' महिलांनो, आपल्या रुपाची अशी काळजी घेऊन तुम्ही मेकअप शिवायही देखण्या दिसू शकता – InMarathi

महिलांनो, आपल्या रुपाची अशी काळजी घेऊन तुम्ही मेकअप शिवायही देखण्या दिसू शकता

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सुंदर दिसावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. कारण त्यामुळेच आपलं व्यक्तिमत्व खुलून येत असतं. आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख ही त्यामुळेच असते.

काळ बदलला, पण माणसाची ही उपजत हौस काही फिटलेली नाही. सुंदर दिसण्यासाठी आपण निरनिराळे उपाय करत राहतो.

बऱ्याचदा फिल्मी नायक-नायिका यांच्याप्रमाणे दिसण्यासाठी खूप जण उत्सुक असतात, म्हणूनच मग नायक नायिकांप्रमाणे भरपूर मेकअप करून सुंदर दिसण्याचा प्रयत्न केला जातो.

 

makeup clean inmarathi1

 

मेकअप करण्याची प्रोडक्ट्स कोणती आहेत, त्यांची एक्सपायरी काय आहे हेदेखील पाहिलं जात नाही. काहीजणांच्या त्वचेवर केमिकल युक्त मेकअप मुळे पुरळ येणे, चट्टे येणे, डाग पडणे असे प्रकार घडतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

प्रत्येक व्यक्तीची त्वचा वेगवेगळी असते काहींची खूप तेलकट असते तर काहींची कोरडी. चुकीची प्रॉडक्टस् वापरण्याने चेहरा विद्रूप होण्याची शक्यता असते.

म्हणूनच, फाउंडेशन, लिपस्टिक किंवा इतर कुठलंही मेकअपचे सामान न वापरता घरातल्याच काही गोष्टी वापरून आपलं सौंदर्य आणखीन कसं खुलवता येईल ते पाहू!

भुवया ठळक करणे

 

 

सुंदर चेहऱ्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे भुवया. त्या जर व्यवस्थित आकाराच्या आणि ठळक असतील, तर त्या सौंदर्यात नक्कीच भर टाकतात. म्हणूनच भुवयांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांचा आकार व्यवस्थित राहिला पाहिजे हे बघायला हवं.

काही जणांच्या भुवया या विरळ असतात. म्हणजे भुवया आहेत की नाहीत इतक्या विरळ असतात. त्यांनी रोज आपल्या भुवयांना एरंडेल लावले, तर काही आठवड्यातच त्या नक्कीच दाट होतील. त्यांना थ्रेडिंग करून किंवा वॅक्सिंग करून त्यांचा आकार नीट केल्यास त्या उठावदार दिसतील.

डोळ्यांची काळजी

डोळे देखील सुंदरतेच्या व्याख्येतील महत्वाचा हिस्सा आहेत. डोळ्यांचा आकार सुंदर दिसावा म्हणून पापण्यांवरून आयलाश कर्लर फिरवावा. त्यामुळे पापण्यांना देखील एक विशिष्ट आकार मिळतो.

काही जणांच्या डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे असतात. डोळ्यांच्या खाली जर काळी वर्तुळ असतील, तर त्याचा अर्थ विटामिन बी ची कमतरता आहे. म्हणूनच, जेवणात विटामिन बी चा समावेश करावा. डोळे दिवसातून दोनवेळा थंड पाण्याने धुवावेत.

शुभ्र पांढरे दात

 

teeth care inmarathi

 

सुंदर हास्य हा देखील एक चेहऱ्याचा दागिना असतो. म्हणूनच दात स्वच्छ, शुभ्र पांढरे करणारी चांगली टूथपेस्ट वापरली पाहिजे, परंतु अशा प्रकारच्या टूथपेस्टचा अतीवापरही टाळावा. कारण काही काही टूथपेस्टमधील केमिकल्स दातांसाठी घातक ठरू शकतात.

काही जणांचे दात हे मूलतःच थोड्याशा पिवळ्या रंगाचे असतात; त्यांनी मात्र डेंटिस्टकडे जाऊन आपले दात स्वच्छ करून घ्यावेत.

ओठांची काळजी

 

 

सुंदर हास्यासाठी महत्त्वाचा घटक म्हणजे आपले ओठ. म्हणून आपल्या ओठांना लीप बाम लावावा. यामुळे ओठ मऊ राहतात.

कधीकधी लीप बामच्या ऐवजी घरातील तूप किंवा लाकडी घाण्यावरचे तेल लावले तरी त्यामुळे ओठ मऊ राहतात.

 

केसांची काळजी

 

 

चेहऱ्याच्या सुंदरतेचा आणखी घटक म्हणजे आपले केस. जर केस मोकळे सोडत असाल, तर वेळोवेळी ते कापलेले असावेत.

केसांना कलर करत असाल तर तो तुमच्या केसांच्या रंगाशी जुळवून घेणारा असावा. उगीचच निळे,जांभळे, गुलाबी रंग वापरू नयेत.

केस मऊ राहण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करावा. त्यामुळे केसांची चमक वाढते तसेच कोंडाही कमी होतो.

केस स्वच्छ करण्याकरीता शक्यतो हर्बल शाम्पूचा वापर करावा. तसेच शिकाकाई, रिठा या गोष्टींचा वापर केल्यास केस मऊ आणि घनदाट राहतात.

सन स्क्रीनचा वापर करावा 

 

skin care inmarathi

 

उष्णतेमुळे आणि प्रदूषणामुळे आपल्या चेहऱ्यावरील त्वचेला खूप हानी पोहोचत असते. म्हणूनच सनस्क्रीनचा वापर अत्यावश्यक झाला आहे.

सूर्याच्या किरणांमुळे आपल्या त्वचेला हानी पोहचते, चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात, त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. हे टाळण्याकरिता चांगल्या मात्रेच्या SPF असलेल्या सन स्क्रीनचा वापर करावा. विशेषतः किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या लोकांनी तरी याचा रोजच वापर करावा.

त्वचेची काळजी

 

 

चेहऱ्याची काळजी घेताना चेहरा दिवसातून किमान दोन वेळा तरी स्वच्छ धुतला पाहिजे. मेकअप उतरवताना क्लींजिंग मिल्क लावून चेहरा पुसून घेतला पाहिजे. नंतर फेस वॉशने चेहरा धुतला पाहिजे.

चेहरा पुसताना कधीही जोरजोराने टॉवेल घासू नये त्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेला हानी पोहोचते. त्याऐवजी टॉवेलने चेहरा टिपून घ्यावा.

शक्य असल्यास आठवड्यातून एकदा फेस मास्क लावून घ्यावा. यामुळे निर्जीव झालेली त्याच्या निघून जाते आणि चेहरा तजेलदार राहतो.

 

पुरेशी झोप

 

actress sleeping inmarathi

 

एकूणच आपल्या आरोग्यासाठी पुरेशी होणे फार गरजेचे आहे. प्रत्येकाने किमान सात ते नऊ तास झोप घेतली पाहिजे.

रात्री अकराच्या आत झोपायची सवय लावून घेतली पाहिजे. पुरेशी झोप घेतल्याने अकाली वृद्धत्वाच्या खुणा दिसत नाहीत.

 

योग्य आहार

 

actress eating inmarathi

 

संतुलित आहार आपल्या रोजच्या जेवणात असणे गरजेचे आहे. भरपूर पाणी पिणे ही आपल्या शरीरासाठी आणि त्वचेसाठी खूप उपयुक्त गोष्ट आहे.

फळे, पालेभाज्या, कडधान्य, धान्य याबरोबरच मासे, अंडी चिकन, ड्रायफ्रूट्स यांचा समावेश आहारात असावा. याशिवाय दुग्धजन्य पदार्थ ही खाल्ले जावेत. रोज एक ग्लास दूध घेतले पाहिजे. तसेच दही, ताक, पनीर, साजूक तूप यांचाही समावेश आहारात असावा.

आपला पेहराव

 

girl deciding clothes inmarathi

 

कुणावरही आपल्या व्यक्तीमत्वाची छाप पडावी वाटत असेल, तर आपण कोणत्या प्रकारचे कपडे घालतोय ही फार महत्त्वाची असते. कारण प्रथमदर्शनी आपले कपडेच लोकांच्या नजरेत येतात. यासाठी अतिशय भडक रंगाचे कपडे कधीही घालू नये.

प्रत्येकाची आवड आणि व्यक्तिमत्व ह्याला काही काही रंग खुलून दिसतात. त्यासाठी आपल्याला काय छान दिसते हे पाहून तशाच कपड्यांची निवड स्वतःसाठी करावी.

याशिवाय आपल्या हातांची पायांची काळजी घ्यावी. जमल्यास पेडिक्युअर, मॅनिक्युअर जरूर करून घ्यावे. हातापायाची नखे व्यवस्थित कापलेली असावीत. जर नखे वाढवायची असतील, तर ती नेहमी स्वच्छ केलेली असावीत.

या साध्या साध्या गोष्टी केल्या तरी कुठल्याही मेकअप विना सुंदर दिसता येईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===   

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?