' भगवान शंकरांचे स्थान ‘कैलास’ : जगातील सर्वात रहस्यमयी पर्वत

भगवान शंकरांचे स्थान ‘कैलास’ : जगातील सर्वात रहस्यमयी पर्वत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कैलास मानसरोवर यात्रेबद्दल तुम्ही ऐकून असालंच. हिंदू धर्मात असे सांगण्यात येते की पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक हिंदू व्यक्तीने एकदा तरी कैलास-मानसरोवराचे दर्शन घेतले पाहिजे. ज्यामुळे त्याची सारे पापे धुतली जातात.

कैलास पर्वत म्हणजे साक्षात भगवान शंकरांचे निवासस्थान होय. त्याच्या बाजूलाच आहे अजून एक पवित्र स्थान मानसरोवर! अतिशय स्वच्छ, नितळ पाणी असलेल्या या सरोवराची महती देखील अगाध आहे. मानसरोवर हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ आहे मनाचा सरोवर!

 

kailash manas sarovar InMarathi

 

कैलास पर्वत हा समुद्र सपाटीपासून २२०६२८ फुट (जवळपास ६,७१४ मीटर) उंच आहे. हिमालयाच्या उत्तरेला तिबेट मध्ये हा बर्फाने ढाकला गेलेला पर्वत स्थित आहे. अश्या या पवित्र कैलास पर्वताबद्दल अनेक रहस्ये सांगितली जातात. चला जाणून घेऊया या अद्भुत न उलगडलेल्या रहस्यांबद्दल!

 

kailash manas sarovar 1 InMarathi

 

कैलास पर्वत हा हिंदू, जैन, बौद्ध आणि तिबेटी बौद्ध या चारही धर्मांचे अध्यात्मिक केंद्र मानले जाते. कैलास पर्वत हा जगाचा आणि ब्रह्मांडाचा केंद्रबिंदू ठरवण्यात आला आहे. ज्याला एक्सिस मुंडी म्हणतात.

आकाश आणि पृथ्वी यांना जोडणाऱ्या या पर्वताजवळ चारी दिशा येऊन मिळतात. जाणकारांच्या मतानुसार जेथे एक्सिस मुंडीचे अस्तित्व आहे तेथे अलौकिक शक्ती आढळून येतात. त्यामुळेच कैलास पर्वतावर अद्भुत शक्तींचा वास असल्याचे मानले जाते.

या पर्वताच्या भोवती राहणाऱ्या भिक्षुंनी देखील या गोष्टीला दुजोरा दिला असून येथे राहण्याने जीवनमानात वेगळा फरक झाल्याचा अनुभव त्यांना आला आहे.

 

axis-mudi-kailas-marathipizza

 

कैलास पर्वत हा माउंट एव्हरेस्ट पेक्षा कमी उंचीचा आहे. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या पर्वताच्या माथ्यावर आजवर एकही व्यक्ती पोचू शकलेला नाही. म्हणजे एकीकडे जगातील सर्वोच्च शिखरावर तुम्ही या काळात सहज जाऊ शकता.

पण त्यापेक्षा तब्बल २००० मीटर कमी उंचीच्या कैलास पर्वतावर आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोचणे देखील अशक्य आहे. त्याचे कारण म्हणजे जो कोणी या पर्वतावर जातो तो आपला रस्ता चुकतो. त्याला माथा तर दिसत असतो पण तो त्या पर्यंत पोचू शकत नाही.

अनेक जणांनी आपला अनुभव सांगितला आहे की माथ्याच्या जवळपास पोचताच जोरजोरात हिमवादळे सुरु होतात आणि या भयानक परिस्थितीमध्ये मनुष्य प्राणी पुढे जाऊ शकता नाही. म्हणजे एकप्रकारे माथा कोणीही सर करू नये अशीच या पर्वताची इच्छा दिसते. तरी स्थानिक तिबेटी लोक सांगतात की ११ व्या शतकात मिलारेपा नावाच्या एका भिक्षुने कैलास पर्वताचा माथा गाठला होता. पण त्यानंतर कोणी ही कामगिरी केल्याचे ऐकिवात नाही.

 

kailash-parvat-marathipizza02

http://4.bp.blogspot.com

 

कैलास पर्वताच्या पायथ्याजवळ आपल्याला दोन सरोवर आढळतात एक म्हणजे पवित्र मानसरोवर आणि दुसरे म्हणजे अशुभ राक्षस सरोवर! एकीकडे मानसरोवराचे पाणी गोड आहे तर दुसरीकडे राक्षस सरोवराचे पाणी मात्र खारे आहे.

आणि अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोन्ही सरोवरांच्या मध्ये केवळ अगदी लहानसा भाग आहे जो या सरोवरांना वेगळं करतो. असे म्हणतात की राक्षस सरोवर म्हणजे तेच सरोवर आहे जेथे रावणाने भगवान शंकरांची आराधना केली होती आणि वर मिळवला होता.

स्थानिक लोक या दोन सरोवरांना देवांचे आणि राक्षसाचे प्रतिक मानतात. अजून एक अद्भुत गोष्ट म्हणजे आकाशातून पाहिल्यास मानसरोवराचा आकार सूर्यासारखा दिसतो तर राक्षस सरोवराचा आकार मात्र चंद्रासारखा दिसतो.

 

Mansarovar-and-Rakshastal-Shapes-marathipizza

 

अजून एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या पर्वताजवळील परिसरात जाणाऱ्या पर्यटकांना असा अनुभव आला आहे की त्यांची नखे आणि केस भरभर वाढली आहेत. म्हणजेच सामान्य परिस्थितीत नखे आणि केस दोन आठवड्यात जेवढी वाढतात तेवढीच वाढ कैलास पर्वताच्या वातावरणात अवघ्या दोन दिवसांमध्ये होते.

या रहस्यावर आजही अनेक जाणकार संशोधन करत आहेत.

 

kailash-parvat-marathipizza03

 

तर अश्या या रहस्यमयी कैलास पर्वत आणि आसपासची सफर एकदा तरी केलीच पाहिजे कारण तेव्हाच तुम्हाला प्रचीती येईल की स्वर्गीय सौंदर्य कशाला म्हणतात!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?