' सगळीकडे परफेक्शन असलेली 'सुपरवुमन' होणं आहे सोप्पं, त्यासाठी फक्त हे गुण आत्मसात करा!

सगळीकडे परफेक्शन असलेली ‘सुपरवुमन’ होणं आहे सोप्पं, त्यासाठी फक्त हे गुण आत्मसात करा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज ऑफिसमध्ये मधुराने केलेल्या कामाचं कौतुक झालं. ऑफिसमध्ये कौतुक झालं म्हणून, मग घरी ही कौतुकसोहळा पार पडला. घर आणि ऑफिस या दोन्ही ठिकाणी मधुरा व्यवस्थित लक्ष देत होती.

ऑफिसमधली काम, मिटींग्स, प्रोजेक्टस, टार्गेट या सगळ्याच गोष्टी अगदी वेळेवर पूर्ण करत होते. तसेच घरातही मुलांकडे नवऱ्याकडे लक्ष देणे त्यांना काही हवं नको ते पाहणे, घरातली काम, घरी आलेले पाहुणे, या सगळ्या गोष्टींना मॅनेज करायला तिला सहज जमत होतं.

कौतुक सोहळ्याला आलेली लोकं तिला “सुपरवुमन” म्हणत होते, परंतु तिची मैत्रीण असलेली स्वरूपा मात्र आपल्याला मधुरा इतकं सफाईदार काम करणं जमत नाही, यामुळे खट्टू होती.

असं कौतुक जर सगळ्यांकडून हवं असेल, तर काही छोट्या छोट्या गोष्टी कराव्या लागतील.

ठामपणे कृती करा

 

focused women inmarathi

 

कुठलंही काम करताना सगळ्यांच्या सोयींचाही विचार करा आणि त्याप्रमाणे काम करा. त्यासाठी लागणारा वेळ आणि त्याचे फायदे लक्षात घेऊन कृती करा आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा.

एखादा निर्णय चुकला, तरी सारखी माफी मागू नका. तो एक धडा मिळाला असे म्हणून चला. कुणीतरी आपल्यावर सहानुभूती दाखवेल अशीही अपेक्षा करू नका. कारण त्यामुळे काहीही साध्य होत नाही, उलट आपण आपल्या स्त्रीत्वाचा फायदा घेतो अशी लोकांची समजूत होते.

चांगला श्रोता बना

चांगला माणूस होण्यासाठी आधी चांगला श्रोता होणे गरजेचे असते. कारण तुम्ही एखाद्याला कितपत सिरियसली ऐकता हे पण खूप महत्त्वाचं असतं.

लोकांच्या बऱ्याचशा समस्या इतरांना सांगून देखील कमी होतात. आपलं कोणीतरी ऐकत आहे ही भावना ही सुखावणारी असते. त्यामुळे घरातली व्यक्ती किंवा ऑफिसमधील व्यक्ती जर काही सांगू इच्छित असेल तर त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्या.

जर घरातलं किंवा ऑफिसमधील कोणी त्यांचं सुख-दुःख शेअर केलं, तर त्या विषयावर फक्त त्याच लोकांशी बोला. त्यांचं गुपित इतर कोणाही समोर फोडू नका किंवा त्यांचं दुःख ऐकून इतरांसमोर त्याची चेष्टा करू नका. कारण सांगणाऱ्यांनी खूप विश्वासाने सांगितलेले असते.

 

office inmarathi

 

समोरच्या व्यक्तीला आपल्याविषयी विश्वास वाटावा असं वाटत असेल, तर आपलं वागणं ही तसंच असावं. तसेच छोट्याशा गोष्टींवर वाद घालत बसू नये. यामुळे तर अजूनच गैरसमज वाढतात.

मुळात घरात किंवा ऑफिसामध्ये सगळ्यांशीच संवाद साधला पाहिजे. एकमेकांशी बोलल्याने समस्या जाणून घेतल्याने त्यावर लगेच उपाय योजना करता येते.

क्षमा करायला शिका

बऱ्याचदा घरात किंवा बाहेर अनेकांकडून चुका होत असतात. त्यावेळेस त्यांच्यावर ओरडण्यापेक्षा त्यांना चुकीची जाणीव करून देणे महत्त्वाचं असतं. कारण त्रागा करून प्रश्न तर सुटतच नाही, पण त्याचा त्रास आपल्याला होऊ शकतो, मग कधी तो शारीरिक असतो तर कधी मानसिक.

म्हणूनच क्षमा करता यायला हवी. कारण कोणीच अगदी परफेक्ट माणूस असू शकत नाही. आपल्याकडूनही कधीतरी कळत नकळत चुका घडतात याची जाणीव ठेवायला हवी.

Couple-Talking Inmarathi

 

घरातल्या मुलांनाही आपल्या वागणुकीतूनच शिक्षण मिळत असते, म्हणूनच आपली वागणूक अत्यंत जबाबदारपणे असावी.

मदत करायला शिका

माणसाच्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग येत असतात. चांगला वाईट काळ प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतो. ऑफिसमधल्या सहकार्याच्या वाईट काळातही जर त्यांना सहानुभूती दाखवून मदत केली तर त्याचा खूपच चांगला परिणाम दिसून येतो.

तसेच घरातही म्हणता येईल. मुलांना कमी मार्क मिळाले म्हणून रागावण्यापेक्षा त्यांना कोणत्या विषयात कमी मार्क पडलेत ते पाहून त्या विषयाची गोडी कशी लावता येईल हे बघावं.

 

family inmarathi

 

तसंच नवऱ्याच्या बाबतीतही म्हणता येईल. जर त्याने एखादा नवीन प्रोजेक्ट करायचा ठरवला तर त्याला प्रोत्साहन द्यावं. तुझ्याच्याने हे जमणार नाही, यात अपयश आलं तर आपलं कसं होईल असं म्हणून आधीच नाउमेद करू नये.

तुमच्या प्रोत्साहनामुळे आणि मदतीमुळे काम व्यवस्थित होईल. त्याची आणि तुमची स्वप्न साकार होतील. उगीच म्हटलं जात नाही, की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते.

नाविन्याच्या शोधात राहा

घरात, ऑफिसमध्ये नेहमी काहीतरी नवीन करत रहा. अगदी मग ते फर्निचर बदलापासून किंवा जेवणाच्या मेनू पर्यंत..काहीही असूदे.

घरातल्या व्यक्तींच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन तसा मेनू प्लॅन केला, तर घरचे लोक खुश होतात. तसंच ऑफिसातही एखादा नवीन बदल जरूर करावा. एकत्र बसून जेवण करावे त्यावेळेस सगळ्यांशी संवाद साधला जातो आणि लोकांना हवी असलेली मदत ही करता येते.

 

lunchbreak inmarathi

 

जुळवून घेण्याचे तंत्र ठेवणे

ऑफिसमध्ये आणि घरामध्ये सर्व लोकांशी थोडे जुळवून घेण्याचे तंत्र ठेवले तर फार अवघड जात नाही, पण हे करताना उगीचच चुकीच्या गोष्टींना कधीही पाठिंबा द्यायचा नाही.

जुळवून घेताना प्रत्येक वेळेस पडती बाजू घ्यायची नाही. जे चूक आहे ते सांगण्याची हिंमतही दाखवायची. कधीकधी यामुळेही लोकांना आपली चूक कळते आणि त्याचा फायदा त्यांच्या बरोबरच इतरांनाही होतो.

स्वत्व जपा

एक महिला म्हणून वागताना आपण आपलं सत्व जपलं पाहिजे. आपल्या दूरदृष्टीचा फायदा आपल्या घरासाठी केला पाहिजे.

घरातले जमाखर्च बचत या सगळ्यांवरती लक्ष ठेवलं पाहिजे. थोड्याशा आर्थिक गोष्टीतही सर्वच महिलांनी लक्ष दिले पाहिजे. आजच्या काळाची ही गरज आहे हे लक्षात ठेवावे.

या सगळ्या बरोबरच स्वतःची काळजीही घेतली पाहिजे. घरातल्या इतरांच्या आरोग्याची काळजी घेताना आपल्या आरोग्याकडे ही लक्ष द्यावे.

या गोष्टी केल्या तर या गोष्टी केल्या तर यश आपल्यापासून दूर नसतं.

 

vidya balan inmarathi

 

सध्याच्या काळात माणसाचं जीवन अत्यंत धावपळीचं झालं आहे. प्रत्येक जण सुखाच्या मागे असताना धावपळ होणारच, पण तरीही आपण नेहमी सगळ्यांना खुश नाही करू शकत आणि खरंतर प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्नही करू नये, हे लक्षात ठेवा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?