब्ध होतात.

atm-works-marathipizza
www.youtube.com

स्रोत

हा होस्ट प्रोसेसर बँकेच्या स्वत:च्या मालकीचा असू शकतो किंवा एखाद्या स्वतंत्र खाजगी कंपनीचा (FSS, CMS आणि Hitachi Payment) असू शकतो.

बँकेच्या मालकीचे होस्ट प्रोसेसर सहसा केवळ बँकेच्या मालकीच्या एटीएम मशीनलाचं सपोर्ट करतात. तर खाजगी कंपनीच्या मालकीचे प्रोसेसर ज्या संस्थेच्या मालकीची एटीएम मशीन आहे त्यांच्याच एटीएम मशीनला सपोर्ट करतात.

एटीएम वापरणाऱ्या प्रत्येकाला ही गोष्ट तर माहितीचं असते की एटीएम मशीनला दोन इनपुट डिव्हाईस असतात. कार्ड रीडर आणि किपॅड!

कार्ड रीडर: कार्ड रीडर हे एटीएम/डेबिट कार्डच्या मागे असलेल्या मॅग्नेटिक स्ट्रीपच्या माध्यमातून बँक खात्याबद्दलची संपूर्ण माहिती ओळखते. त्यानंतर होस्ट प्रोसेसर या माहितीचा वापर करून कार्डहोल्डरच्या बँक खात्यामधून ट्रान्सॅक्शन पूर्ण करते.

किपॅड: किपॅडच्या माध्यमातून कार्डहोल्डर बँकेला सांगतो की त्याला कोणत्या प्रकारचे ट्रान्सॅक्शन करायचे आहे. जसे कि कॅश विथड्रोवल, बॅलेन्स इन्क्वायरी इत्यादी.

सोबतच कार्डहोल्डर किपॅडच्या माध्यमातून त्याला दिला गेलेला पिन नंबर वेरीफिकेशनसाठी एन्टर करतो. हा पिन होस्ट प्रोसेसरला इनक्रीप्टेड अर्थात सांकेतिक स्वरुपात पाठवला जातो. जेणेकरून कार्डहोल्डरच्या खात्याची सुरक्षा अबाधित राहावी.

आता आपण दोन इनपुट डिव्हाईसची माहिती घेतली आता आउटपुट डिव्हाईसबद्दल जाणून घेऊ.

स्पीकर: कोणतीही कि दाबल्यावर कार्डहोल्डरला एटीएम मशीनकडून स्पिकरच्या माध्यमातून अभिप्राय मिळतो.

डिस्प्ले स्क्रीन: डिस्प्ले स्क्रीन कार्डहोल्डरला सुरु असलेल्या ट्रान्सॅक्शन प्रक्रियेबद्दल माहिती दते.

रीसिप्ट प्रिंटर: ट्रान्सॅक्शन पूर्ण झाल्यावर कार्डहोल्डरच्या इच्छेनुसार रिसिप्ट प्रिंटरच्या माध्यमातून कार्डहोल्डरला ट्रान्सॅक्शनही रीसिप्ट मिळते.

atm-works-marathipizza04
http://www.pcmag.com

 

कॅश डिस्पेन्सर: एटीएम मशीनचा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात सुरक्षित भाग म्हणजे कॅश डिस्पेन्सर, ज्यातून कॅश होल्डरला त्याने मागितलेली रक्कम दिली जाते.

कॅश डिस्पेन्सरच्या खालच्या भागात अर्थात वॉल्टमध्ये एटीएम मशीनमधील सर्व कॅश ठेवलेली असते. चोरीचा धोका टाळण्यासाठी हे वॉल्ट जमिनीला जोडून असावेत असा सल्ला एटीएम मशीन निर्माते देतात.

परंतु या सुरक्षेला बगल देत अशीही एक चोरीची घटना घडलेली आहे,

ज्यामध्ये चोरांनी थेट एटीएम मशीनच्या खाली बोगदा खोदून त्यातून वॉल्ट फोडत रक्कम लंपास केली.

कॅश डिस्पेन्सिंगचे तंत्र हे अतिशय लाजवाब आहे. कॅश डिस्पेन्सर मधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक नोटेवर कॅश डिस्पेन्सर सेन्सरच्या माध्यमातून बारकाईने लक्ष ठेवते. हा सेन्सर नोटेचा पातळपणा देखील ओळखतो.

समजा कधी दोन नोटा एकमेकांना चिकटलेल्या अवस्थेत असतील तर तो सेन्सर कॅश डिस्पेन्सरला त्याबद्दल माहिती पुरवतो. त्यानंतर कॅश डिस्पेन्सर त्या दोन चिकटलेल्या नोटा कार्डहोल्डरला न देता थेट ट्रान्सॅक्शन रद्द करते.

असा प्रकार फाटलेल्या, जुन्या झालेल्या नोटांबद्द्दल देखील होऊ शकतो.

कार्डहोल्डरने मागितलेल्या नोटांची संख्या आणि त्या ठराविक ट्रान्सॅक्शनबद्दलची सर्व माहितीची नोंद कॅश डिस्पेन्सर एका जर्नलमध्ये करते. या जर्नलमधील सर्व माहिती ठराविक काळाने प्रिंट करून घेतली जाते आणि हार्ड कॉपी एटीएम मशीनच्या मालकाकडून दर दोन वर्षांनी मेंटेन केली जाते.

याचा फायदा कार्डहोल्डरला असा होतो की जेव्हा कधी कार्डहोल्डरला एखाद्या ट्रान्सॅक्शनबद्दलची तक्रार असते तेव्हा कार्डहोल्डर जर्नल मधील माहितीची प्रिंटआउट दाखवण्याची मागणी करू शकतो आणि माहिती मिळाल्यावर होस्ट प्रोसेसरशी संपर्क साधू शकतो.

परंतु एटीएममध्ये जर्नलमधील प्रिंटआउट पुरवण्यास कोणीही उपलब्ध नसेल तर मात्र कार्डहोल्डर त्याच्या बँकेकडे या संदर्भात तक्रार करू शकतो.

 

atm-works-marathipizza03
commons.wikimedia.org

 

आता पाहूया एटीएम मशीन मधून पैसे बाहेर येण्याची प्रक्रिया कशी सुरु होते

जेव्हा कार्डहोल्डर एटीएम मशीन मध्ये आपले कार्ड टाकून इतर महत्त्वाची माहिती किपॅडद्वारा एटीएम मशीनला देतो, त्यानंतर एटीएम मशीन ती सर्व माहिती होस्ट प्रोसेसरला देते. हा होस्ट प्रोसेसर बँक सर्व्हरच्या माध्यमातून कार्डहोल्डरच्या खात्यामधील जमा रक्कम तपासतो.

जर कार्डहोल्डरने मागितलेली रक्कम खात्यामध्ये उपलब्ध असेल तर होस्ट प्रोसेसर ट्रान्सॅक्शन रिक्वेस्ट कार्डहोल्डरच्या बँकेकडे पाठवतो. जेव्हा कार्डहोल्डर एखाद्या रकमेची मागणी एटीएम मशीनकडे करतो तेव्हा होस्ट प्रोसेसर इलेक्ट्रिक फंड ट्रान्स्फरच्या माध्यमातून कार्डहोल्डरच्या बँकेकडे ती ठराविक रक्कम पाठवण्याची मागणी करतो.

त्यानंतर इलेक्ट्रिक फंड ट्रान्स्फरच्या माध्यमातून बँक खात्यातून ती रक्कम होस्ट प्रोसेसरच्या खात्यामध्ये पाठवली जाते. रक्कम मिळाल्यावर होस्ट प्रोसेसर एटीएम मशीनकडे अप्रूव्हल कोड पाठवतो आणि रक्कम मशीन मधून डिस्पेन्स करण्याची परवानगी देतो.

 

hindustan times

 

या सर्व गोष्टी काही सेकंदात होतात हे विशेष !  यानंतर होस्ट प्रोसेसर दुसऱ्या दिवशी ज्या संस्थेच्या मालकीची एटीएम मशीन आहे त्या संस्थेच्या बँक खात्यामध्ये ती रक्कम ट्रान्स्फर करतो.

अश्याप्रकारे ज्या संस्थेची एटीएम मशीन आहे आणि त्यांनी त्यामध्ये जे पैसे भरले होते ते त्यांना पुन्हा परत मिळतात. (ही प्रक्रिया स्वतंत्र खाजगी कंपनीचा एटीएम असेल तर होते.)

जर एटीएम बँकेच्या मालकीचे असेल तर मात्र होस्ट प्रोसेसर बँकेकडे रक्कम न मागता केवळ खात्यामधला बॅलेन्स तपासून रक्कम रक्कम मशीन मधून डिस्पेन्स करण्याची परवानगी देतो.

 

atm-works-marathipizza02
http://www.ratlamonline.in

 

एटीएम मशीनच्या वापराबद्दल लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी:

एटीएम मशीन कार्डहोल्डरचा पिन नंबर हा सांकेतिक स्वरुपात होस्ट प्रोसेसरला पाठवत असते त्यामुळे एटीएम मशीनमध्ये पिन नंबर रेकॉर्ड वगैरे केला जातो या निव्वळ अफवा आहेत.

परंतु तुमचा पिन नंबर कोणालाही कळू देऊ नका आणि तुमचे एटीएम कार्ड बिलकुल हरवू नका अन्यथा तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. अश्यावेळेस तातडीने बँकेशी संपर्क साधून कार्ड ब्लॉक करणे उत्तम !

तुमचे कार्ड कधीही एटीएम मशीन समोर उभे राहून पाकीट मधून कडू नका, कारण एटीएम मशीनला एखादा सिक्रेट कॅमेरा किंवा तत्सम डिव्हाईस जोडले असल्यास तुमच्या कार्डवरील माहिती त्यात रेकॉर्ड होऊ शकते. म्हणून एटीएम मशीनच्या समोर जाण्यापूर्वीच तुमचे कार्ड बाहेर काढून ठेवा.

एटीएम मशीनचा वापर करताना एटीएम मशीनच्या अगदी समोर उभे राहा, जेणेकरून तुमच्या मागे असलेल्या व्यक्तीला किंवा कोणी तुमच्यावर पाळत ठेवून असल्यास त्या व्यक्तीला स्क्रीनवर येणारी माहिती आणि तुम्ही टाकत असणारा पिन नंबर कळणार नाही.

एकंदर ही दक्षता घेतल्यास तुमच्या व्यवहाराची माहिती त्त्या व्यक्तीला कळण्याची शक्यता भरपूर कमी होते.

 

atm-works-marathipizza05
http://ipaspandhra.blogspot.in

 

एटीएम मशीन मधून मिळालेली रिसिप्ट एटीएम मशीनच्या बाजूला टाकून देऊ नका. ती सोबत बाळगा, किंवा फेकून द्यायचीच असेल तर संपूर्ण फाडून ती कचऱ्याच्या डब्ब्यात टाका.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?