' सर्रास ऑनलाईन शॉपिंग करताय..ह्या ६ गोष्टी ऑनलाईन घ्यायचं शक्यतो टाळा!

सर्रास ऑनलाईन शॉपिंग करताय..ह्या ६ गोष्टी ऑनलाईन घ्यायचं शक्यतो टाळा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आता एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर मार्केट पर्यंत जाण्यापेक्षा सगळे ऑनलाइन शॉपिंगचा पर्याय निवडतील. अमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट यांसारख्या बऱ्याच ऑनलाईन कंपनीज फक्त एका क्लिकवर घरच्या घरीच गरजेचे सर्व प्रोडक्स पुरवतात.

मग पाय तुडवत मार्केट पर्यंत कोण जाईल? हल्ली कोरोनाच्या काळात बाहेर फिरणे सगळ्यांना भीतीचे वाटते. त्यामुळे सगळेच ऑनलाइन शॉपिंगचा ऑप्शन निवडतात.

तसेच ऑनलाइन शॉपिंग साइट्स डिस्काउंट पुरवतात. त्यामुळे त्यांच्या डिस्काउंट ऑफर्स कडेसुद्धा लोक आकर्षित होतात पण; ऑनलाइन शॉपिंग करताना काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

 

online-shopping-fraud-featured-inmarathi

 

बऱ्याचदा ऑनलाइन शॉपिंग मध्ये चित्रात दिसणाऱ्या प्रॉडक्ट प्रमाणे प्डिलिव्हरी होत नाही किंवा त्यामध्ये काहीतरी दोष असतात. म्हणूनच भले ऑनलाइन शॉपिंग मुळे आपले कष्ट वाचत असतील तरी ते घेताना सावधानी बाळगली पाहिजे.

आज आम्ही अशाच काही प्रॉडक्ट विषयी सांगणार आहोत जे ऑनलाइन खरेदी करताना काळजी घेतली पाहिजे.

 

जुन्या गाड्यांची खरेदी :

 

old car sale inmarathi

 

आपल्याला बऱ्याच ऑनलाईन साइट्सवर खूपच आकर्षक आणि कमी दरात गाड्या दिसतात. ज्या आधी वापरलेल्या असतात.

बाजारात अशा गाड्यांची किंमत खूपच अधिक असते ज्या आपल्या बजेटच्या बाहेर असतात. त्यामुळे ऑनलाइन साइटवर अशा जुन्या गाड्यांच्या किंमती बघून आपण भारावून जातो आणि त्या खरेदी करण्यापूर्वी पूर्वतपासणी करायला विसरून जातो.

ऑनलाईन विकत घेतलेल्या या गाड्या बऱ्याचदा खूपच कमी दर्जाच्या असतात आणि त्यात महिनाभरात किंवा कालांतराने दोष आढळून येतात.

त्यामुळे सुरुवातीला आकर्षक दिसणाऱ्या या गाड्या बाराच्या भावात पडतात. त्याऐवजी मार्केटमध्ये भले या गाड्या अधिक पैसे मोजून घ्याव्या लागल्या तरी हा पर्याय तोट्याचा ठरत नाही.

 

कपडे :

 

online clothing inmarathi

 

नेटवर सर्फिंग करत असताना आपल्याला बऱ्याच ऑनलाईन साइट्सवर रंगीबेरंगी, आपल्या वर सूट होतील असे कपडे दिसतात. हे कपडे बघून आपण त्या कपड्यांच्या मोहात पडतो.

त्या कपड्यांमध्ये स्वतःला इमॅजिन करून मनातल्या मनात खुश होतो पण; जेव्हा कपड्यांची ऑर्डर घरी येते आणि आपण ते कपडे घालून बघतो त्यानंतर आपला अपेक्षाभंग झालेला असतो.

हे कपडे बऱ्याचदा आपल्या मापाचे नसतात. कधीतरी ते आपल्याला तोकडे होतात तर कधी ढगळे होतात. भले या कपड्यांवर लहान, मध्यम आणि मोठे असे इंग्रजीमध्ये टॅग लावले असतील तरीही काही प्रसंगी ते आपल्या मापाचे नसतात.

हे विकत घेतलेले कपडे रिटर्न करणे बऱ्याचदा किचकट असते. तर काही कंपनीज एकदा खरेदी केलेले कपडे पुन्हा रिटर्न घेत नाही.

त्यामुळे आकर्षक कपड्यांची ऑनलाइन केलेली शॉपिंग आपल्याला निराश करू शकते.

या ऐवजी बाजारात आपल्याला आवडणारे कपडे आपण त्या दुकानातच असणाऱ्या चेंजिंग रूम मध्ये ते घालून पडताळू शकतो की ते आपल्या मापाचे आहेत अथवा नाही.

आणि निराश न होता स्वतःवर चांगल्या वाटणाऱ्या कपड्यांची खरेदी करू शकतो. म्हणूनच आम्ही सुचवू इच्छितो की ऑनलाइन शॉपिंग वर कपड्यांची खरेदी करणे टाळलेलेच बरे!

 

कॉस्मेटिक प्रोडक्ट :

 

cosmetic inmarathi

 

हल्ली स्वतःची काळजी घेण्याकडे प्रत्येकाचेच लक्ष असते. आपण इतरांसमोर नीट प्रेझेंट झाले पाहिजे म्हणून लोक स्वतः कपड्यांवर, ॲक्सेसरीजवर पैसे खर्च करतात त्याच प्रमाणे आकर्षक चेहर्यासाठी किंवा त्वचेसाठीसुद्धा पैसे खर्च करतात.

थ्री-जी, फोर-जी, घरोघरी वाय-फाय यामुळे लोक बाजारात जाण्याऐवजी असे कॉस्मेटिक प्रोडक्ट ऑनलाईनच खरेदी करतात.

पण बऱ्याचदा अशा ऑनलाइन प्रॉडक्टची केलेली खरेदी आपल्याला महागात पडू शकते. जर तुम्ही ऑनलाइन साइट्सवर तुमच्या ठरलेल्या ब्रँडची खरेदी करत असाल तर काहीच हरकत नाही.

फक्त एका प्रॉडक्टकडे आकर्षित होऊन त्याबद्दल काहीच माहीत नसताना त्याची केलेली खरेदी नंतर तुम्हाला घातक परिणाम देऊ शकते.

त्यामुळे कोणत्याही प्रॉडक्ट बद्दल माहित नसताना त्याची ऑनलाईन खरेदी करू नका.

 

पाळीव प्राणी :

 

pets inmarathi

 

काही लोकांना प्राण्यांची आवड असते. प्राण्यांबरोबर वेळ घालवणे, त्यांची निगा राखणे, त्यांना वेळोवेळी खाऊ देणे या सर्व गोष्टी करण्यात त्यांना राम वाटतो.

अशा या पेट लवर्स पुढे एक नवीन ऑप्शन उभा झाला आहे तो म्हणजे अशा पाळीव प्राण्यांची खरेदी कुठल्याही बाजारात न जाता थेट ऑनलाईन साईट्स वरून करणे.

बऱ्याच पाळीव प्राण्यांची विक्री करणाऱ्या ऑनलाईन साइट्सवर त्या प्राण्यांचे आकर्षक फोटो टाकले जातात जे बघून कोणीसुद्धा मोहात पडेल. बघितलेला पेट घरी आणण्याचा विचार करेल.

ऑनलाइन साइट्समध्ये त्या पाळीव प्राण्यांच्या सवयी, त्याचे आवडते पदार्थ, त्याला करायला आवडणाऱ्या गोष्टी, त्याची मेडिकल हिस्ट्री याविषयी सर्व इन्फॉर्मेशन पुरवतात.

जी वाचून त्या प्राण्याला खरेदी करण्याची आपली इच्छा तीव्र होते पण काही वेळा त्यांनी पुरवलेली ही माहिती ती चुकीची असते.

त्या प्राण्याचे वागणे प्रत्यक्षात आक्रमकही असू शकते. याचा पुढे त्या मालकाला त्रास होऊ शकतो. काही प्रसंगी त्या प्राण्याचे आरोग्य सुदृढ नसते ज्यामुळे तो लवकरच मृत्युमुखी पडू शकतो.

म्हणून ऑनलाइन प्राण्यांची खरेदी करण्यापेक्षा तुमच्या जवळच्या पेट स्टोअर्स वरूनच प्राण्यांची खरेदी करा.

 

महागड्या दागिन्यांची खरेदी :

 

jewellery inmarathi

 

ऑनलाइन साइट्सवरून सोन्याचे दागिने घेणे तोट्याचे ठरू शकते.

कारण जर आपण बाजारातील ठरलेल्या सोनाराकडून वाचवेल अर्स कडून दागिने घेत असू तर ते सोने आपल्याला पडताळता येते. परंतु ऑनलाइन सोने घेताना ते पडताळण्याची मुभा नसते.

त्यामुळे महागड्या दागिन्यांची ऑनलाईन खरेदी करणे टाळलेलेच बरे!

 

ऑनलाईन औषधे विकत घेणे :

 

medicines online inmarathi

 

ऑनलाईन साइट्सवर आपल्याला बरेच मेडिसिन सुद्धा सापडतात ज्यावर डिस्काउंट सुद्धा दिले असते.

त्यामुळे आपण आकर्षित होतो पण ऑनलाईन साइटवरून घेतलेली औषधे नामक मात्र फरकाने वेगळी असू शकतात आणि आपण चुकीच्या औषधांचे सेवन करू शकतो.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सुचवले आहे की की जर तुम्ही ही ऑनलाईन औषधांची खरेदी करत असाल तर मागवलेले औषध त्याचप्रमाणात आहे का? तसेच त्याची पॅकेजिंग व्यवस्थित आहे का?, त्याची एक्सपायरी डेट संपून तर गेली नाही ना, त्याचा गंध, वास आणि त्याच्यामध्ये वापरले जाणारे घट्ट एकदा नीट पडताळून पहा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?