' “इनबिल्ट बॅटरी” चा फोन पाण्यात पडला तर काय कराल?! या टिप्स नवा फोन घेण्याचा खर्च वाचवतील! – InMarathi

“इनबिल्ट बॅटरी” चा फोन पाण्यात पडला तर काय कराल?! या टिप्स नवा फोन घेण्याचा खर्च वाचवतील!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मोबाईल फोन हा खराब होण्याचे किंवा बिघडण्याचे सगळ्यात जास्त प्रमाण म्हणजे हातातून पडून डॅमेज होणे किंवा पाण्यात पडून बंद होणे. पावसाळ्याच्या दिवसात या दोन्हीचे प्रमाण सर्वाधिक असते.

मोबाईल डॅमेज होण्यासाठी आपण त्याला कव्हर आणि टेम्पर्ड ग्लास लावतोच. शिवाय पाण्यात भिजू नये म्हणून प्लास्टिक कव्हर आणि बरच काही.

हातातून पडून डॅमेज झाला तर जास्तीत जास्त मोबाईलच्या बॉडीवर डेंट येतो किंवा मोबाईलचा डिस्प्ले फुटतो. यासाठी बाजारात बरेच ऑप्शन उपलब्ध आहेत.

 

mobile damaged inmarathi

 

पण, मोबाईल पाण्यात पडला तर इथे मोबाईल रिकव्हर होण्याचा रेट हा ३०% एवढा असतो. (पाण्यात पडला आणि लगेच काढला तर वेगळी केस आहे.)

मोबाईलला जर रीमुव्हेबल बॅटरी असेल तर ती काढून आपण मोबाईल थोड्या वेळाने वापरू शकतो. पण जर बॅटरी नॉन-रीमुव्हेबल असेल तर? इथे जरा परिस्थिती वेगळी असते.

भलेही मोबाईल किती ही water किंवा splash प्रूफ असो वा आयपी ६८ व्हेरिफाईड, मोबाईल पाण्यात गेला की त्याच्या चार्जिंग पोर्ट, हेडफोन जॅक, स्पीकर-माईक सारख्या भागातून पाणी आत जातच जात.

त्यामुळे मोबाईल डॅमेज व्हायचे चान्सेस हे सर्वात जास्त असतात.

आज अशा स्थिती मध्ये मोबाईल सर्व्हिस सेंटर मध्ये दिला की तो वॉरंटीच्या बाहेर रिपेयर होतो. त्यामुळे एखादा भाग हा डॅमेज झाला की त्याला परिणामी तेवढा चार्ज हा भरावाच लागतो.

 

mobile in water inmarathi

 

तर, बघूया की जर नॉन रीमुव्हेबल बॅटरी असताना मोबाईल पाण्यात पडला तर घरच्या घरी आपण काय करू शकतो त्याबद्दल.

आपला मोबाईल फोन जर पाण्यात पडला तर सगळ्यात आधी पाण्यातून काढला की चांगला पुसून घ्या. इथे सुद्धा मोबाईल पुसण्यासाठी कापड वापरण्या ऐवजी टिश्यू पेपरचा वापर हा इफेकटिव्ह ठरेल.

 

mobile drying inmarathi

 

आता, जिथून जिथून पाणी आत जाण्याची शक्यता आहे जसं वर सांगितलं चार्जिंग पोर्ट, हेडफोन जॅक तिथून ब्लोव्हरचा वापर करून पाणी काढण्याचा प्रयत्न करावा.

इथे आपण ब्लोव्हर सांगत आहोत, ड्रायर नव्हे.

ड्रायर मधून वस्तू मधून पाणी काढण्यासाठी गरम हवेचा वापर होत असतो. ज्यामुळे पाण्याचे बाष्पात रूपांतर होऊन मोबाईल चे इंटर्नल सर्किट हे डॅमेज व्हायचे प्रमाण सर्वाधिक असते.

त्यामुळे मोबाईल मधून पाणी कमी करण्यासाठी किंवा बाहेर काढण्यासाठी ब्लोव्हर चा वापर आपण करू शकतो.

त्यानंतर बरेच लोकं सांगतात त्याप्रमाणे तो अजून ड्राय होण्यासाठी तांदळाच्या डब्यात आपण २-३ दिवस ठेवू शकतो.

 

mobile in rice inmarathi

 

यामुळे मोबाईल मध्ये जे बाष्प रुपात पाणी असेल ते तांदूळ शोषून घेऊन मोबाईल ड्राय होऊ शकतो. तांदळापेक्षा जास्त गतीने ड्राय करायचा असेल तर त्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे ‘सिलिका जेल’.

जनरली चामड्याच्या बुटाच्या बॉक्स मध्ये, फळांच्या बॉक्स मध्ये हे आपल्याला सहज मिळून जातील.

सिलिका जेल ह्या छोट्या छोट्या पाकिटात उपलब्ध आहेत. आपला भिजलेला मोबाईल एका बॉक्स मध्ये ठेवून त्यात सिलिका जेलच्या छोट्या पॅकेट रात्रभर ठेवून द्या.

तांदळापेक्षा जलदगतीने मोबाईल ड्राय येथे होऊ शकतो.

जर तुम्ही मोबाईल डिसमेंटल करण्यात सक्षम असाल तर इंटरनेटवर ifixit सारख्या वेब साईट आहेत ज्या मोबाईल कसा उघडायचा आणि त्यातून पाण्याचे ड्रॉप लेट कसे रिमूव्ह करायचे याबाबत गाईड केले आहे.

मोबाईल उघडून तो पुन्हा असेंम्बल करण्यात तुम्ही सक्षम असाल तर हा मार्ग तुम्ही अवलंबू शकता. रिस्की मार्ग आहे पण सक्षम असाल तर नक्की करा.

 

mobile dismantel inmarathi

 

आणि सगळ्यात शेवटचा मार्ग म्हणजे थेट सर्व्हिस सेंटर गाठा. आधीच सांगीतल्या प्रमाणे मोबाईल वॉरंटी मध्ये असला तरी तो बाहेर कुठेही रिपेयर करताना वॉरंटी कव्हर होत नाही!

मोबाईल फक्त भिजला असेल तर तो ड्राय करायचे काही नॉमिनल चार्ज तिथे अप्लाय केले जातात. पण एखादा पार्ट डॅमेज झाला असेल तर ते बरेच महागात पडू शकते.

तर, नॉन रीमुव्हेबल बॅटरी वाला जर आपला फोन पाण्यात गेला असेल तर वरील पर्याय आपण अवलंबू शकतो.

मोबाईल पाण्यात पडला की आपण काही सेकंदात तो बाहेर काढतो. त्यामुळे सर्व्हिस सेंटर हा पर्याय शेवटला राखून ठेवला तरी आपलं काम होऊ शकतं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?