' एका रिक्षाचालकाने असे काही केले की लोक टीकाही करु लागले आणि कौतुकही!

एका रिक्षाचालकाने असे काही केले की लोक टीकाही करु लागले आणि कौतुकही!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या करिअर साठी घरापासून लांब जाणं हे सध्या जवळपास अपरिहार्य झालं आहे. कामाची संधी शोधून कित्येक व्यक्ती दुसऱ्या शहरात तर कित्येक लोक दुसऱ्या देशात जातात.

इंटरनेट च्या सुविधेमुळे ‘जग जवळ आलं आहे’ हे आपण नेहमीच म्हणतो. पण, तरीही भौगोलिक अंतर हे अंतरच असतं. ते कमी करण्याचा दूर राहणारे लोक काही न काही शक्कल लढवून नेहमी प्रयत्न करत असतात.

 

internet inmarathi

 

घराची ओढ त्यांना शांत बसवत नसते आणि ‘संदेसे आते है, हमे तडपाते है…’ या गाण्यातील ‘घर कब आओगे ?’ चं उत्तर आणि संधी या व्यक्ती रोज शोधत असतात.

काही लोक आपल्या माणसांना आपल्या सोबत रहायला घेऊन येतात तर काही लोक अधूनमधून एक ब्रेक घेऊन घरी जात असतात. या झाल्या नेहमी आढळणाऱ्या व्यक्ती.

पण, काही व्यक्ती या खऱ्या अर्थाने असामान्य असतात. त्या आपल्या राहत्या ठिकाणीच अशी काही arrangement करतात की त्यांना आपल्या घरी असल्या सारखंच वाटायला लागतं.

या प्रकारातलीच सध्या चर्चेत असलेली एक व्यक्ती म्हणजे ओडिशा मधील भुवनेश्वर शहरातील एक रिक्षा चालक ‘सुजित दिगल’.

कंधमल या गावात जन्मलेले सुजित दिगल हे काही वर्षांपासून भुवनेश्वर इथे रिक्षा चालवतात.

आपल्या गावाशी त्यांचा असलेला बॉण्ड इतका स्ट्रॉंग आहे की, भुवनेश्वर सारख्या शहरात राहतांना सुद्धा त्यांना कायम त्यांच्या निसर्गरम्य गावाचीच आठवण येत असते आणि एक प्रकारे त्याला शहर म्हणजे कोंडवाडा असल्यासारखं वाटतं.

 

sujit digal inmarathi

 

कोरोना आल्यापासून तो गावी सुद्धा जाऊ शकत नाहीये. आपण बघितलं असेल की याच दरम्यान काही रिक्षा वाल्यांनी रिक्षातच राहणं प्रेफर केलं आहे.

सुजित दिगल ने घराजवळ आहोत हे वाटण्यासाठी एक युक्ती केली आहे. आपल्या रिक्षालाच त्याने घराचं, गार्डनचं स्वरूप दिलं आहे.

रिक्षा मध्येच त्याने झाडं, छोटं फिश टॅंक, पक्षी आणि त्याने पाळलेला एक उंदीर असा लवाजमा त्याने एकत्र केला आहे. जेव्हा त्याची रिक्षा धावते तेव्हा असं वाटतं की, पूर्ण कंधमल गाव हे धावत आहे.

कित्येक लोकांना आपण बघतो की ते अश्या सुधारणा त्यांच्या कार किंवा तत्सम मोठ्या गाड्यांना करून घेत असतात.

तसंच, सुजित दिगलने रिक्षाच्या एका बाजूला कुंड्यांची एक रांग एका वेल्ड केलेल्या रॉड वर ठेवली आहे. प्रत्येक वेळी रिक्षात बसताना त्याला असं वाटतं की, तो त्याच्या गार्डन मध्ये बसूनच रिक्षा चालवत आहे.

 

auto garden inmarathi

 

पर्यावरण प्रेमी लोकांना ही कन्सेप्ट नक्कीच आवडत असेल. ‘पर्यावरणाची काळजी’ घेण्याचा संदेश देणाऱ्या सुजित दिगल वर प्राण्यांना रिक्षा मध्ये ठेवण्यामुळे मात्र टीका होत आहे.

कारण हे की, चालत्या वाहनात पक्षी आणि छोटे प्राणी हे घाबरत असतात. जसा सुजित दिगल चा शहरात कोंडमारा होतो तसा या पक्ष्यांचा सुद्धा कोंडमारा होत असणार यात शंकाच नाहीये.

सोशल मीडिया वर कित्येक लोक याबद्दल सध्या भाष्य करत आहेत. ट्विटर वर वायरल झालेल्या या फोटो आणि विडिओ वर प्रतिक्रिया देतांना काही लोकांनी झाडांबद्दल कौतुक केलं आहे.

पण, प्राणी सोबत आणि असे बंदिस्त करून ठेवणं याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

थोडा मोठा आवाज झाला की दचकणारे आणि उडून जाणारे पक्षी दिवसभरात कित्येक वेळेस ‘खटकन’ चालू – बंद होणाऱ्या रिक्षात किती वेळेस उडून जाण्याचा प्रयत्न करत असतील हा सुद्धा विचार व्हायलाच हवा.

सुजित दिगल पर्यंत या प्रतिक्रिया पोहोचतील किंवा एखादी पक्षी / प्राणी मित्र संघटना लवकरच पोहोचून त्याला हा बदल करायला लावेल यात शंकाच नाही.

स्पर्धा आणि त्या मानाने सध्या कमी झालेल्या उत्पन्न संधीमुळे प्रत्येक जण सध्या काही ना काही तरी वेगळं करायचा प्रयत्न करतोय.

केरळ मधील एक रिक्षा चालक या गोष्टीमुळे चर्चेत होता की, तो प्रत्येक प्रवासी ला रिक्षात बसण्याआधी स्वतः खाली उतरून प्रवासी लोकांना सॅनिटायझर ने हात धुवायला लावतो.

या व्यक्तीने केलेला विडिओ खूप लोकप्रिय झाला आणि त्याच्या रिक्षात बसण्यासाठी लोक त्याला शोधू लागले.

आपल्या कामावर निष्ठा असणे आणि ते चांगल्या पद्धतीने करणे यासाठी सतत सुधारणा करत राहणे हेच सध्याची गरज आहे. आपला फायदा बघताना इतर प्राण्यांना मात्र गृहीत धरू नये इतकंच आपण म्हणू शकतो.

 

green auto inmarathi

 

यावर लवकरच काही नियमावली जाहीर होईल अशी आशा करूयात. पण, सुजित दिगल सारख्या innovative लोकांना बिजनेस देऊन त्यांना कठीण काळात आपण सगळे साथ देऊया.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?