' फेसबुक वापरताय? जरा जपून...!

फेसबुक वापरताय? जरा जपून…!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

सोशल मिडीयाचा उदय होऊन आता बराच काळ लोटला आहे. लहान , थोर सगळेच whatsapp , facebook , instagram, snapchat, twitter, tumblr आणि बऱ्याच सोशल मिडिया चॅनेल्स वर मुक्तहस्ते डेटा कुर्बान करीत असतात. हल्ली सोशल मिडिया वर active नसणे म्हणजे मागासलेपणाचे लक्षण समजले जाते.

“तू फेसबुक वर नाहीस?’’ हा प्रश्न एखाद्या गुन्हेगाराला पोलीस “बोल तूच चोरी केलीस का?’’ जसा विचारतील तशाच थाटात लोक फेसबुक न  वापरणाऱ्याला विचारतात.  सोशल मिडिया वर active असणे ह्यात काहीही वाईट अजिबात नाही. जोवर हे सगळं टाईमपास साठी लाईटली घेतलं जातंय तोवर ठीक. पण जेव्हा लोक सोशल मिडिया वरच्या आपल्या प्रोफाईल ची तुलना खऱ्याआयुष्यातल्या प्रतिमेशी करायला लागतात तेव्हा खरा प्रॉब्लेम सुरु होतो आणि जगातील सर्व तरुणाई सध्या ह्याच कोशात अडकली आहे आणि जगभरातल्या मानसोपचार तज्ज्ञांनी ह्यावर चिंता व्यक्त केली आहे. कारण सोशल मिडिया ऍडिक्शन आणि त्यामुळे येणारा स्ट्रेस आणि डिप्रेशन हा मानसिक आजार टीनेजर्स आणि त्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या तरुणांमध्ये बळावतो आहे. रात्रीच सोशल मिडियाचा वापर करणाऱ्या टीनेजर्स आणि तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि ह्याचा दुष्परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो आहे असे मत जगातील अनेक अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

facebook-depression-marathipizza
http://guardianlv.com

नुकत्याच झालेल्या ‘वर्ल्ड स्लीप डे’ च्या निमित्ताने ‘नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्युरो सायन्स’ने (NIMHANS) त्यांचे संशोधन प्रकाशित केले. त्यांच्या संशोधानानुसार,

सोशल मिडीयाच्या अति वापरामुळे  टीनेजर्स व तरुण निशाचर होत आहेत. त्यांची झोपण्याची वेळ हि दीड तासाने पुढे सरकली आहे. ह्याचा अतिशय मोठा परिणाम त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होत असून भविष्यात ह्याचे अत्यंत गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. कमी किंवा अपुरी झोप मिळाल्यामुळे हृदयरोग, ब्लड प्रेशर चा धोका संभवतो तसेच निद्रानाश सुद्धा होऊ शकतो. हल्ली अनेक तरुण इनसोम्निया म्हणजेच निद्रानाशाने ग्रस्त आहेत आणि रात्रीची झोप नसली कि अनेक निगेटिव्ह विचार डोक्यात येऊन डिप्रेशन सुद्धा येण्याचे प्रमाण वाढले आहे. ह्या शिवाय रात्री झोप लागली तर मध्ये मध्ये जाग आल्यावर फेसबुक , व्हॉट्सअॅप चेक करणाऱ्यांचेही प्रमाण खूप आहे.

हल्ली  जवळ जवळ प्रत्येक टीनेजर च्या हातात स्मार्ट फोन्स असतात. ते सोशल मिडिया वरील activity बद्दल अत्यंत सिरीयसली विचार करतात. सतत आपल्याला जास्तीत जास्त लाईक्स आणि कमेंट्स कशा मिळतील ह्याच विचारात ग्रस्त असणाऱ्या ह्या मुलांचे मानसिक स्वास्थ्य ढासळते.

facebook-depression-marathipizza01
psychcentral.com

आपल्या पोस्टला, सेल्फी ला कोणीच लाईक करत नाही ह्याचे डिप्रेशन सुद्धा त्यांना येते. एकूणच व्हर्च्युअल जगाकडे हि मुले खूप सिरीयसली बघत असतात. जरा वेळ इंटरनेट किंवा वायफाय बंद पडले कि ती अस्वस्थ होतात, सतत मेसेज साठी किंवा नोटीफिकेशन साठी फोन चेक करणे हि सवय लागते आणि थोड्या वेळासाठी सुद्धा मोबाईल वर काही अपडेट आले नाही तर अस्वस्थ व्हायला होते. हि सगळी लक्षणे ऍडिक्शन ची आहेत आणि ह्याचे मानसिक आजारात रूपांतर होऊ शकते. लहान वयात पॅनिक आणि एन्झायटी चे अटॅक येऊ शकतात. एखाद्या सोशल मिडिया फ्रेंड ने काही मेसेज किंवा पोस्ट टाकली तर त्याला लगेच रिस्पॉन्स देणे हि त्यांना त्यांची जबाबदारी वाटते आणि तशीच अपेक्षा त्यांचीही त्यांच्या सोशल मिडिया सर्कल कडून असते. जर त्यांना अपेक्षित  रिस्पॉन्स मिळाला नाही तर त्यांना आपण दुर्लक्षित आहोत असे वाटून डिप्रेशन येऊ शकते. ह्या सोशल मिडिया वर आपली इमेज टिकवणे हे टीनेजर्स चॅलेंज समजतात. सोशल मिडीयाचे हि मुलं इतक प्रेशर घेतात कि सतत अपडेटेड राहण्यासाठी सतत फोन चेक करतात. चुकूनही आपल्याकडून काहीही मिस होऊ नये ह्याचं इतकं प्रेशर त्यांना असतं कि ते रात्री सुद्धा शांत झोपत नाहीत. सतत रात्री बेरात्री उठून फोन चेक करतात. ह्या व्हर्च्युअल जगापासून थोडाही वेळ लांब राहणे त्यांना जमत नाही.

हे प्रेशर टीनेज मुलांपेक्षा टीनएज मुली जास्त घेतात. जेव्हाही टीनएज मुली टेन्शन मध्ये असतात किंवा चिंतेमध्ये असतात , त्या स्वतःचा मूड चांगला करण्यासाठी आपसूकच सोशल मीडियाकडे वळतात. पण हा सोशल मिडिया त्यांना आणखी प्रेशर देतो. प्रेशर परफेक्ट दिसण्याचं, परफेक्ट वागण्याचं, परफेक्ट फिगर असण्याचं ,  प्रेशर परफेक्ट फ्रेंड सर्कल असण्याचं, प्रेशर सगळीकडे भरपूर लाईक्स मिळवण्याच… जर ह्यातलं काही मिळवण त्यांना जमल नाही तर स्वतःलाच कमी समजून त्रास करून घेण्याकडे ह्यांची वाटचाल सुरु होते, स्वतःच बद्दल घृणा, तिटकारा वाटतो आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हे अतिशय गंभीर आहे .

facebook-depression-marathipizza02
http://www.huffingtonpost.it

ह्या सोशल मिडीयाच्या अति वापरामुळे शारीरिक त्रास सुद्धा होतात. अपुरी झोप झाल्याने दिवसभर थकवा जाणवतो, उत्साह वाटत नाही, एकाग्रतेवर कमी होऊन अभ्यासावर विपरीत परिणाम होतो , रोग प्रतिकार शक्ती कमी होऊन अनेक आजार बळावतात. करियर च्या महत्वाच्या वर्षात असे शारीरिक नुकसान झाल्याने त्याचे हि नुकसान होऊ शकते. सगळीकडे ह्याची चर्चा होते पण ह्यावर कंट्रोल कसा करायचा हे मात्र समजत नाही.

आपण जर हे सगळे त्रास अनुभवत असू तर भविष्यातल्या धोक्याची हि नांदी आहे हे समजून वेळीच सोशल मिडियाचा अतिवापर बंद करून आपापले ऍडिक्शन कमी करायचा नक्कीच पर्यंत करायला हवा. नाहीतर ‘अब पछताये क्या होगा जब चिडिया चुग गयी खेत!’ असे म्हणायची वेळ येईल.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?