'या IRS अधिकाऱ्याने पटकावलाय देशाचा सर्वोच्च सन्मान, वाचून तुम्ही देखील भारावून जाल!

या IRS अधिकाऱ्याने पटकावलाय देशाचा सर्वोच्च सन्मान, वाचून तुम्ही देखील भारावून जाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सेने मध्ये कार्यरत असलेल्या एखाद्या जवानाला शौर्य पदकाने सन्मानित केले गेले असेल तर त्यात काही नवल वाटत नाही. सनदी अधिकाऱ्यांमध्ये भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांना असे पदक मिळाले तरी नवल वाटणार नाही.

पण, आयआरएस सेवा देणाऱ्या अधिकाऱ्याला जर शौर्य पुरस्काराने सन्मानित केले गेले असेल तर? आश्चर्य वाटणारच ना?

तर आज आपण भेटणार आहोत अशाच एका अधिकाऱ्याला जो इन्कम टॅक्स विभागात काम करून लष्करात सेवा बजावताना असं काही कार्य करतो की थेट देशाच्या राष्ट्रपतीकडून शौर्य पुरस्काराने सन्मानित केले गेला.

हे आहेत मेजर प्रदीप आर्य. मुंबईच्या इन्कम टॅक्स मध्ये अतिरिक्त आयुक्त (इन्वेस्टीगेशन विभाग) म्हणून सेवा देत आहेत. आता नावापुढे मेजर लागलं आहे तर त्याबद्दल पण बघा.

 

pradeep arya inmarathi

 

आर्य हे टेरिटोरियल आर्मी (प्रादेशिक सेना) मध्ये अधिकारी आहेत. प्रादेशिक सेनेच्या १०६ इन्फॅन्ट्री बटालियन मध्ये आहेत. ही बटालियन पॅराशूट रेजिमेंटच्या (स्पेशल फोर्सेस) चौथ्या बटालियनशी संलग्न आहे.

(टेरिटोरियल आर्मी मध्ये मेजर त्यातल्या त्यात पॅराशूट रेजिमेंट यावरून मेजर आर्य यांचं एकूण डेसिगनेशन कळून येईल!)

मेजर आर्य जेव्हा कॅप्टन रँक वर होते तेव्हा काश्मीरच्या बारामुल्ला भागात इंटेलिजन्स नेटवर्क प्रस्थापित करणाऱ्या टीमला लीड करत होते.

८ मे २०१७ ला आर्य यांना इंटेलिजन्स मिळाली की १९ इन्फॅन्ट्री एरियाच्या चाबूक भागात लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी घुसखोरी केली!

मिळालेल्या माहितीच्या आधारे आर्य आपली टीम घेऊन दहशतवाद्यांच्या मागावर निघाले. गुपचूप चाललेल्या या ऑपरेशन मध्ये आर्य यांना ४ ते ६ लोकांची त्या भागात वर्दळ दिसली.

सगळे दहशतवादी ट्रेस झाल्यावर आर्य यांनी तडक एका पडलेल्या झाडाचा आसरा घेत दहशतवाद्यांवर गोळीबार सुरू केला. आपलं अद्भुत शौर्य आणि कल्पक नेतृत्व दाखवत आर्य आणि त्यांच्या टीमने त्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला.

 

regiment inmarathi

 

आपल्या टीमच्या पुढे असल्याने मागे वळण्याचा धोका लक्षात घेत आर्य यांनी स्वतः गोळीबार सुरू करून आपल्या टीमचा थेट दहशतवाद्यांशी संपर्क न येऊ देता त्यांचा खात्मा केला.

त्यांच्या याच कामगिरीमुळे त्यांना २०१८ च्या स्वातंत्र्यदिनी शौर्यचक्र या शौर्य पुरस्काराने सन्मानित केले गेले! टेरिटोरियल आर्मी मध्ये लिमिटेड पिरेड सेवा द्यावी लागते.

तिथला काळ पुर्ण झाला की आर्य परत आपल्या ब्युरोक्रसी रोल मध्ये परतले. पॅराशूट रेजिमेंटचं का? विचारले असता आर्य म्हणतात,

ते एक लायसन्स होल्ड केलेले पायलट आहेत. त्यात स्पेशल फोर्सेस म्हणजे त्याला एक वेगळंच वळण आहे. म्हणून एक सनदी अधिकारी म्हणून तुमच्या समोर काय चॅलेंज आहे याबत विचारले असता आर्य सांगतात.

प्रत्येक वेळी ते स्वतःला समजवतात की लोकांमध्ये गेल्यावर ते इन्कम टॅक्स अधिकारी नाही आहेत. जर तुम्ही त्या स्टेटस आणि इगोने लोकांच्या समोर गेलात तर लोक तुम्हाला आदर देत नाहीत.

ते त्यांचा आदर करत असतात जे त्यांचं नेतृत्व करत आहे. ते त्यांचा आदर करतात जे त्यांच्यासाठी सर्वस्व द्यायला तयार आहेत आणि त्यांच्यासाठीच लोक त्यांचं सर्वस्व द्यायला तयार असतात.

याचं उदाहरण नुकतंच बंगळूर मध्ये पाहायला मिळाले.

ते बंगळूरला त्यांच्या कुटुंबाला भेटायला गेले असता लॉक डाऊन जाहीर झाले. तसे बंगळूरच्या बस स्टॉप आणि रेल्वे स्टेशन भागात अडकलेल्या प्रवाशांना पाणी आणि खाण्याची व्यवस्था केली. आणि बघता बघता त्यांना अनेक मदतीचे हात तिथे निर्माण झाले.

मेजर आर्य हे २००४ च्या यूपीएससी बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. विशेष म्हणजे वयाच्या २२व्या वर्षी त्यांनी यूपीएससी क्रॅक केली आहे.

 

pradeep irs officer inmarathi

 

सध्या ते मुंबई येथील इन्कम टॅक्स विभागात आंतरराष्ट्रीय टॅक्स भागात अतिरिक्त आयुक्त (तपास) म्हणून कार्यरत आहेत. प्रादेशिक सेनेत सामान्य भारतीयाला पण सेवा देता येते.

आपल्या वरिष्ठांकडून अनुमती घेऊन आणि सेनेची आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून आर्य सेनेत दाखल झाले. २०१३ साली आर्य हे राष्ट्रीय पुरस्काराने सुद्धा सन्मानित केले गेले आहे.

निवडणूकीच्या काळात नागालँड आणि कर्नाटक मध्ये मोठे आकडे असलेल्या रकमा त्यांनी व्यवस्थित रित्या हाताळले होते.

आर्य यांची बटालियन ही नॉर्दन कमांड, उधमपूरचा भाग आहे. त्यांनी जमवलेल्या इंटेलिजन्सच्या आधारे अनेक स्पेशल ऑपरेशन हे लॉन्च केले गेले. ज्यामध्ये अनेक दहशतवाद्यांना शरण आणण्यात सेनेला खूप मोठे यश आले होते.

जम्मू काश्मीर मध्ये पोस्टिंग असताना त्यांनी आपला सेवेतील अनुभव वापरून दहशतवाद आणि दहशतवादी कारवायांसाठी लागणारा काळा पैसा पकडवून दिला होता.

कर्तव्याप्रति त्यांची असलेली निष्ठा आणि त्यांचं कृत्य यामुळे मेजर आर्य यांचं लष्कर प्रमुखांनी सुद्धा प्रशंसा केली होती.

 

pradeep arya featured inmarathi

 

सनदी अधिकारी असताना सुद्धा जेव्हा अतिरिक्त सेवा म्हणून ते बॉर्डर वर असतात यावर त्यांच्या कुटुंबाच्या प्रतिक्रियेबद्दल आर्य यांना विचारले असता ते म्हणतात,

त्यांच्या कुटुंबाला आता जीवनाचे महत्व आणि मृत्यूची व्याख्या काय आहे याबद्दल समजलं आहे. त्यांच्या निर्णयात त्यांच्या कुटुंबाने त्यांना सदैव पाठिंबा दिला. त्यामुळे बॉर्डर वर असताना देशाची सेवा करताना कुठलाच वेगळा असा ताण त्यांना जाणवला नाही.

त्यामुळे देशसेवा आणि कुटुंब यामध्ये ताळमेळ ठेवण्यात त्यांना कसलीही अडचण येत नाही.

काहींचे सनदी अधिकारी हे रोल मॉडेल असतात तर काहींचे लष्करातील अधिकारी. मेजर आर्य यांच्याकडे हे दोन्ही गौरव उपलब्ध आहेत. एकूणच त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे हे नक्की!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?