' ...तर छत्रपतींच्या स्वराज्याची राजधानी "राजगड" न होता दुसरीच असली असती...!

…तर छत्रपतींच्या स्वराज्याची राजधानी “राजगड” न होता दुसरीच असली असती…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

रायगड किल्ल्याचं नाव जरी कुठे वाचण्यात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांची ती भव्य प्रतिमा डोळ्यासमोर येते. सिंहासनावर बसलेला आपला राजा, डाव्या हाताशी असलेली तलवार, करारी बाणा आणि भेदक नजर बघितली की आपसूकच आपले हात जोडले जातात.

“छत्रपती शिवाजी महाराज की…” असं म्हंटल्यावर कोणालाच “जय” हे जोरात म्हणा असं सांगावं लागत नाही. तो आवाज प्रत्येकाच्या मनातून येत असतो.

हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे अख्ख्या जगाला प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व आहे.

१६७४ मध्ये जेव्हा रायगड किल्ल्याची घोषणा राज्याची राजधानी म्हणून झाली आणि तिथे राज्याभिषेक सोहळा झाला तो इतिहासातील सर्वात देखणा सोहळा म्हणून मानला जातो.

 

raigad inmarathi

 

समुद्रसपाटी पासून ८२० किलोमीटर उंची वर सह्याद्री पर्वतरांगांवर बांधण्यात आलेल्या रायगड किल्ल्याला १७३७ पायऱ्या आहेत. रायगडाच्या पायथ्याशी पाचड आणि रायगडवाडी हे दोन गाव आहेत.

मराठा साम्राज्यात या दोन गावांना खूप महत्व होतं. कारण, रायगडावर जाण्यासाठी पाचड गावातूनच रस्ता होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात नेहमी १०,००० सैनिक नेहमी पाचड गावात तैनात असायचे.

हिरोजी इंदुलकर यांच्या नेतृत्वाखाली बांधण्यात आलेला रायगड किल्ल्यावरील राजवाडा हा पूर्णपणे लाकडी बांधकाम होतं. राजदरबार हा नगरखाना दरवाजा आणि मीना दरवाजा आणि पालखी दरवाजा यामुळे खूप सुंदर दिसायचा.

‘हिरकणी बुरुज’ जी की एका आई ने आपल्या तान्ह्या लेकरासाठी केलेल्या पराक्रमाची गाथा सांगतो हे सगळंच अंगावर शहारे आणणारं आहे.

रायगड किल्ला हा खऱ्या अर्थाने मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आपल्या राजाची राजधानी आहे.

रायगड राजधानी म्हणून घोषित होण्याआधी ‘सुधागड’ चा सुद्धा पर्याय छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारात घेतला होता.

‘सुधागड’ ह्या किल्ल्याबद्दल कदाचित तुम्हाला माहीत नसेल. पाली जिल्ह्यातील हा किल्ला खूप प्राचीन आहे. दुसऱ्या शतकात हा किल्ला बांधल्याची इतिहासात नोंद आहे.

 

sudhagad inmarathi

 

१४५७ पासून या किल्ल्यावर बहमनी सुल्तान साम्राज्याने आपला तळ ठोकला होता. १६५७ मध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बहामनी सुल्तान कडून जिंकला होता.

सुधागड ला भोराईदेवी च्या नावावरून ‘भोरापगड’ या नावाने सुद्धा ओळखलं जातं. सह्याद्रीच्या पर्वतरांगाची शोभा वाढवणारा सुधागड हा किल्ला त्याच्या भव्य उंची मुळे सर्वात संरक्षक किल्ला म्हणून मानला जायचा.

भव्य उंची आणि विस्तारलेला परिसर यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुधागड ही राजधानी असावी असा विचार केला होता.

राजधानी होण्या योग्य त्याची रचना सुद्धा होती. चिलखती बुरुज, चोर दरवाजा, गोमुखी महाद्वार, तलाव, पाण्याच्या टाक्या असा सुसज्ज किल्ला राजधानी होण्यास योग्य होता.

पण, रायगड हा भौगोलिक दृष्टीने राज्याच्या मध्यभागी असल्याने राजधानी म्हणून रायगड या किल्ल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.

सुधागड किल्ला आणि रायगड किल्ला यांचं बांधकाम बऱ्याच ठिकाणी सारखंच वाटतं. दोन्ही किल्ल्यांचे महाद्वार हे एकसारखेच आहेत.

पेशव्यांच्या काळात पंतसचिव यांना सुधागड ची राखणदारी करण्याचे काम देण्यात आले होते.

सुधागड ची उंची ६२० मीटर इतकी आहे. किल्ल्या भोवती चा परिसर हा वन्यसंवर्धन खात्याच्या अखत्यारीत आहे. सुधागड च्या पायथ्याशी ठाकुरवाडी हे एक गाव आहे.

सुधागडावर पोहोचल्यावर भोराईदेवीचं मंदिर दिसतं. त्या व्यतिरुक्त दोन शिव मंदिराचे काही अवशेष दिसतात. गडावरून दोन तळे, काही घरं आणि मोठ्या प्रमाणात हिरवळ बघायला मिळते.

सुधागडाला तीन मुख्य दरवाजे आहेत ज्यापैकी महादरवाजा हा सर्वात मोठा आणि प्रशस्त आहे.

 

sudhagad entry inmarathi

 

सुधागडावरील राजवाड्याजवळ एक ‘हत्ती पागा’ म्हणजे हत्तींना बांधण्याची जागा आहे. अशीच जागा रायगडावर सुद्धा आहे.

‘सवाष्णी’ घाटाकडून आल्यास आपण दिंडी दरवाज्याकडे येतो ज्याला की गोमुखी महाद्वार असं म्हणतात. रायगडाच्या महाद्वाराचं आणि या महाद्वाराचं बांधकाम सारखंच वाटतं.

१६४८ मध्ये ‘हिंदवी स्वराज्य’ मध्ये समाविष्ट करण्यात आलेला सुधागड हा मालोजी भोसले यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला होता.

मालवजी नाईक, जाधव आणि सरनाईक यांनी केवळ २५ मावळ्यांना सोबत घेऊन चढाई करून सुधागड जिंकल्याची नोंद आहे.

सुधागड चा उल्लेख इतिहासात संभाजी राजेंच्या काळात सुद्धा येतो. मराठी साम्राज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेब ने दक्षिणेकडून स्वारी केली होती.

मराठी साम्राज्याची ताकत ओळखून औरंजेबचा मुलगा त्यावेळी त्याच्या विरोधात गेला होता. संभाजी राजेंनी अकबरचा मुलगा म्हणजेच शहजादा अकबरला सुधागडावर भेट घेऊन आपल्या बाजूने वळवले होते असा उल्लेख आहे.

पुण्याहून ५३ किलोमीटर आणि लोणावळा हून २६ किलोमीटर इतक्या अंतरावर असलेला सुधागड ला सुद्धा प्रत्येक व्यक्तीने भेट द्यावी अशीच ही जागा आहे.

सुधागड हा किल्ला आज एक लोकप्रिय ‘ट्रेकिंग डेस्टिनेशन’ म्हणून ओळखला जातो. सर्वात चांगल्या प्रकारे निगा राखण्यात आलेल्या किल्ल्यांपैकी एक म्हणून सुधागडचं नाव घेतलं जातं.

 

sudhagad trek inmarathi

 

ठाकुरवाडी गावातून ट्रेकिंगसाठी कित्येक लोक जात असतात. पंतसचिव वाडा आणि भोराई माता मंदिर हे दोन प्रमुख पर्यटन आकर्षण आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्या महाराष्ट्रात इतक्या छान गडकिल्ल्यांची संपत्ती आहे.

आपली एकच जवाबदारी आहे की, आपण त्यांची शक्य तितकी स्वच्छ ठेवण्याची काळजी घ्यावी आणि आपल्या या माहेरघरांची माहिती इतर लोकांना अभिमानाने सांगावी.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?