' या माणसाने तुमचं एक काम खूपच सोप्पं करून ठेवलंय, वाचा कोण हा माणूस आणि काय केलंय त्याने? – InMarathi

या माणसाने तुमचं एक काम खूपच सोप्पं करून ठेवलंय, वाचा कोण हा माणूस आणि काय केलंय त्याने?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपण रोज कितीतरी वस्तू वापरतो, पण किती वस्तू अशा आहेत ज्यांच्या उगमाची माहिती आपल्या आहे? विज्ञानाच्या पुस्तकात जितके शोध आपल्याला शिकवले जातात आपल्याला फक्त तितकेच माहित असतात.

आपण ज्या वस्तू वापरतो, त्यांच्या शोध लागण्याच्या बऱ्याच रंजक कथा आहेत, ज्या आपल्याला अजिबात माहीत नसतात. काही वस्तू तर इतक्या छोट्या, क्षुल्लक वाटतात की त्यांचा कोणी कधीतरी डोकं लाऊन शोध लावला असेल हा विचार आपल्या डोक्यातही येत नाही.

“योगायोगाने किंवा करायला गेले एक आणि झाले दुसरेच” याच म्हणी प्रमाणे त्यांचा शोध लागला असेल असे आपल्याला वाटते.

एक उदाहरण पाहा. लहान असताना, उन्हाळ्यात कोका कोला किंवा मिरींडाची बाटली आणली, की त्या टिनच्या झाकणाला दगडाने सपाट करून, छिद्र पाडून दोऱ्यात ओवून घ्यायचो व त्याची भिंगरी व्हायची. बोटांची सालं निघेपर्यंत आपण तिच्याशी खेळत राहायचो, पण त्या प्रकारचे झाकण व ते उघडायला विशेष ओपनर कोणी व कसे शोधून काढले हे आपल्याला अजूनही माहित आहे का? बहुतेक नाही.

 

crown cork inmarathi

 

त्या झाकणाचा निव्वळ योगायोगाने नाही तर लाईट बल्ब, टीव्ही, फ्रिज, यांसारखाच अगदी ऑफिशिअली अभ्यास करून, पेटंट स्वतःच्या नावावर करून शोध लावला गेला आहे हे आपल्याला वाटले होते का? नाही ना? पण असेच झाले.

हा प्रवास कसाय ते जरा जाणून घेऊया. म्हणजे मग प्रत्येक वेळी कोल्ड ड्रिंकची बॉटल उघडताना तुम्हाला ही गोष्ट आठवेल व हा महत्त्वाचा शोध लावणारे विलियम पेंटर पण आठवतील.

विलियम पेंटर यांचा जन्म आयर्लंडचा. वडील एडवर्ड पेंटर हे डॉक्टर होते व त्यांची आई लुईजा गिल्पिन पेंटर ह्या एक गृहिणी होत्या. एका मध्यमवर्गीय कुटुंबातला हा मुलगा शिकून मेकॅनिकल इंजिनिअर झाला व उत्तम करिअरच्या संधीसाठी २० वर्षांच्या कोवळ्या वयात मेरिटोक्रसी असलेल्या अमेरिकेत स्थलांतरित झाला.

विलियमने आपल्या करीयरची सुरुवात १८६५ साली मर्रिल अँड केईझर या मशीन शॉपमध्ये फोरमन म्हणून काम करून केली. तिथे काम करत असताना विलियमने भरपूर अनुभव गाठीशी बांधणे सुरू केले. कामातून भरपूर नवीन गोष्टी शिकायला मिळत होत्या.

 

 

हेच सगळे सुरू असताना, काही काळाने इंजिनीयर विलियमला लांब व गोल मानेच्या बाटलीच्या पारंपरिक झाकणात भरपूर उणीवा जाणवल्या. अर्थात सगळ्यांनाच त्या जाणवत होत्या, पण यावर कोणीही अजून तोडगा काढला नव्हता.

बाटलीतील अर्धे पेय त्या सैल झाकाणामुळे वाया जायचे. त्या लाकडी आणि रबराच्या बुचामुळे बीयर खराब व्हायची, चव बदलायची. याच प्रश्नाचा तोडगा म्हणून विलियम पेंटरने एक मेटलचे झाकण शोधून काढले.

हे दिसायला एखाद्या मुकुटासारखे, म्हणजेच क्राऊन सारखे टोकदार होते व हे झाकण इतके घट्ट बसायचे, की बाटलीतील पेय अजिबात बाहेर येत नसे. सगळ्या बाजू अगदी घट्ट सिल केल्या जायच्या. या झाकणाच्या आतल्या बाजूस स्टीलच्या फॉइलचे कव्हर होते. ज्यामुळे बाटलीतील पेय नीट राहत असे.

 

 

हे झाकण उघडायला विशेष प्रकारचे ओपनर लागायचे, ते ही विलियमने डिझाईन करून ठेवले होते. १८८० साली त्यांनी मोठ्या बॉटल उत्पादक कंपन्यांना त्यांचे क्राऊन कॉर्क वापरून बघण्याचे चॅलेंज दिले.

त्यांच्या म्हणण्यानुसार, हे झाकण “एकदाच वापरायचे, म्हणजे ‘युज अँड थ्रो’ पद्धतीचे असून, त्याचे उत्पादनही किफायतशीर होते. बॉटल बनवणाऱ्या कंपन्यांना फायदेशीर होते. त्यावेळी सगळ्याच ग्राहकांना हे उत्पादन भरपूर आवडले.

त्यांच्या ह्या झाकणांना भरपूर मागणी असल्यामुळे १८९२ साली विलियमने झाकण व ओपनरचे पेटंट आपल्या नावावर करून “क्राऊन कॉर्क इन्कॉरपोरेशन” नावाची एक कंपनीच सुरू केली व आपल्या उत्पादनाचा प्रचार व प्रसार करण्याचे काम सुरू केले.

 

crown cork inmarathi1

 

झाकण व ओपनर बरोबरच झाकण बनवायची मशीन, ट्रेन मधील सेफ्टी पॅसेंजर सीट याचबरोबर काउंटरफिट मनी म्हणजेच नकली, बनावटी पैसे ओळखण्याची मशीन, यांसारखे तब्बल ८४ इंवेन्शन्स सुद्धा विलियम पेंटर यांच्या नावावर रजिस्टर्ड आहेत.

क्राऊन इन्कॉरपोरेशन ही आज “फॉर्चून ५००” कंपनीजपैकी एक आहे. कोल्ड ड्रिंक्सच्या टीन कॅन्स पासून, स्पेशलाईज पॅकेजिंग, फूड कॅन्स, मेटल कॅन्स थोडक्यात, पॅकेजिंगच्या क्षेत्रात सगळ्यात जुन्या वडाच्या झाडाप्रणे खोलवर आपली मुळं घट्ट रोवून बसली आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?