' अवघ्या २३ वर्षाच्या भारतीय तरुणाने रिक्षाचा केलेला “असा” वापर जगभरात कौतुकाचा विषय ठरतोय – InMarathi

अवघ्या २३ वर्षाच्या भारतीय तरुणाने रिक्षाचा केलेला “असा” वापर जगभरात कौतुकाचा विषय ठरतोय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

वाढत्या जनसंख्ये मुळे वाढत जात असलेली घरांची डिमांड ह्यामुळे साधे १ bhk फ्लॅट्स सुद्धा अर्ध्या कोटीच्या घरात गेले आहेत. त्यात मुंबईत व इतर शहरांमध्ये तर विचारायलाच नको.

भारत असा देश आहे जिथे स्वतःचे घर असण्याला भरपूर महत्व आहे. घरावरून आपण माणसाच्या आर्थिक स्थितीला चक्क जज करतो.

तिकडे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा रिटायरमेंट नंतर भाड्याच्या घरात राहत असल्याचे उदाहरण असताना सुद्धा आपल्याला “आपले” घर हवे असते.

 

barack-obama-rmarathipizza01

 

काही लोकांकरता घर हे गुंतवणुकीचे एक ऑप्शन असते. पण वाढत्या जनसंख्याच्या मानाने ही डिमांड कितीशी पुरी होणार आहे यात शंका आहे. या साठी किती जंगलांच्या वस्त्या होतील हे काळच सांगेल.

पण या समस्येवर एका २३ वर्षीय आर्किटेक्ट ने जो तोडगा काढलाय तो आपण एकदा नक्कीच बघायला हवा.

चेन्नईच्या २३ वर्षीय एन. जी. अरुण प्रभू या आर्किटेक्ट ने ३ चाकी ऑटोरिक्षेवर एक कॉम्पॅक्ट मोबाईल घर बनवले आहे.

छोट्या जागेचा वापर योग्य पद्धतीने कसा करावा, अडजस्टिब्ल फर्निचर कसं असावं याचे उत्तम उदाहरण म्हणून आपण या घराकडे पाहू शकतो.

ह्या घराची निर्मिती भंगारात टाकलेल्या गाड्या जसे बस, ट्रक यांच्या पत्रा पासून केली आहे. या घरात बाथ टब, लिव्हिंग रूम, बेडरूम, किचन, वर्किंग स्पेस व टेरेस सुद्धा आहे.

सोयींमध्ये पाण्याची टाकी व सोलर पॅनल आहे. ज्यामुळे पाणी व विजेचा कोणत्याही प्रकारची उणीव भासत नाही.

 

n g arun inmarathi

 

 

अरुण हा मूळचा तामिनाडूमधील नमक्कल नामक छोट्या शहराचा निवासी. त्या शहरातील त्याच्या आवडत्या आठवणी विचारल्या तर तिथल्या एकमेकांना चिकटून असलेल्या इमारती, पोल्ट्री फार्म व मळे ह्यांच्ये डिझाईन्स.

त्याच्या ह्याच डिझाईन व आर्टच्या आवडीमुळे त्याने आर्किटेक्चर करायचे ठरवले व शिक्षणासाठी तो चेन्नईला स्थलांतरित झाला.

इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड आर्किटेक्चर (MIDAS) या कॉलेज मध्ये शिक्षण घेत असताना, अरुण ने मुंबई व चेन्नई येथील, अगदीच छोट्या जागेत बांधलेल्या झोपपट्टीतल्या घरांना अभ्यासणे सुरू केले.

त्यात काही गोष्टी त्याच्या समोर आल्या जश्या “जागा कमी जरी असली तरी तिचा चुकीचा वापर, त्यामुळे घर बांधायला लागणारा खर्च जो ३-४ लाखांत जातो, जास्त पैसे खर्च करूनही सगळ्या सुविधा जसे बाथरूम, टॉयलेट घरात उपलब्ध नसणे.

म्हणजे इतका पैसा खर्च करूनही सोयींपासून वंचित राहावे लागते. कॉलेज संपल्यावर अरुण ने याच समस्येचा तोडगा काढण्याचे ठरवले.

कमी जागेचा योग्य व पूर्णपणे वापर करून त्यात सुखसुवीधांनी संपूर्ण घर कसे बांधता येईल यावर त्याने काम करणे सुरू केले. २०१९ च्या ऑगस्ट महिन्यापासून अरुण एका प्रोजेक्ट वर काम करू लागला.

प्रोजेक्ट च नाव होतं “सोलो 0.1” एक अतिशय लहान, कॉम्पॅक्ट ऑटोमोबाईल घर, जे चक्क तीन चाकी ऑटोरिक्षे वर बांधण्यात येणार होतं.

या प्रोजेक्टला पूर्ण करायला अरुणला पाच महिन्यांचा कालावधी लागला व ऑटोचा खर्च सोडून संपूर्ण घर बांधायला फक्त १ लाख रुपये इतकाच खर्च आला.

 

auto home inmarathi

 

सोलो ०.१ हे ६×६ स्क्वेअर फूट असून २ माणसांकरता सोयीस्कर आहे. हे घर बस व ट्रकच्या उरलेल्या मटेरियल पासून बांधण्यात आले आहे. फ्लोरिंग साठी अरुण ने या घरात अल्युमिनियम शीटचा वापर केला आहे.

कॉस्ट फ्रेंडली रिनोवेशन करून या घराला अधिकाधिक ड्युरेबल बनवता येत शकते.

या घरात मॉडर्न बाथरूम पासून, बेडरूम, सगळ्या सोयी असलेले किचन, काम करण्यासाठी वेगळी जागा, लिव्हिंग रूम, ६०० वॉट्स चे सोलर पॅनल, २५० लिटर ची पाण्याची टाकी आणि गच्ची सुद्धा आहे.

इतकी छोटी जागा असून, घरात इतके सामान असून सुद्धा घराचे वेंटीलेशन सुद्धा छान आहे. तिथे हवा खेळती असते.

या घराचे आणखीन एक वैशिष्टय असे की त्या ऑटो वर हे घर फक्त ५ नट्स ने जोडलेले असून, त्याला एका जागे वरून दुसरी कडे, एका गाडी वरून दुसऱ्या गाडीवर अतिशय सहज ट्रांस्फर करता येते.

अरुण चे या प्रोजेक्ट साठी ऑटोरिक्षा निवडण्या मागे कारण हे की, हे घर किती हलके आहे हे दाखवून द्यायचे होते. एका छोट्याश्या ऑटोवर एक संपूर्ण घर उभे राहू शकते हे अरुण ने सोलो ०.१ मधून दाखवून दिले.

अशा प्रकारची घरं कन्स्ट्रक्शन साईट वर राहत असलेल्या मजूर कामगारांसाठी, भटक्या जमातींसाठी, नैसर्गिक आपदा पीडित लोकांसाठी अत्यंत महत्वाचे ठरू शकते.

 

rickshaw home inmarathi

 

आयआयटी च्या प्रोफेसर पासून बऱ्याच लोकांनी अरुणच्या ह्या प्रोजेक्ट चे कौतुक केले आहे. हे इन्वेंशन सामान्य लोकांच्या स्वतःचे घर असण्याच्या स्वप्नाला पूर्ण करून, वाढत्या घराच्या मागणीला पूर्ण करणारे आहे.

अरुणच्या म्हणण्या नुसार, “आपल्या देशात वाढत्या जनसंख्येमुळे सगळ्यांनाच घर बांधणे, योग्य जागा उपलब्ध होणे फार कठीण आहे. गरीब वस्त्यांमधील लोकांना तर चांगले घर बांधणे अजिबात शक्य नाही.

पण त्यांनाही चांगल्या घरात राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे छोट्या जागेत घर बांधण्यासाठी सुद्धा आर्किटेक्चर चा योग्य वापर करून घ्यायला आपण शिकले पाहिजे. जेणे करून जागेचा अतिशय योग्य वापर करून, सुंदर कॉम्पॅक्ट घरे बांधता येतील”.

आज अरुण दि बिलबोर्ड कलेक्टिव ह्या आपल्या फर्म द्वारे व आपल्या सहकाऱ्यंसह ह्याच प्रकारची जागृती पसरवण्याचे प्रयत्न करतो आहे.

याच सोबत, सोलो ०.१ चे पेटंट त्याने आपल्या नावावर केले असून तो आणखीन ४ प्रोजेक्ट्स वर काम करतो आहे. हे सगळे प्रोजेक्ट्स ही ह्या अजब गजब कॉम्पॅक्ट घरासारखेच कोणत्यातरी प्रश्नावर तोडगा काढणार असतील यात शंका नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?