'या कारणामुळे तुमच्या शरीरातच दारु तयार होऊ शकते! जाणून घ्या काय आहे हा दुर्मिळ प्रकार?

या कारणामुळे तुमच्या शरीरातच दारु तयार होऊ शकते! जाणून घ्या काय आहे हा दुर्मिळ प्रकार?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘दारू पिणे’ हा जगभरातील बऱ्याच लोकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कारण आनंदाचं असो वा दुखाचं; दारू घेतल्याशिवाय काही लोकांचा दिवसच संपत नाही.

सरकार दरवर्षी दारू आणि सिगरेट सारख्या वस्तूंवर टॅक्स वाढवत असते. पण, तरीही या वस्तूंच्या विक्री मध्ये घट झाल्याची बातमी कधीच समोर येत नाही.

“शौक बडी चीज है” असं म्हणत म्हणत किती तरी दारूचे ग्लास रोज भरले जातात आणि शौकीन लोक त्याला ते रिकामे करतात.

 

drinking inmarathi

 

“संसार उध्वस्त करी दारू, बाटलीस स्पर्श नका करू” हा सुद्धा स्लोगन काही वर्षांपूर्वी लोकप्रिय झाला होता. पण, ते फक्त एक वाक्य म्हणून.

दारू ही सर्वात जास्त महसूल कमावून देणारी वस्तू असल्याने सरकार सुद्धा त्याला लोकांपर्यंत पोहोचण्या पासून हद्दपार करू शकत नाही.

लॉकडाऊन च्या काळात आपण बघितलं की दारूची दुकान सुरू करण्यासाठी सतत मागणी होत होती आणि दुकान सुरू झाल्यावर लोकांनी किती तरी लांब रांगा करून आपली तहान भागवली हे सगळ्यांनी बघितलं.

पण, तुम्हाला हे माहीत आहे का की, एक वेळ अशी येते किंवा येऊ शकते जेव्हा तुम्हाला दारू विकत घेण्यासाठी कुठेही जायची गरज पडत नसते. तुमच्या शरीरातच ती तयार होत असते.

“काही पण फेकताय का?” असं वाटेल. पण, हे खरं आहे की, Auto Brewery Syndrome नावाच्या आजारात तुमच्या शरीरातच दारू तयार होत असते. काय आहे हा आजार? जाणून घेऊयात.

Auto Brewery Syndrome ला काही वेळेस gut fermentation syndrome हे सुद्धा नाव दिले जाते. ज्यामध्ये तुम्हाला दारू प्यायल्याची भावना जागृत होते आणि म्हणून ह्या आजाराला ‘drunkness disease’ हे सुद्धा नाव आहे.

शरीराची ही अशी स्थिती आहे जी की तुम्ही अल्कोहोलचं सेवनही न करता अल्कोहोल तुमच्या शरीरातच तयार होत असतं.

 

auto brewery syndrome inmarathi

या फेज मध्ये तुमच्या शरीरातील साखरेचं प्रमाण वाढलेलं असतं आणि कार्बोहायड्रेट्सचं रूपांतर हे अल्कोहोल मध्ये होत असतं. या आजाराचं निदान होणं हे सुद्धा कठीण आहे.

मागच्या काही दशकात या आजाराच्या फार कमी केसेसची नोंद झाली आहे. पण, हा आजार कित्येक वेळेस चर्चेत येतो जेव्हा ‘drink & drive’ या चेकिंग मध्ये लोक दोषी सापडतात ज्यांनी की, दारूचं सेवन केलेलंच नाहीये.

Auto Brewery Syndrome ची ही लक्षणं आहेत :

१. त्वचा लाल होणे

२. सतत आळस येणे

३. डोकं दुखणे

४. उलटी होऊन सतत कोरडं वाटणे

५. समरणशक्ती कमी होणे

Yeast म्हणजे मशरूम सारख्या पदार्थांच्या अतिसेवनाने तुमच्या शरीरातील कार्बोहायड्रेट्स चं रूपांतर ethanol मध्ये होण्यास सुरुवात होते आणि हा आजार वाढीस लागतो.

लिव्हर चा प्रॉब्लेम असलेल्या लोकांना Auto Brewery Syndrome ची लागण होण्याची शक्यता जास्त असते. अल्कोहोलला शरिराबाहेर टाकण्यात जेव्हा लिव्हर सपोर्ट करू शकत नाही तेव्हा या आजाराला सुरुवात होत असते.

 

auto brewery inmarathi

 

एनर्जी ड्रिंक्स च्या नावाने विकल्या जाणाऱ्या काही गोष्टींमध्ये yeast आणि fungus चं प्रमाण अधिक ठेवलं जातं आणि त्यातील इतर घटकांमुळे कार्बन डाय ऑक्साईड आणि इथेनॉलची शरीरात निर्मिती होत असते.

१९५० च्या दशकात सर्वात पहिल्यांदा Auto Brewery Syndrome ची नोंद झाली होती. ज्या गोष्टींमध्ये ‘added sugar’ असते जसं की, पिझ्झा, पास्ता, पेस्ट्रीज या टाळाव्यात असं डॉक्टर या पेशंट्सना सांगत असतात.

२०१५ मध्ये न्यूयॉर्क च्या रिचमंड युनिव्हर्सिटी मधील डॉक्टरने या आजाराने ग्रस्त पेशंटची नोंद केली होती. त्यांनी या रिसर्च मध्ये सांगितलं आहे की,

“एका ४६ वर्षीय व्यक्तीने २०११ मध्ये अंगठा दुखतोय म्हणून एक अँटीबायोटिक औषध घेतलं होतं ज्याची reaction त्याला झाली होती. ज्यामुळे तो सतत agressive मूड मध्ये असायचा. बरेच उपाय करूनही काहीच फरक पडत नव्हता.

त्यानंतर Auto Brewery Syndrome ची टेस्ट करून बघितली ज्यामध्ये ती व्यक्ती ‘पॉझिटिव्ह’ होती. या आजारावर औषधं उपलब्ध आहेत आणि ती व्यक्ती आता नॉर्मल आयुष्य जगत आहे. “

Auto Brewery Syndrome हा आजार detect होणं यासाठी सुद्धा अवघड आहे कारण लोक ते स्वतः दारू पितात हे मान्यच करत नाहीत.

 

drinking 2 inmarathi

 

अचानक हा आजार उदभवला की व्यक्ती aggressive होतात ज्यामुळे तुम्ही एकटे असताना किंवा गाडी चालवताना आढळल्यास कोणताही धोका उदभवू शकतो.

ज्या व्यक्तींना डायबिटीस आहे त्यांनी दारूचं सेवन करूच नये असं डॉक्टर संगतात. ग्लुकोज चॅलेंज टेस्ट ने Auto Brewery Syndrome चं निदान होऊ शकतं.

या आजाराची शक्यता वाटल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटून ट्रीटमेंट घेऊ शकता.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?