' ...म्हणून या भारतीय दिग्दर्शिकेने हॅरी पॉटरच्या दिग्दर्शनाची ऑफर नाकारली, वाचा!

…म्हणून या भारतीय दिग्दर्शिकेने हॅरी पॉटरच्या दिग्दर्शनाची ऑफर नाकारली, वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

खरंतर सिनेमाचं जग हे स्वप्नाचं जग आहे. भव्यदिव्य सेट्स.उंची फर्निचर असलेले राजमहालासारखे बंगले, कथानकाची मागणी,  मस्त झाडांमागं पळत गाणी म्हणणारे नायक नायिका हे काही आयुष्य नसतं.. पण तरीही ते खरं वाटतं.

सिनेमा हा समाजमनाचा आरसा आहे. अनेक सामाजिक आशय असलेले कलात्मक, उच्च निर्मितीमूल्यं असलेले, समांतर असे खूप सिनेमे बनतात. तिकीटबारीवर तुफान गर्दी खेचलेले अनेक साधे सुधे सिनेमे आजही लोक आवडीने बघतात.‌

 

cinema hall inmarathi

 

पूर्वी असलेले तंबूतील पिक्चर नंतर सिनेमा थिएटरमध्ये आणि आता वातानुकूलित मल्टीप्लेक्सपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. कोविडच्या काळात तर ओटीटी वर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले.

थोडक्यात काय तर सिनेमा, नायक नायिका हे लोकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त करून आहेत.

सिनेमात काम करणं हे कितीतरी लोकांचं स्वप्न असतं. प्रसिद्ध युनिटमध्ये, प्रसिद्ध बॅनरखाली काम करता यावं एखाद्या दिग्दर्शकाकडे, एखाद्या नायकासोबत, एखाद्या नायिकेसोबत..कुणी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करावं यासाठी किती जण जीवाचं रान करत असतील.

फिल्मफेअर पुरस्कार मिळणं हा किती मोठा सन्मान समजला जातो. त्याच्याही पुढे जाऊन आॕस्करची बाहुली म्हणजे स्वर्गात जाऊन आल्याचा भास.

जगातील सिनेमातला सर्वोच्च बहुमान समजला जातो. तो मिळावा यासाठी पण कितीतरी प्रयत्न करतात. आपल्यातलं सर्वोत्तम द्यायचा.

भारतातही असेच अनेक ख्यातनाम दिग्दर्शक आहेत जे व्यावसायिक सिनेमापेक्षा कलात्मक सिनेमाच्या जास्त प्रेमात आहेत. अगदी उत्तमोत्तम कलाकृती त्यांनी सादर केल्या आहेत.

त्या कलाकृतीनींच त्यांना ओळख मिळवून दिली आहे. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचं नांव आदरानं कौतुकाने घेतलं जातं. त्यापैकी एक मीरा नायर.

 

mira nair inmarathi

 

आपल्या वेगळ्या शैलीत सिनेमा दिग्दर्शित करणारी ही मनस्वी दिग्दर्शिका. माॅन्सून वेडिंग, आॕस्करसाठी नामांकन मिळालेला सलाम बाँबे या हटके सिनेमांनी प्रसिद्ध झालेली ही दिग्दर्शिका.

मीरा नायर यांना हॅरी पॉटर या सिनेमाच्या पाचव्या भागाचं दिग्दर्शन करण्यासाठी विचारणा केली होती. आता हाॅलिवुडमध्ये काम करायला मिळणार म्हटल्यावर किती लोक आनंदाने होकार देतात.

कारण तिथं बनणारे सिनेमे तंत्रज्ञानाची कमाल असते. पण मीरा नायर यांनी त्या सिनेमाचं दिग्दर्शन करायला नम्रतेने नाही असं सांगितलं.

लोक हाॅलिवुडमध्ये काम करायला धडपडतात. पण मीरा नायर यांनी मात्र सहजपणे हे काम जमणार नाही असं सांगून टाकलं. कोण आहेत या मीरा नायर?

 

mira nair rejects harry potter inmarathi

 

मूळ भारतीय असलेल्या या अमेरिकन चित्रपट निर्मिती करणाऱ्या मनस्वीनीचं नाव मीरा नायर. १९५७ साली ओडिशा येथे जन्मलेल्या मीरा नायर अभ्यासातही अत्यंत हुशार होत्या.

त्याचबरोबर रंगभूमी हे त्यांचं प्रेम होतं. अभ्यासातील हुशारीने त्यांना केंब्रिज आणि हार्वर्ड या दोन्ही विद्यापीठात प्रवेश मिळाला. आता निवड त्यांनी करायची होती.

कुठं जायचं? केंब्रिज की हावर्ड, त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथं गेल्यावर काही डाॅक्युमेंट्रीज पाहिल्या आणि अभिनयाचं स्वप्न दिग्दर्शन करण्यात बदललं.

अनेक छोट्या छोट्या डाॅक्यूमेंट्रीज बनवत हळूहळू मीरा नायर यांचा हा सिनेप्रवास जागतिक पातळीवर चांगले सिनेमे बनवत आजही सुरू आहे.

१९८८ साली आलेल्या सलाम बाँबे या वेगळ्या धाटणीच्या सिनेमानं मीरा नायर हे नांव प्रकाशझोतात आले. NFDC आणि मीरा नायर यांनी मिळून बनवलेला हा चित्रपट झोपडपट्टी आणि तेथील मुलांवर आधारित होता.

पैसा मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं याची कथा होती ती! प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनीही या चित्रपटाची मोकळेपणाने स्तुती केली होती.

उत्कृष्ट सिनेमाचं राष्ट्रीय पारितोषिक तर या सिनेमाला मिळालंच पण कान्स माँट्रीयल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाने बाजी मरली होती.

इतकंच नव्हे तर ऑस्करसाठी बेस्ट फॉरेन फिल्म या कॅटॅगिरीत या सिनेमाला नामांकन मिळाले होते. पहिला वाहिला सिनेमा इतका गाजला त्यामुळे मीरा नायर हे नांव प्रसिद्ध झालं!

 

salaam bombay inmarathhi

 

विशेष म्हणजे या सिनेमात काम करणारी सगळी मुलं ही मुंबईत फुटपाथवर राहणारी होती. मीरा नायर यांनी त्यांच्यासाठी अभिनयाची प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली होती.

मग मीरा नायर यांनी अशा रस्त्यावरील मुलांसाठी एक ट्रस्ट स्थापन केला. जो या मुलांची देखभाल करतो.

त्यानंतर २००१ मध्ये आलेल्या माॅन्सून वेडिंग या चित्रपटाने मीरा नायर हे नाव आणि एकदा चर्चेत आलं. लग्नामध्ये पाण्यासारखा पैसा खर्च करणाऱ्या, प्रतिष्ठेच्या पायात मुलांचं सुख.

त्यांचा आनंद न समजणाऱ्या पालकांवर आधारित असलेला हा सिनेमा व्हेनिस चित्रपट महोत्सवात गोल्डन लाॅयल अॅवाॅर्ड विजेता ठरला.

२००६ साली आलेला द नेमसेक हा सिनेमा एका देशातून दुसऱ्या देशात गेल्यानंतर जे सांस्कृतिक स्थलांतर होतं त्यावर भाष्य करणारा होता. हा सिनेमा पण वेगळ्या विषयामुळे चांगलाच प्रसिद्ध झाला.

परदेशात बरीच पारितोषिकं मिळाली. पण द नेमसेक या सिनेमाच्या तयारीत मीरा नायर गुंतल्या असतानाच एक फार वेगळी कल्पनेच्या पलीकडे गोष्ट घडली!

 

the namesake inmarathi

 

पुढच्या महिन्यात द नेमसेकचं शूटिंग चालू करणार तोच त्यांना हॅरी पॉटर या सिनेमाच्या चौथ्या भागाच्या दिग्दर्शनाची संधी देण्यात आली.

पण आता द नेमसेकची तयारी पूर्ण झाली होती आणि मीरा नायर या सिनेमासाठी वेळ देऊ शकत नव्हत्या. आयुष्यात खूपदा श्रेयस आणि प्रेयस यांची निवड करायची वेळ आली तर माणसानं प्रेयसच निवडावं.

श्रेयस म्हणजे श्रेयस्कर..कधी कधी श्रेयस्कर गोष्ट पैसा प्रसिद्धी मिळवून देते पण ती गोष्ट समाधान आनंद देऊ शकेल असं नाही. आणि प्रेयस म्हणजे आवडणारी.. प्रेमाची गोष्ट.. कधी कधी यात‌ पैसा कमी मिळतो.. पण आनंद काम केल्याचं समाधान हे फार फार मोठं असतं.

मीरा नायर यांनी प्रेयसच निवडलं. कारण हॅरी पॉटर दुसरं कुणीही दिग्दर्शित करु शकलं असतं पण द नेमसेक फक्त मीरा नायर याच दिग्दर्शित करी शकल्या असत्या. हे स्वतः त्यांच्या मुलानं सांगितलं.

 

mira inmarathi

 

द नेमसेक हा सिनेमा करायचा होता यासाठी त्यांनी हॅरी पॉटर सिनेमाला नम्रपणे नकार दिला.

आयुष्यात असे प्रसंग येतात तेंव्हा खरंच आपल्या हृदयाच ऐकावं. ते निर्णय सहसा चुकत नाहीत. आणि बुद्धीचा निर्णय बरोबर आला तरी मनाचा कोंडमारा काही चुकत नाही. आणि तो चुकवण्यात मीरा नायर यशस्वी झाल्या.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?