' नवरात्रीत खेळला जाणारा गरबा म्हणजे फक्त मनोरंजन नाही. हे आहेत त्याचे आरोग्यदायी फायदे! – InMarathi

नवरात्रीत खेळला जाणारा गरबा म्हणजे फक्त मनोरंजन नाही. हे आहेत त्याचे आरोग्यदायी फायदे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

रंगीबेरंगी झगमगीत कपडे घातलेले लोक रात्र जागरण विविध म्युझिकल बँड, मोठेमोठे स्पीकर्स आणि आणि गुजराती गाण्यांवर थिरकणारी माणसे हो! हो!

इतके वर्णन केल्यानंतर तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण कोणत्या विषयावर चर्चा करणार आहोत. मित्रांनो तुम्हा आम्हा सर्वांच्या आवडीचा सण लवकरच येणार आहे तो म्हणजे रास गरबा!

 

dandiya inmarathi

 

मित्रांनो सगळ्यात मोठी इन्वेस्टमेंट असते ती म्हणजे हेल्थ इन्व्हेस्टमेंट. जर तुमचे शरीर सुदृढ आहे तर तुम्ही कोणतेही काम करण्यास सक्षम असता. आणि रास-गरबा हि आहे तुमची हेल्थ इन्वेस्टमेंट!

त्यामुळे गरबा च्या नऊ दिवसात तुम्ही एक छान हेल्थ इन्वेस्टमेंट करणार आहात म्हणजेच गरबा खेळल्याने तुम्हाला बरेच फायदे होणार आहेत. विश्वास बसत नाही तर वाचा रास-गरबा विषयी काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स.

 

गरब्यामुळे बेली फॅट कमी :

 

belly fat inmarathi

 

मी वरच म्हटले की पुढच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही खूप मोठी हेल्थ इन्वेस्टमेंट करणार आहात. आता बेली फॅट कमी करणे हे कठीण आहे, होय तासंतास जिम मध्ये घाम गाळून सुद्धा बऱ्याच लोकांना बेली फॅट कमी करणे काही जमत नाही.

मग आरशात जवळ पोटाचा असा मोठा घेर बघितल्यानंतर आपसुकच आपण लूज टीशर्ट घालण्याचा पर्याय निवडतो.

काय गरज आहे त्याची जर तुम्हाला पण तुमचं बेली फॅट कमी करायचं असेल तर पुढच्या नऊ दिवसांमध्ये खूप गरबा खेळा!

कारण गरबा हा डान्स आहे आणि डान्स ही एक मनोरंजक एक्सरसाइज आहे गरीब यामध्ये अशा बऱ्याच स्टेप्स असतात ज्यामुळे तुमचे स्ट्रेचिंग होते.

 

आकर्षक कंबर मिळवण्यासाठी :

 

disha patani inmarathi

 

आकर्षक कंबर हे प्रत्येक तरुणीचे स्वप्न असते. बरेच पुरुष सुद्धा अट्रॅक्टिव कंबर मिळवण्यासाठी जिम मध्ये खूप वेळ घाम गाळतात. खूप एक्सरसाइज करतात.

पण एवढे कष्ट केल्यानंतर, खूप पैसे टाकल्यानंतर त्याचे परिणाम मना सारखे नसतात. त्यामुळे एवढं सगळं करण्यापेक्षा तुम्ही फक्त नऊ दिवस गरबा खेळणे हे जास्त परिणामकारक ठरेल.

गरब्यामध्ये अशा बऱ्याच स्टेप्स असतात जशी की तीन ताली, मोरपंख, लहरियो यामुळे तुमची उठबस होते.

ज्यामुळे तुमच्या कमरेला एक सुबक आकार मिळायला मदत होईल म्हणून आम्ही सजेस्ट करतो कि एक आकर्षक कंबर मिळवण्यासाठी गरबा नक्कीच खेळा.

 

फिजिओथेरपिस्ट ची काही गरज नाही :

 

physiotherapist inmarathi

 

जिम, फिजिओथेरपिस्ट म्हटले की खिशाला कात्री बसते आणि एवढे पैसे टाकूनसुद्धा बर्‍याचदा ते व्यर्थ होतात. त्यात फिजिओथेरपिस्ट ने सुचवलेल्या एक्सरसाइज करण्याचा काहीजणांना कंटाळाही येतो.

जर तुम्हालाही ही फिजिओथेरपिस्ट च्या एक्ससाइज करण्याचा कंटाळा आला आहे किंवा फिजिओथेरपिस्ट कडे जाऊन वायफळ पैसे घालवायचे नसतील तर या नऊ दिवसांमध्ये गरब्याची मनसोक्त मजा घ्या.

 

झुम्बा डान्स एक्सरसाइज ची सुद्धा गरज नाही नाही :

 

zumba inmarathi

 

झुंबा हा आफ्रिकन डान्स भारतातही बराच फेमस आहे. वेट लॉस करण्यासाठी आणि कार्डियो एक्सरसाइज साठी लोक झुम्बा डान्स क्लासेस जॉईन करतात. पण वजन कमी करण्यासाठी झुंबा क्लासेसचा पर्याय खूपच खर्चिक असतो.

जर तुम्हाला पैसे खर्च न करता एक उत्तम कार्डियो एक्ससाइज करायची असेल, ज्याचा तुम्हाला कंटाळा येणार नाही, ज्यामध्ये डान्स स्टेप्स सामील असतील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो नऊ दिवस गरबा खेळण्यासाठी तुम्ही नक्कीच गेले पाहिजे!

 

वजन कमी करण्यास मदत :

 

check weight InMarathi

 

आता ज्या डान्स मध्ये तुमच्या कमरेची एक्सरसाइज होते, तुमचे बेली फॅट कमी होते, ज्या डान्समुळे तुम्हाला फिजिओथेरपिस्ट किंवा झुंबा साठी पैसे खर्च करावे लागणार नाही.

मग तो डान्स फॉर्म अजून एक फायदा म्हणजे तुमचे वजन सुद्धा कमी होते. एक ते दोन तास गरबा खेळल्यावर तुम्ही नको असलेल्या अनवांटेड कॅलरीज लूज करू शकता.

तुम्ही एक तास मनसोक्त गरबा खेळल्यावर तर जवळजवळ तुम्ही १०० ते ५०० कॅलरीज कमी करू शकता.

 

शरीर लवचिक होते :

 

flexibility inmarathi

 

जर तुम्ही दररोज कोणताही डान्स करत असाल तर यामुळे तुमच्या शरीराच उत्तम स्ट्रेचिंग होते आणि परिणामी तुमचे शरीर लवचिक होते. यामुळे तुमच्या स्टॅमिनासुद्धा वाढतो.

आणि नवरात्रीच्या दिवशी गरब्याचे वातावरण तुम्हा सगळ्यांनाच परिचयाचे असेल त्यामुळे फ्लेक्झिबल लवचिक शरीर मिळवण्यासाठी गरबा नक्कीच उपयोगाचा ठरणार!

आत्मविश्वासात वाढ :

मंचावर गाण्याच्या ताली बेधुंद होऊन सर्वांसमोर नाचण्यात वेगळीच मज्जा आहे. यामुळे एक ते दोन तास तुमचे मनोरंजन तर होईलच पण तुमच्या मनात स्वतःबद्दल नवीन आत्मविश्वास निर्माण होईल.

स्ट्रेस कमी होईल :

 

stress reduce inmarathi

 

हल्ली स्ट्रेस ही समस्या किती गहन झाली आहे हे सांगण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांपासून ते कामाला जाणाऱ्या प्रत्येकाला या समस्येने ग्रासले आहे. कामामुळे किंवा अभ्यासामुळे हा त्रास तुम्हालाही असेल.

त्यामुळे तुम्हीसुद्धा या नवरात्रीत गरबा खेळण्यासाठी जायला हवे कारण नवरात्रीत दोन तासासाठी का होईना गाण्यांच्या तालावर बेधुंद होऊन नाचल्यामुळे तुमचा स्ट्रेस दूर करेल.

सध्या ह्या कोरोना महामारीमुळे नेहमीसारखे गरबा ईवेंट्स होतील की नाही ही शंका आहेच, पण समजा काही गोष्टींची काळजी घेऊन कुठे आसपास गरबा खेळला जाणार असल्यास तर अजिबात चुकवू नका!

 

garba featured inmarathi

 

नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये तुमची होणारी हेल्थ इन्वेस्टमेंट तुम्हाला आनंद सुद्धा देणार आहे.

त्यामुळे घरात बसून राहण्यापेक्षा, आपण मोठे झालो आहोत डान्स लहान मुलांसाठी असतो अशी तर इतर कारणे देऊन स्वतःची समजूत घालण्यापेक्षा मनसोक्त गाण्याच्या तालावर गरब्याची मजा घ्या कारण गरबा=हेल्थ इन्वेस्टमेंट!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?